आज काम खूपच लवकर उरकलंय,

 पण का कोण जाणे 

घरी जावसं वाटतच नाहीय...

 काय करायच घरी जाऊन? 

काय होणारंय? 

दिवसभर ऑफिस मधलं टेन्शन 

आणि घरी....

घरी आलं की घरच्या भानगडी.

वैताग आलाय,

असं वाटतंय जावं कुठेतरी दूर...

ना कुठी चिंता ना कुठली काळजी...

आयुष्याचा विचार करताना जाणवतं,

लहानपणीचे दिवस सोडले

तर काय केलं आयुष्यात?

ना धड शिक्षण पूर्ण केलं

ना नोकरीत कुठं टिकलो...

व्ययसाय करावा म्हटले,

तर मित्रांनीच ठासून मारली,

एक अनामिक निराशा

मनात घर करून राहिली तेव्हापासून...

खूप वेळ ठरवलं की नाही

आता बास

आयुष्याकडे जरा गंभीरपणे बघू

पण दुर्दैवाचे दशावतार काय असतात

त्याचा अनुभव इथे आला...

प्रयत्न केले

अगदी प्रामाणिकपणे केले

मनापासून...

पण जर नशिबाचे फासे उलटे पडत असतील तर त्याला कोण काय करणार

अगदी असंच काहीतरी

माझ्याबाबतीत झालंय

यश नावाची गोष्टच नाही

यश म्हणजे काय हे पण विसरलोय मी आज

फक्त आला दिवस कसातरी ढकलायचा

आणि दुसऱ्या दिवशी परत नवीन सुरुवात 

हो... हे आयुष्य आहे

झगडावं लागेलच

थकून चालणार नाही

रडून भागणार नाही

आणि कष्टाला पर्याय नाही...

भविष्यात ज मांडून ठेवले असेल

त्याची आज चिंता करून काहीच उपयोग नाहीय

उद्या काय वाढून ठेवलंय कुणालाच माहीत नाही....

भूतकाळ भूतकाळातच गेलेला बरा

अनुभवातून शिकणं माझ्या नशिबी नाहीय

अहो काय शिकणार अनुभवातून

कितीही प्रयत्न केले तरी जर यश हुलकवणीच देणार असेल

तर अपयशी म्हणून जगलेलं काय वाईट आहे ?

निदान कुठल्या अपेक्षा तरी रहात नाहीत या आयुष्याकडून

फक्त वर्तमान जगणे आणि जमलंच तर त्याचा आनंद घेणे एवढंच हातात आहे

आजचा दिवस संपला एकदाचा असं म्हणून एक निःश्वास टाकायचा

डोक्यावर पांघरून घ्यायचं 

आणि मस्तपैकी झोपायचं

असच ठरवलंय आता

सुदैवाने मला झोपही लगेच येते

कितीही चिंता असली तरी.

अगदी डाराडूर झोपतो

जोपर्यंत कोण उठवत नाही तोवर.

चला येतो

वेटर आलाय बहुतेक

बिल घेऊन

नक्की आठवत नाहीय

पण तोच असेल...

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel