गेला बाळपणांत काळ क्रिडतां, तारुण्य आलें भरा । झालों मत्त मदांध कुंजर जसा भ्यालों न विश्वंभरा । रात्रंदीन परांगनेसि झटलों, तैसा पराच्या धना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदा ॥१॥
नाहीं या समयीं विशेश उरली, बोलावया आवधी । कामक्रोध प्रकोप दोष उठती, व्याधी सहस्रावधी, ॥ वार्धक्याचि दशा नको जगदिशा, सोसूं किती वेदना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदान ॥२॥
कोणी सन्निध या विपत्तिंत कदा, येती न बापा खरें । वृक्षीं पत्र-फुलें-फळे तंववरीं, लोलंगती पांखरें ॥ तैसे आप्त कलत्र मित्र अवघे, धि:कारिती निर्धना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदाना ॥३॥
अद्यापी रिपुच्या स्वदास पतितोद्धरा न द्यावा हतीं । अद्यापी जगतार्थ मेघ स्रवती, धारा नद्या वाहती ॥ अद्यापी तरुही परार्थ फळती, सुगंध ये चंदना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदाना ॥४॥
संध्यातर्पण वैश्वदेव गुरूची पूजा न औपासना । गावें नाम धरून नित्य ह्रदयीं, आहे परी वासना ॥ ती तूं मात्र कृपा करून पुरवी, कल्याण श्रीवर्धना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदान ॥५॥
दुग्धामाजिहि पावेना सुख कधी, पाण्याविना मासुळी । जाणों तो तप साधनेंचि बसला, मांडव्यनामा सुळीं । भक्तीवांचुनि दु:खादायक गमे, नानाकृती साधना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदाना ॥६॥
संतापे तुम्हीही म्हणाला इतुका, कां वादतो आगळा । शत्रूचा क्षणमात्र नेम न कळे, कापील केव्हां गळा ॥ थोराची मरजी पटे न अरजी फिर्यादिची दाद ना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदान ॥७॥
दाता दत्त म्हणून लोक म्हणती, आम्ही म्हणूं ना तुला । आणूं साक्षिस वेद पत्रकसह, श्रीविष्णुच्या नातुला ॥ तुम्ही पावन सत्यची पतित हा, खोटा तरी बाध ना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदान ॥८॥
आनाथाप्रति साधुलोक अवघा, आहे पुराव्यास गा । तैसाची अठरा पुराणकरता, आहे पुरा व्यास गा । आतां सोडुं नका परंतु अपुल्या भो नाथ ! संबोधना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदान ॥९॥
माळा दंड करीं कमंडलु जटेचा मस्तकीं टोप तो । ब्रह्मांडांतरि जो फिरेचि लपतो, भक्तीस आटोपतो ॥ भक्तीची दृढ चित्तिं प्राप्ति करितां, युक्ती मला साधेना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदाना ॥१०॥
यत्नें ना कळस महा रणधिरा, श्रीलक्ष्मीनायका । बांधीती उखळीं परी सहजची, गोकूळिंच्या बायका ॥ ही शक्ती निजभक्ति जाउनि दिली, राखूनिया गोधना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदाना ॥११॥
कांता कांचन राज्य वैभव नको, कैवल्यही राहुं द्या । होऊं द्या आपदा शरीर अथवा, काळासि हीराऊं द्या । पाहूं द्या रूप येक वेळ नयनीं. ही माझि आराधना । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदाना ॥१२॥
दावी भक्तच थोडिसी तरि नको, वैकुंठ कैलासही । मोठी दीधलि द्या विशेष गरुडा, तैसीच बैलासही ॥ विष्णुदास म्हणे बरी यवढिसी, घे हिरकणी कोंदणा । स्वामी दत्त दयाघना, अवधुता श्रीअत्रिच्य नंदाना ॥१३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel