ही दंवडी पिटविण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या राज्याचे राजकुमार येऊन जात होते पण कोणीही धाडसीने पुढे येत नव्हते सर्व घाबरत होते त्या नगरातील एक गरीब शेतकऱ्यांच्या मुलगा सदाशिव हा भक्कम शरीराचा असतो त्यांनी बऱ्याच लोकांना साह्य केले असते त्याला आपल्या ताकतीवर विश्वास होता त्याची विचारसरणी पण दांडगी होती तो आपल्या वडिलांना म्हणातो की मी राजकुमारी हिरकणी हीला हूडकून आणेन त्याचं वडिलांना वाटते की माझा एकुलता एक मुलगा सदाशिव हा राजकुमारी हिला शोधायला गेला आणि परत नाही आला तर हत्या म्हाताऱ्याला कोण विसरेल ही बाब तो आपल्या घरातील बायकोला सांगतो ती पण तेच विचार करून त्याला हिरकणीला आणायला पाठवू शकत नाही दुसऱ्या दिवशी तो सदाशिव आपल्या आईवडिलांना समजावून सांगतो मग कुठे त्याचे आई-वडील दोघेही तयार होतात मग सदाशिव हा राजा शिवराम यांच्या कडे जाऊन म्हणतो की मी राजकुमारी हिरकणी हीला हूडकून आणेन राजा शिवराम यांना आनंद होतो ते सर्व काही आवश्यक असणारी साहित्य सामुग्री पुरवतात एक घोडा आणि तलवार,भाला,धणुष्य बाणांचा भाता,वाटेत खाण्यासाठी सुकामेवा फळे सर्व काही त्याला दिले जाते सदाशिव हा राजकुमारी शोधायला निघतो सर्व नगरवाशी त्याला नगराच्या सीमेपर्यंत सोडविण्यासाठी जाऊन त्याला शुभेच्छा दिल्या जातात सदाशिव हा लोकांना चौकशी करीत करीत जात असतो त्याला समजतं की तो जादुगार रघुवीर हा येथुन अरबी समुद्राच्या पलीकडे एका डोंगराय प्रदेशात एका भल्या मोठ्या गुव्हेत राहतोय सदाशिव हा अरबी समुद्राच्या अलीकडच्या काठावर एक लहानसा गावात जाऊन उतरतो तिथं त्याला एक म्हातारी जंगलातून लाकडाची मोळी डोक्यावर घेऊन येताना दिसते मोळी तिला पेहवत नसते ती कशीबशी येत असतं तो त्या म्हातारी जवळ जाऊन म्हणतो की आजी बाई मी तुमची मोळी उचलून घेऊन तुमच्या घरापर्यंत पोहचवतो ती पण लगेच तयार होते तो तिची मोळी घरापर्यंत पोहचवतो ती आजी बाई नसतं तर ती जादूटोणा चालवणारी चेटकीण असते ती त्याला घरात घेऊन ताबडतोब दरवाजा बंद करून घेते आणि म्हणते की बरा मोठा बकरा घावला आहे

क्रमशः

क्रमशः