कार्व्हर यांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात एका ख्यातनाम व्यक्तिचे आयुष्य जगले. त्यांनी नेहमीच टस्केगी युनिवर्सिटीचे , शेंगदाणे आणि जातिय सुसंवाद याचे कौतुक केले होते. १९२२ पर्यट त्यांनी काही लेख, सहा अॅग्रीकल्चरल बुलेटीन लिहिले होते. तसेच त्यांनी शेंगदाणा उद्योगाच्या मासिकात काही लेख लिहिले होते.कार्व्हर यांनी "प्रोफेसर कार्व्हरचा सल्ला" असा एक लेख पेपर मध्ये लिहिला होता. अनेक उद्योजकांनी त्यांचा सल्ला घेतला होता आणि कार्व्हरनी सुद्धा अगदी मोफत तो दिला होता. कार्व्हर यांच्या दखलपात्र कामांमुळे त्यांची प्रसिद्धी वाढत गेली. कार्व्हर यांच्यावर अनेक चरित्रे आणि लेख लिहिले गेले. रेहेल एच. मेरिट ह्यांनी कार्व्हरना त्यांचे चरित्र लिहिण्यासाठी संपर्क केला.मेरेट यांनी एके ठिकाणी म्हटले होते,"सध्या डॉ. कारर्व्हरच्या शोधांचा वापर व्यावसायिक दृष्ट्या करण्यासारखा विचार अजुन आलेला नाही. मी त्यांच्या शोधकार्याबद्दल लिहिणे म्हणजे खरंतर त्यांच्या शेंगदाण्याच्या आणि इतर उत्पादनांबद्दल उथळ माहिती देणे असेच होईल."
जेम्स सॅक्सॉन चाईल्डर याने १९३२ साली कार्व्हरच्या कामगिरी बद्दल चांगले लिहिले होते. त्यात तो म्हणाला होता की, "कार्व्हर यांच्या शेंगदाण्याच्या पिकाने अमेरिकेच्या शेतकर्याला तारले आहे. १८९२ साली टोळधाडी मुळे कापुस पिकाची झालेली नासाडी झाली. संपुर्णपणे विखुरलेल्या शेतकरी वर्गाला कार्व्हर यांच्या शेंगदाणा पिकाने दिलासा दिला होता. चाईल्डर यांच्या लेखाचे नाव " अ बॉय हु वॉस ट्रेडेड फॉर हॉर्स" हे होते. हा लेख "द अमेरिकन मॅगझिन " मध्ये छापुन आला होता. त्या लेखाची प्रसिद्धी पहाता तो "रिडर्स डायजेस्ट" मध्ये पुन्हा प्रकाशित झाला होता. इतर प्रसारमध्यमे कार्व्हर यांच्या शेंगदाण्याच्या योगदानाला अतिशयोक्ती करुन प्रसारित करत होती. तेव्हा या रिडर्स डायजेस्ट यांनी कार्व्हर यांनी फार प्रभावी कार्य केले नाही असे सांगितले.कार्व्हर यांचे शेंगदाण्यातील संशोधन कार्यात अजुन एका प्रमुख संशोधनाचा उल्लेख होतो. त्यांनी सन १९३३ ते सन १९३५ पोलियो झालेल्यांवर शेंगदाणा तेलाने मालिश केल्याने फायदा होतो का यावर त्यांनी प्रयोग केले होते. परंतु पोलिओ झालेल्या व्यक्तींची सुधारणा हि मालिश मुळे झाली आहे शेंगदाणा तेलाने नाही हे सिद्ध झाले.
सन १९३ ते १९३७ कार्व्हर यांनी यु. एस. डी. ए. च्या रोगनिदनाच्या सर्वेक्षणामध्ये भाग घेतला होता. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण हे झाडांचे रोग आणि कवकशास्त्र या विषयांमधुन झाले होते.कार्व्हर यांनी १९३७ साली चर्मर्गी म्हणजे शेती रसायन शास्त्र यांच्या दोन परिषदेत हजेरी लावली होती. कार्व्हरची तब्येत वयोमानानुसार घसरायला लागली होती. त्यामुळे त्यांच्या टस्केगी युनिवर्सिटीच्या खोली जवळ एक लिफ्ट बसवली गेली. कार्व्हर सारख्या वयोवृद्ध माणसाला जिने चढउतर करायला लागु नये म्हणुन ही तरतुद केली गेली होती.
कार्व्हर हे आयुष्यभर साधेपणाने राहिले होते. कार्व्हर यांनी सत्तरीत असताना त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी म्हणुन आपल्या शोधांचे आणि संशोधनाचे मिळुन एक संग्रहालय प्रस्थापित केले. सन १९३८ मध्ये त्यांनी टस्केगी मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर फाऊंडेशनची स्थापना केली.या फाउंडेशनची स्थापना करण्यासाठी त्यांनी ६०००० डॉलर म्हणजे आजच्या काळातले जवळपास एक लाख डॉलर दान केले.