जाग माझ्या देशाच्या जागा हो
गहिवरून गेली मात्रभुमीही
भ्रष्ट राजकारणाशी आणी राजकाणिंयांशी
गरज आहे देशाला तुम्हा युवकांची
स्वातंत्र्य मिळूनी देश गाठले वरील सत्तर
तरी मिळेना लोकांना राहायला छप्पर
दारिद्र्याच्या नावाखाली लोकं झाले कलंक
अन्नदाता शेतकरी झाला रंक
गरिबांना खायला रोटी मिळत नाही
सुशिक्षितांच्या हाताला नौकरी मिळत नाही
शंभर दोनशे रुपयांसाठी विकली गेली मते
पाच वर्षासाठी फुटले भाग्य देशाचे
उठ माझ्या देशाच्या युवका जागा हो
जागा हो
- सचिन माधव मलगिलवार
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.