एक नगर असते तो तसा दुष्काळी भाग होता पावसाळ्यात सरासरी कमी प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा त्या भागातील शेतकरी हवालदिल होत असतात त्यामधील एक शेतकरी गावातील बाहेर एका बाजूला डोगराची रांग आहे त्यामध्ये जाऊन पाऊस पडावा म्हणून तो वरुण देवाची आराधना करण्यासाठी जातो तिथे तो बारा वर्षे तपश्चर्या करून वरुणराजाला प्रसन्न करून घेतो वरुण देव म्हणतात की हे माझ्या भारतात तुला काय पाहिजे ते मागुन घे तो शेतकरी म्हणतो की माझं धान्य येईल एवढा पाऊस पडला तर आपलं फार उपकार होतील वरुण देव म्हणतात की तसेच होईल आणि गुप्त होतात त्या वर्षी बऱ्यापैकी पाऊस पडतो सर्वांना आनंद होतो त्या शेतकऱ्याचे धान्य बऱ्यापैकी येते आता त्या शेतकऱ्याला हाव सुटती तो परत वरुण देव बोलवितो आणि म्हणतो की देवा मला अजून थोडा जास्त पाऊस पाड वरुण देव म्हणतात की तसेच होईल दसऱ्या वर्षी थोडा जास्त पाऊस पडतो पिके भरपूर प्रमाणात येतात शेतकऱ्याला आनंद होतो त्याला अजून हाव सुटती तो परत वरुण देव बोलवितो आणि म्हणतो की देवा अजून थोडा जास्त पाऊस पाड वरुण देव म्हणतात की तसेच होईल तिसऱ्या वर्षी थोडा अधिक प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा पिके अजून वाढली जातात आणि मग त्या शेतकऱ्याच्या मनात येतं की आपल्या शेतातून नदी वाहली तर किती बरं होईल म्हणजे आपल्याला भरपूर धान्येच धान्य होईल म्हणून तो परत वरुण देव बोलवितो आणि म्हणतो की देवा माझ्या शेतातून नदी वाहली तर किती बरं होईल ते वरुन देव म्हणतात की तसेच होईल आणि चौथ्या वर्षी अगदी विजेच्या कडकडाट होवुन सोट्याचा वारा सटून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी होऊन शेतातून नदी वाहू लागतं उभी पिके वाहून जातत आणि शेतात काहीच उरत नाही तो शेतकरी डोक्याला हात लावून बसतो आणि तो म्हणतो की आपली हाव आपल्याला महागात पडली तो परत वरुण देव बोलवितो आणि म्हणतो की मी चुकलो मला माफ करा देवा आपलं पहिलं होते ते बरं होतं देवा मला तेचं दे मी तुझ्या आभारी राहीन
                         ***बाल गोपाळनों गोष्ट समाप्त*

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel