हे फार क्वचितच केले जाते . या प्लान्चेट च्या प्रयोग साठी एक जाडसर दोर घेतात . त्याची दोन्ही टोके हातात अडकवून दोन पदारांच्या आधाराने एक पेटती मातीची पानाती ठेवतात . आत्म्याला आवाहन केल्यानंतर पणती मागेपुढे झोके घेऊ लागते व त्यावरून होय किंवा नाही अशी उत्तरे मिळतात . या प्रकारच्या प्लान्चेट मध्ये पणती खाली पडून विझण्याची शक्यता असते . यात सविस्तर उत्तरे मिळत नसल्याने ही पध्दत तशी अपूर्णच म्हणावी लागेल .
या शिवाय कवटीचे प्लांचेट म्हणून एक प्रकार आहे ; परंतु ती खूपच अघोरी असल्याने ती न सांगणेच योग्य .
प्लांचेट वर आलेल्या मृतात्म्यांना दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात . पहिला प्रकार म्हणजे पूर्णपणे वयक्तिक स्वरूपाचे प्रश्न . यामध्ये प्रश्नकर्ते हे मृताचे नातेवाईक असतात . त्यांना मृत्तांचा विरह असह्य झालेला असतो आणि आपल्या प्रिय माणसाने अदृश्य स्वरूपात का होईना आपल्याशी बोलावे , आपल्याला काही सूचना किंवा संदेश द्यावा अशी प्रयोग कर्त्याची इच्छा असते .
काही वेळा काही महत्वाच्या खाजगी गोष्टींची मृतात्म्यांना हे प्रश्नकर्ते ' प्लान्चेट ' वर बोलावून घेतात व या वेळी " आपण मृत्यू पत्र कोठे ठेवले आहे ? अमुक अमुक महत्वाचा कागद कोठे आहे ? तुमची काही इच्छा शिल्लक राहिली आहे का ?"
यासारखे प्रश्न विचारतात . काही मृतात्मे भावी काळाविषयी माहिती देतात , पण बहुतेक मृतात्मे स्पष्टपणे नकार देतात .
मृतात्म्यांची शक्ती भविष्यकाळात डोकावण्याची नसल्या मुले त्यांची उत्तरे कधी कधी चुकतात देखील.