एक आसपास नगर होतं तिथील लोक गोडीगुलाबीने राहत होते त्या नगराचा राजा एकदम जन जनार्दन साठी अहोरात्र झटत असे त्याला एकुटी एक सुंदर मुलगी होती जणू काही स्वर्गातील अप्सरा त्यांच्या घरी अवतरली होती की काय तिचं नाव हिरकणी असे होते ती सर्वांना प्रेमळ स्वभावामुळे हवीहवीशी वाटत होती असेच मजेत दिवस चाललं होतं ती सोळा वर्षांची झाली होती ती तारुण्यात पदार्पण केले होते म्हणून ती अजुनच हिरकणी सारखी चमकत होती तिला आजूबाजूचे राजकुमार तिच्यावर खुप फिके झाले होते त्यामध्ये एक लांबचा जादुगार प्रविण कुमार असे त्याचे नाव होते तो पण तिच्या साठी वेडा झाला होता त्याच्याकडे एक जादूची पोतडी होती त्यामध्ये एक पुंगी होती ती जर वाजवली तर प्रविण कुमार यांच्या मनात जी लोकं असतील तर त्या सर्वांचे मेण्याचे पुतळे होत असत तो ते पुतळे आपल्या राज्यात घेऊन जात असत आता तर त्याला हिरकणी फारच आवडलेली आहे एक दिवस चांगला पाहून तो मध्यरात्री आपली जादूची पोतडी घेऊन सर्व जण शांत झोपी गेले नंतर तो राजवाड्यात प्रवेश करुन हिरकणीच्या दालनात जाऊन पाहतो तर राजकुमारी गाड झोपेत होती तो आपली जादूची पोतडीतून पुंगी बाहेर काढून वाजवितो तर हिरकणीची मेण्याची पुतळी होते तो जादुगार ती घेऊन आपल्या राज्यात निघून जातो कोणालाही पत्ता लागत नाही दुसऱ्या दिवशी हिरकणी तिच्या दालनात नाही हे पाहून दाशी राजाला जाऊन सांगतात तर ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरतं सगळीकडे गोंधळ माजतो सर्व जण शोधाशोध सुरु करण्यात येते काही उपयोग होत नाही दुसऱ्या दिवशी राजा शिपायांना दंवडी पिकविण्यासाठी पाठविले जाते की जो कोणी राजकुमारी हिरकणी हीला हूडकून आणेन त्याला अर्धे राज्य आणि हिरकणी बरोबर लग्न लावून देण्यात येईल अशी दंवडी पिटविण्यात येतं

क्रमशः

क्रमशः