शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे.

यापैकी सुमारे १११ किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी ४९ किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले.

या किल्ल्यांच्या यादीत शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे. या यादीचा उद्देश शिवाजी महाराजांचे माहिती व त्यांंचे काम दाखविण्याचा आहे. त्यांची मजल कोठपर्यंत होती हे दाखविणे हा ही एक उद्देश आहे.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात बारा मावळ या प्रदेशातुन केली. हा प्रदेश जरी लहान होता तरी तो जंगल झाडी,डोंगर व नद्या यांनी युक्त होता. तेथे आठ किल्ले होते.हा प्रदेश लष्करी दृष्टीतून अजिंक्य असाच होता.शिवाजी महाराजांचा कल अजिंक्य भूभागावर किल्ले बांधण्याचा होता.त्यांनी घाट तेथे किल्ला हे धोरण अंगिकारले.हे किल्ले एक प्रकारच्या तपासणी चौक्याच होत्या.तेथून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हते.प्रवेश केलाच तर वापस जाण्याची हमी नव्हती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel