नमस्कार मित्र हो,
खूप दिवसांच्या gap नंतर लिहतोय एक प्रखर वास्तव hope तुम्हाला आवडेल...
हल्लीच शहरातील एका मोठ्या Saloon मध्ये गेलेलो.. माझा turn यायची वाट बघत होतो... असेच तिथे ठेवलेले मॅगझिन्स चाळत होतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या कस्टमर्स ला पाहत होतो.... काही पुरुष तोंडाला फेस पॅक लावून सुकण्याची वाट बघत होते तर काही चित्रविचित्र केस कापण्यासाठी हेअर ड्रेसर शी हुज्जत घालत होते. मॅगझिन्स चाळता चालत माझी नजर एका फोटो कडे रोखली आणि सहज मनात विचार आला काय हि weired fashion . एक उंचापुरा अंगाने भरलेला (gym tonned) पुरुष मॉडेल अंगात गुलाबी रंगाचा दुपट्टा पांघरून नाकाच्या मध्यावर मोठी नथनी
घातलेली जी कानातल्या आभूषणाशी जोडली होती. गळ्यात साज, दंडावर वाकी, दाढी वाढलेली, अंगावर ठीक ठिकाणी नक्षीकाम (tatoo), कापली मोठा टिक्का.... हे बघता बघता लगेचच एक विचार मनात डोकावला... मी याला विचित्र का म्हणतोय ही तर जग मान्य फॅशन आहे. पण काय करणार जन्मल्या पासून आपल्याला हेच शिकवलं आहे कि दागिने वगैरे सगळं बायकांचे काम. लहानपणा पासून आपल्याला एक भिंत घालून दिली आहे की पुरुष म्हणजे क्रिकेट, fighting दादागिरी, छेडछाड आणि स्त्री म्हणजे घरकाम, शिवण टिपण, बाहुली, नट्टा पट्टा ..... स्त्री आणि पुरुष या मध्ये एक लक्ष्मणरेखा आखून दिली आहे समजा ने. ना पुरुष ने ती रेखा ओलांडायची ना स्त्री ने. ज्याने कोणी ती रेखा ओलांडली त्याला समाजाने बदनाम केलाच पाहीजे..... बदनाम करण्या साठी वयाची अट नाही हा.... मग ते स्वतःची --- पण न धुता येणारा पोर असो कि कोणी मरायला टेकलेला म्हातारा असो त्यांनी "त्या" मुलाला मुलीला स्त्रीला पुरुषाला "नाव" ठेवलीच पाहिजे.
या वरून मला माझ्या लहानपणीचा एक किस्सा आठवला...... आमच्या सोसायटी मध्ये आम्ही खूप सारी लहान मोठी मुले मुली होतो... पण कधी एकत्र खेळायचो नाही... पण मुलांमध्ये काय माहीत जन्मताच एक दंडक होता वाटतं..... खेळणे म्हणजे फक्त क्रिकेटच.... मुलं फक्त क्रिकेट, फुटबॉल खेळतात. कधी चुकून हि बोलला की आज आपण लंगडी.. लपाछुपी... छपरी... खेळूया तर तो मोठा गुन्हा ठरत असे आणि त्याला लगेच दूषण लागे, काय हे मुलींचे खेळ खेळायचे? बापरे... ही मुलं ज्यांना मुलगा आणि मुलगी यातला नीटसा फरकही माहित नव्हता अश्यांना मुलं मुलीत आखून दिलेला हा लिंग भेद आवर्जून माहित होता... जन्मतः बाळकडू जे पाजलं होतं त्यांच्या आई बापानी. आणि जर कोणी हा भेद तोडून जर खेळलाच मुलींचा चा खेळ मग त्या अपराधी मुलाला "बायल्या" म्हणून संबोधले जाई. या दांभीक समाजाने कुठल्या डिक्शनरीतुन शोधून काढलाय हा शब्द कोण जाणे... पण या शब्दाचा सर्रास वापर होताना ऐकलंय मी. या शब्दावरून नुकताच प्रदर्शित झालेला "फुगे" हा सिनेमा आठवला. अगदी समर्पक आहे हा सिनेमा जिथे एक मुलगा खूप सेन्सिटिव्ह तर दुसरा एकदम राकट असंवेदनशील. त्यातला शेवटचा डायलॉग खूप छान आहे जिथे स्वप्नील जोशी प्रार्थना बेहेरे ला तिच्या लग्नात जाऊन सुनावतो..... पुरुषार्थ दाखवायची हि पद्धत नाही.... कि मुलीला छेडणे, किस करणे, दमदाटी करणे..... हे जर जगाला कळलं असतं की पुरुषार्थ अनेक विधायक मार्गाने पण दाखवला जाऊ शकतो,तर अनेक निरागस मने कोमेजली नसती... कित्येक आत्महत्या थांबल्या असत्या. पण काय करणार समाजाने डोळयांवर झापड जी लावली आहेत आपल्या आणि विशेष म्हणजे त्या झापडांची कोणा कोणाला म्हणून जाणीव होत नाही.
फक्त BLUE म्हणजे पुरुष आणि PINK म्हणजे स्त्री.... बास्स्स......
"तो" नाजूक, भावुक, संवेदनशील, असूच कसा शकतो? हि या भिकरड्या समाजाची धारणा...आणि जर तो असा असला तर मग आहेच त्याला डिवचणारे त्याचेच काका..मामा...आत्या...मावश्या... आणि उरलेली कसर भागवतात त्याचे "सोसायटी" वाले.... कीव येते अशा दरिद्री माणसांची... त्यांच्या या दरिद्रीपणाची .. हाच दर्प पिढ्यानपिढ्या पसरवत आलेत ही अशी लोकं आणि साचलाय सर्वदूर समाजात दुर्गंध.
तशीहि हि समाजातील दांभिकता अशी काही पसरली आहे की जेव्हा हीच लोकं एखाद्या उदारमतवादी समाजात वावरतात तेव्हा हीच लोक याला modern society - modern culture या नावाने ओळखतात. लगेचच हि लोक स्वतःला समकालीन पुढारलेल्या विचारांचे समजू लागतात. त्यांना तेच सेन्सिटिव्ह पुरुष मग तो नर्तक असो वा कूक असो वा असो तो मॉडेल खूप चांगले वाटू लागतात.
पण हीच भेकड लोकं जेव्हा बाहेर वावरतात तेव्हा त्यांच्या या वागण्यामुळे किती मने दुखावली गेलीत याची त्यांना जाणीवच नसते. तसाही आपल्या समाजाला कोणाला, कसाही, कुठेही वाट्टेल ते, वाट्टेल तेव्हा, बोलायचा अधिकार दिलाय... दोन "so called पुरुष" जेव्हा भेटतात तेव्हा त्यांनी आई बहिणी वरून एकमेकांना शिवी नाही हासडली तर त्यांच्या पुरुषार्थाची त्यांना जाणीव करून द्यावी लागते आजच्या जगात. आज असे कितीतरी पुरुष आहेत कि स्वतःच्या सेन्सिटिव्ह स्वभावाला.. नाजूकपणाला अनैसर्गिकरित्या बदलून अथवा पुरुषार्थाचा खोटा बुरखा ओढून आयुष्य रेटत आहेत. काहीजण स्वतःची ओरिजिनॅलिटीच विसरून गेलेत आणि समाजाने आखून दिलेल्या चौकटीत स्वतःला असं काही बंदिस्त केले आहे कि निघतो म्हणूनही निघू शकत नाही. आणि ते पण का??तर समाज काय म्हणेल..हाहाहाहाहा.... आरे हा भिक्कारडा समाज तुम्ही कसा हि वागलात तरी नावच ठेवणार आहेत हे विसरु नका.
आवाज बारीक मग तो बायल्या... चालणं वाकडं मग तो बायल्या... रडला... घाबरला... तरी तो बायल्या…. अरे .... बस्स किती ते... ना संपणारी vyatha आहे ही.
मुलांनी बाहुलीशी खेळू नये... भातुकली खेळू नये....नाचू नये .... गाऊ नये... त्यात पण नाचला तर पुरूषी नाचावं classical नाही आणि ज्या क्षणी त्याने ही चौकट ओलांडली तोच लगेच झालाच पाहिजे बायल्या.
या जगात जन्मणारा प्रत्येक मुलगा अथवा मुलगी फक्त एखाद्या प्याद्या प्रमाणे स्वतःला बंदिस्त करून त्या आयुष्याच्या चौकटीत शून्य भावनेने आणि शून्य चित्ताने आपले स्त्रीलिंगी वा पुल्लिंगी रोल जपायचे आणि जगायचे. किती मजेशीर आहे हे कसे जगावे याची नियमावली जणू. कित्येक जण इथे so called common sence लावून comman man प्रमाणे आयुष्य जगतात... जगात काय मरतच असतात. सर्व काही अर्थशून्य, गलिच्छ भकास आहे हे. कीड्या मुंगी प्रमाणे जगू नका... तसे जगलात तर रोज नव्याने चिरडले जाल या दुनियेत. बंड करा.. विरोध करा आपल्याला चिरडणा-यांची तोंड ठेचा.. नांग्या तोडा मग बघा समाज तुमच्या पायाशी येईल.
एवढा लक्षात ठेवा " मुलगा soldier झाला म्हणून तो पुरुष होत नाही आणि नर्तक झाला म्हणून तोच बाई पण होत नाही" stop judgmental STOP !!!
पुरुषार्थ कोणाच्या वागण्या बोलण्यातून ठरवू नका तर त्याच्या कर्तव्य दक्षतेला बघून ठरवा. तसे हि आहेत कि कितीतरी "पुरुष" आई बापाच्या कमाई वर जगणारे.. बायको पोरांना तुडवणारे... आईबापाला अनाथ आश्रमात ठेवणारे... बायकोच्या ताटखालचा मांजर बनणारे... ते चालत हो या "समाजाला". खरा पुरुषार्थ हा कुटुंबाचा पालनपोषण, आईबापाची सेवा... मुलाबाळांना समजून घेणे... बायकोला कामात मदत करणे.. हे सांगायला नको पण या आंधळ्या समाजाला परत एकदा आठवण करून द्यावा लागतंय हि व्यथा बाकी काय....
वाचणाऱ्यांना वाटलंच असेल ना मी हे का लिहलेय.... भेटूया मग सांगतो .....PUNCH!!!!!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.