टीव्ही वर कुठला तरी हिंदी सिनेमा सुरु होता. त्यात नायक नायिकेचा प्रणय प्रसंग दाखवत होते. अकरा वर्षाची मंजू एकटक तो प्रसंग बघत होती तिच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती. विद्या चे अचानक लक्ष गेले तसे ती मंजू जवळ आली आणि टिव्ही बंद केला. आई मला बघायचे ते लाव टीव्ही म्हणत मंजू पाय आपटत रडू लागली. बाळा असल काही बघायचे नाही. तू लहान आहेस ग. पन मंजू ऐकत नव्हती तसे विद्या ने तिला पाठीत दोन रटे मारले. मंजू जास्तच रडू लागली. विद्या काय करतेस हे म्हणत त्याच वेळेस विजय घरात आला. अहो मंजू टिव्ही वर नको ते दृश्य बघन्याचा हट्ट करत होती. या मुलीला आता टिव्ही पाहायला देण ही मुश्किल झाले आहे. म्हणून तू मारलेस तिला. अग समजावून सांगायचे लहान आहे ती. मी ख़ुप समजावले ती ऐकत नव्हती म्हणून मारले. विद्या हात उगारण्या आधी तुला लक्षात यायला हवे की मंजू सामान्य मूलगी नाही आहे. तिच्या कलाने घे. सगळच तर करते की मी पण आज मला सहन नाही झाले. विजय मंजू जवळ गेला तिच्या डोक्या वरुन हात फिरवत राहिला. बाबा आई ने मारले मला टिव्ही बघायचा. हो हो मी लावून देतो विजय बोलला. तसे मंजू टाळया वाजवत हसत राहिली. विजय आणि विद्या ला पाहिले अपत्य मंजू झाली पण नेमकी ती मतिमंद म्हणून जन्माला आली. आता आपलच मूल मग ते जसे आहे तसे स्विकारायचे हे दोघांनी ठरवले. मंजू कड़े दुर्लक्ष होऊ नये म्हणून दुसऱ्या मुलाचा चांस ही त्यांनी घेतला नाही. मंजू सांभाळता सांभाळता विद्या च्या नाकी नऊ यायचे पन नाइलाज होता. ख़ुप वेगवेगळे स्पेशलिस्ट ना मंजू ला दाखवले पण तिच्यात काही फरक नाही पडला. मतिंदत्व हे मेंदू च्या कार्यक्षमतेत बिगाड़ झाला की येते. या वर उपाय नव्हता. निसर्ग नियमा नुसार अकराव्या वर्षीच मंजू ला पाळी आली. आता शरीरात जस जसे बदल होऊ लागले तस तसे मंजू व्हायबल होत असे विद्या ला तिला कसे सांभाळावे समजत नसे तीची फार दगदग होऊ लागली. मंजू ला पैड लावणे ते वेळोवेळी बदलने. शरीराची स्वच्छता ठेवणे सगळ विद्या ला पहावे लागायचे . कधी कधी मंजू चा ड्रेस खराब व्हायचा, कधी कधी ती पैड लावून घेत नसे. विद्या ची पुरती दमछाक व्हायची. अलिकडे तर मंजू विचित्र वागु लागली होती. अंगावरचे सगळे कपड़े काढून फेकून द्यायची आणि तिच्या कड़े असणारा मोठा टेडी त्याला आपले अंग घासत राहायची. विद्या ने बघितले तेव्हा पुरती शॉक झाली ती ! मंजू ला ही शारीरिक भावना उफ़ाळुन येत होतया त्या भावना ती अशा प्रकारे बाहेर काढ़त होती. पण विजय समोर ही पोरगी अशी वागली तर? विद्या चींतेत होती. विजय ला तिने ही गोष्ट सांगितली. मग दोघांनी मंजू ला घेवून मानसोपचार तज्ञाकड़े जायचे ठरवले. डॉक्टरकड़े गेल्यावर मंजू बाबत सगळ काही विद्या ने सांगितले. डॉक्टर म्हणाले,निसर्ग नियमा नुसार मंजू ला ही लैंगिक भावना आहेत त्यातून ती "विशेष मूल" या कैटेगरित मोड़ते. पण म्हणून तिला तशा भावना असणार नाहीत असे होत नाही. तिला पाळी आली म्हणजे ती ही स्त्री झाली आहे. मग त्या सर्व भावना तिला ही असनारच. मग या भावना ती कुठेतरी अशा पद्धतिने मोकळी करते. या साठि तिला तिच्या आवडत्या विषयात मन रमवावे लागेल. तिला काय आवडते जसे की चित्रकला,क्राफ्ट,किंवा इतर छंद यात तिचे मन गुंतवा. जेव्हा ती तिच्या आवडीच्या छन्दात मन रमवेल तेव्हाच तीच लक्ष डायवर्ट होऊ शकेल. ही मूल मतीमंद आहेत म्हणून या मुलांची लैंगिकता नाकारून चालणार नाही. ‘बाकी काही कळत नाही, हेच बरं कळतं ‘ असं म्हणून चालणार नाही. त्यातून आपण त्यांची आणि आपली स्वतःचीही फसगतच करत असतो. मतिमंदत्व हे मानवी मेंदूच्या भागातील एक अक्षमता आहे, तर लैंगिकता ही आदिम प्रेरणा ही उत्क्रांत मेंदूचा अविभाज्य भाग आहे.मतिमंदत्व आजारपण नाही तर ती एक अवस्था आहे. मेंदूला काही कारणास्तव इजा झाली, एखादा मानसिक आजार, काही अनुवांशिक कारणे तसेच गुणसुत्रांतील बिघाड यांमुळे मानवी मेंदूच्या कार्यात अडथळा येतो. त्यामुळे विशेष मुलांच्याही लैंगिक भावना आहेत हे मान्य करणं व त्यांच्या लैंगिक अभिव्यक्तीचा स्वीकार करणं गरजेचं आहे.डॉक्टरांना भेटून विद्या चा ताण थोड़ा हलका झाला. मंजू चित्र छान काढायची म्हणून तिला चित्रकलेचा क्लास लावला जिथे तिच्या सारखीच मुल होती. हळूहळू मंजू त्या क्लास मध्ये रमु लागली. चित्रकलेत रस घेवू लागली. विजय आणि विद्या मंजू कड़े जातीने लक्ष देवू लागली. मंजू त्यांची मूलगी होती ती आहे तशी तिला स्वीकारने आणि सांभाळणे हे मोठे आव्हान विद्या आणि विजय समोर होते. हा पालकत्वाचा न संपनारा प्रवास होता.
समाप्त.