सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
पुणे विद्यापीठाव्या नावाचा विस्तार करून ते 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असे करण्यात आले.
पुणे विद्यापीठात 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र' या नावाचे एक अभ्यासकेंद्र आहे
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-
कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा 'सावित्रीबाई फुले पुरस्कार'. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रिफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 'आदर्श माता' पुरस्कार
क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)
सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्न पुरस्कार : आदर्श माता रत्न, उद्योग रत्न, कला रत्न, क्रीडा रत्न, जिद्द रत्न, पत्रकारिता रत्न, प्रशासकीय रत्न, वीरपत्नी रत्न, शिक्षण रत्न
मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा सर्व्प्त्कृष्ट नर्सला देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवडचे शाखेतर्फे सामाजिक/सीक्षणिक कामासाठीचा सावित्रीबाई पुरस्कार
माझी मैत्रीण ट्रस्टतर्फे देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार : २११६ साली हा पुरस्कार सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांना देण्यात आला.
युनाइटेड ओबीसी फोरमचा सावित्रीवाई फुले वैचारिक वाङ्मय पुरस्कार.
वसईच्या लोकमत सखी मंच आणि प्रगत सामाजिक शिक्षण संस्था यांच्यातर्फे देण्यात येत असलेला सावित्रीबाई फुले पुरस्कार
सावित्रीवाई फुले यांच्या नावाची दत्तक-पालक योजना आहे.