आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला स्वप्न दिसत असतात.कधी उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघितली जातात. तुम्हाला जेव्हा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायची असतात तेव्हा निदान ती कुठपर्यंत पूर्ण होतील याची आपल्याला कल्पना असते.
पण झोपल्यानंतर आपल्याला स्वप्नं दिसतात त्याचा बऱ्याचदा आपल्याला काहीच अर्थ लागत नाही. काही जणांना स्वप्नात प्राणी दिसतात, तर काहींना लग्नाची स्वप्नं दिसतात, काही जणांना स्वप्नात देव दिसतात, तर काही जणांना आपला मृत्यू दिसतो, पण नक्की सगळ्याचा अर्थ काय असतो.बऱ्याचदा आपण जे बघतो त्याच्या उलट आपल्या आयुष्यात घडणार असतं असं म्हंटले जाते.
आपल्या आवडीनुसार करियर क्षेत्र निवडणे व त्यानुसार त्या क्षेत्रातील विषयाची परिपूर्ण तयारी करणे गरजेचे असून डॉ. अब्दुल कलाम यांच्या भाषेत सांगायचेच झाले तर '' सप्न पहा व पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा''.
प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही तरी महत्वकांक्षा असते आपल्या जीवनात ध्येय किंवा स्वप्न ठेवणे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जीवनात आपले स्वप्न किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करते तेव्हा त्या व्यक्तीला खूप मोठी किंमत मोजावी लागते. काही माणसांची स्वप्ने ही छोटी असतात तर काही माणसांची स्वप्न देखील मोठी असतात. तसेच प्रत्येक जण हजारो स्वप्न विणत असतो. आपण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो.
स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत, कदाचित ती अश्रूंबरोबर वाहून जातील,ती हृदयात जपून ठेवावीत, कारण हृदयाचा प्रत्येक ठोका,ही स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देईल.स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात तर खरे स्वप्न ते असतात जे तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय झोपूच देत नाही. रात्री स्वप्न नक्की पाहा आणि दिवसा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका तुम्हाला अडचणी आहेत पण तुमच्या अडचणींना हे नक्की सांगा की तुमची स्वप्ने किती मोठी आहेत.
कधी कधी असेही होते की मेहनत करून ही स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला सिद्धांत नाही, कारण झाडे नेहमी पान बदलतात मुळ्या नाही. भगवत गीतेमध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की " निराश होऊ नको कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस".हे नेहमी लक्षात ठेवा की स्वप्न पाहतच असाल तर मोठच पहा लहान कशाला ? कारण मोठी स्वप्नेच माणसाचे रक्त ढवळू शकतात.
"स्वप्न मोफत असतात, फक्त त्याचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच मोठी किंमत मोजावी लागते".
श्री.गोसावी अतुल.