म्हातारी चेटकीण सदाशिव याला म्हणते की मी बरेच दिवस वाट पाहत होती मला कोणी भेटत नव्हते आता तु भैटलाच मला माझ्या काळीमातेचे नवस फेडता येतील असे बोलून ती आपल्या सामानाची जमवाजमव करीत असते सदाशिव तिला म्हणतोय की मी तुला तुझी मोळी उचलून घरी आणून दिली त्याबद्दल तु मला हे उपकार करीत आहेस मी माझ्या राजच्या राजकुमारी हिरकणी हिला शोधून आणन्याचा पन उचला आहे मी राजकुमारी हिला घेऊन येतो मग मला तुझ्या देवीला अर्पण करुन घे मी तुला वचन देतो की मी परत येईल चेटकीण ती त्याला विचारते की तिला कोणी पळवून नेले आहे सदाशिव तिला सर्व काही सांगून टाकतो चेटकीण हीला पण त्या जादुगाराचा काटा काढायचा असतो मग ती तयार होते ती त्याला म्हणाली की मला त्या जादूगारा बद्दल थोडी माहिती आहे ती मी सांगते की जादूगार रघुवीर यांचा गुव्हेत दहा दालने आहेत दहा दालनापैकी एका दालनात सोन्याचा पिंजरा आहे त्यामध्ये राघु आहे त्या राघुची मान मुरगळी म्हणजे त्या रघुवीर जादुगाराचा प्राण तळमळला जाईल बाकीच्या दालनात त्यांनी पुष्कळ राजकुमारींना मेणाचं पुतळे तयार करून ठेवले आहेत मी एक जादूची सतरंजी अंथरून त्यावर बसून तु उडत उडत जाऊ शकतील आणि एक अंगरखा देते तो अंगावर चढवून घातला की तू अद्रुच्श होऊ शकतो तू कोणालाही दिसू शकतं नाही जा बाबा जा माझ्या काळीमातेचे आर्शिवाद तुझ्या पाठीशी आहेत असे बोलून ती निरोप देते सदाशिव जलमजल करीत सतरंजी अंथरून त्यावर आपला घोडा आणि सर्व साहित्य सामुग्री ठेवून अरबी समुद्रावरून चालेला असतो तो बरोबर आठ दिवसांनी जादुगार रघुवीर यांचा गुव्हे जवळ पोहोचतो रात्रीचे वेळ असतं गुव्हेत सर्व सामचुंम असते तो एक एक दालन पाहत जातो सगळीकडे मेणाचं पुतळे आहेत सर्व दालने पाहून होतात पण तो सोन्याचा पिंजरा कुठे दिसत नाही म्हणून तो परत बारकाईने पाहायला लागतो त्याला पिंजरा सापडतो पण तो उंच उंच दालनाच्या छटावरती टांगलेला असतो तिथपर्यंत हात पोहचत नाहीत मग तो अंगावर अंगरखा घालून सतरंजी अंथरून त्यावर बसून छटाजवळ जाऊन हळुच पिंजरा सतरंजी वर घेऊन तो राघु ओरडायला लागतो तो जादुगार रघुवीर जागा होऊन पाहितो तर पिंजरा छटावर नाही तर तो राघु पण नाही

क्रमशः

क्रमशः