आपणा सर्वांना मोदीजींनी 9 नोव्हेंम्बर 2016 रोजी 500 आणि 1000 च्या नोटा वापरण्यास बंद करण्याच surprize दिल होत, या निर्णयाने बरेच जण खळबळून गेले होते. चक्क स्वतः माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटबंदीवर भाष्य केल, निर्णय अतिशय उत्तम होता, तेव्हा मला म्हणजे मोदीजींच्या डोक्याला शाब्बासकीच द्यावीशी वाटली, असं वाटलं आता सर्व काळा पैसा बाहेर पडणार, असा माझा विश्वास (गोड गैरसमज) होता. तसा हा निर्णय सर्व काळा पैसा असणाऱ्या नेत्यांच्या व लोकांच्या पुंग्या टाईट करणारा निर्णय होता, काही लोकांनी तर नोटबंदीची घोषणा झाल्या बरोबरच ४-५ किलो सोनं विकत घेतल, त्यानंतर मोदीजींनी सोनं विकत घेणाऱ्यांची पण चौकशी होणार असं जाहीर केलं होतं पण त्याची अंबलबजावणी झाली की नाही हे काही माहित नाही, पण त्या वाईट अवस्था केली होती फार मोदीजींनी सर्वांची, लोकांनी दिड ते दोन किलोमीटर रांगा लावून नोटा बदलवून घेतल्या, पण लोकांच्या मनात राग वगैरे एवढ्या प्रमाणात दिसत नव्हता, लोकांची मते जेव्हा या बाबतीत काही पत्रकारांनी घेतली व जेव्हा त्यांना या दगदगी बद्दल प्रतिक्रिया विचारली तेव्हा बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया याबाबत चांगली होती, काही लोक तर म्हणाले "घर साफ करतानाही आपल्याला थोडाफार त्रास होतोच आज तर देश साफ करायच काम चालू आहे थोड त्रास आपण सहन करूच शकतो." खरच आपल्या देशात असे अनेक सहकार्याची भावना ठेवणारे लोक आहेत. पण खरंच तुम्हाला असं वाटत का कि नोटबंदीचा फायदा या देशाला झाला? काळा पैसा बाहेर आला अस तुम्हाला वाटत का? मला तर मुळीच वाटत नाही, ज्या काळा पैसाधिकारी नेत्यांसाठी व लोकांसाठी हे उपद्याप करण्यात आले तेच mic वरून मोठ्याने लोकांना सांगत आहेत की "काळा पैसा असणारे लोक तर घरात निवांत बसलेत, आणि जनता आपले पैसे बदलत बसलीये." असं बोलताना जराही लाज वाटू नये या माणसांना, खरच किती अट्टल प्रकारची नीच माणस असतात हे. नीच हा शब्द सुद्धा यांना अपुरा पडेल. काही झालं तरी मोठं मोठ्या सहकारी बँका सुद्धा यांच्याच, त्यामुळे कितीही मोठा काळ्या पैशांचा घोटाळा हे चुटकीसरशी करू शकतात, आणि याच मुळे मला असं वाटत कि नोटबदली करण्याचा निर्णय फारच तडकाफडकी करण्यात आला, त्याआधी जर या सर्व नेत्यांच्या सहकारी बँकांवर जप्ती लादून यांच्या सर्व नाड्या आवळून जर नोटबदलीचा निर्णय घेतला असता तर खऱ्या अर्थाने देश काळ्या पैशातून मुक्त झाला असता.
        आणखी एक सांगण्या सारखी गोष्ट म्हणजे नोटांची quality, जुन्या नोटा पाहता नवीन नोटा या फार low quality material पासून बनवल्या गेल्या आहेत असं वाटत हातात घेतला घेतल्या नोटेसाठी वापरण्यात आलेल्या कागदाची low quality लक्षात येते, कदाचित तडकाफडकी निर्णयामुळे असं घडलं असावं. पण हाच नोटबदलीचा निर्णय उशिरा घेऊन प्लास्टिक बंदीचा निर्णय थोडा आधी घेतला असता तर सगळ्यांचाच खूप फायदा झाला असता, ते कसकाय हे सांगतो, मोदीजींनी निवडून आल्या आल्या प्लास्टिक बंदीचा निर्णय घ्यायला हवा होता, हा निर्णय नुसताच नाही तर प्लास्टिक ला पर्यायी पदार्थ लोकांसाठी उपलब्ध करून द्यायला हवा होता, यामुळे पुरेसे प्लास्टिक सरकारकडे जमा झाले असते, दरम्यान नेत्यांच्या सहकारी बॅंकांना टार्गेट ठेऊन त्या उध्वस्त करायला हव्या होत्या, दोन वर्षात हे काम आरामात झालं असत आणि प्लास्टिक ला पर्यायी उपाय असल्याने बंदीसाठी लोकांवर कर लादावे लागले नसते. आणि सर्वात महत्वाच म्हणजे गोळा झालेल्या प्लास्टिक च्या नोटा तयार करायला हव्या होत्या, म्हणजे काळा पैसाधिकार्याना source नसल्याने त्यांचा सर्व पैसा बाहेर पडला असता, जनते सोबत नेते मंडळीही रांगेत उभे राहिलेले पाहायला मिळाले असते, प्लास्टिक आपण मिटवू शकत नाही पण त्याच प्लास्टिक च्या नोटा तयार झाल्या असत्या तर लोकांनी कधीच ते प्लास्टिक फेकून दिले नसते, नोटेला एक quality मिळाली असती नोट कधीच फाटली तुटली नसती कधीही नोटेचा रंग उडाला नसता लोकांनाही त्या नोटा वापरण्यास आनंद झाला असता.
        आणि याच मुळे मला असं वाटतं की मोदींचा नोटबदलीचा निर्णयाची फसगत झाली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel