कार्व्हर यांचे अमेरिकेचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या हालचाली त्याच्या मृत्यूच्या अगोदरच सुरू झाल्या होत्या. दुसरे महायुद्ध असल्यामुळे राष्ट्रपतींच्या आदेशामुळे अशा युद्धविरहित खर्चावर बंदी घालण्यात आली होती. मिसुरीचे सेनेटर हॅरी एस. ट्रूमॅन यांनी स्मारकाच्या बाजूने बिल प्रायोजित केले. विधेयकावरील सुनावणीच्या समितीमध्ये एका समर्थकानी ब्रेक राजकारण केले.त्यांनी हे बिल फक्त एका सर्वोत्तम शास्त्रज्ञाला सन्मान देण्यासाठी नव्हे तर संपूर्ण कृष्णवर्णीयांना दिलेले एक बल आहे असे वक्तव्य केले. यामुळे देशातील १५ लाख कृष्णवर्णीयांना युद्धात लढण्यासाठी बळ मिळेल अशी त्यांशी धारणा होती. हे बिल मंजूर ही झाले.
१४ जुलै १९४३ साली राष्ट्राध्यक्ष फ्रांक्लीन डी रोसवेल्ट यांनी जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्या मिसुरीतील पुतळ्यासाठी जागा दिली होती. तसेच राष्ट्र निधीतून तीस हजार डॉलर इतकी रक्कम मंजूर करून दिली. शिवाय त्यांनी या पुतळ्यासाठी आणि तिथे आयता उभ्या असलेल्या वनस्पतीशास्त्रीय बागेसाठी दोनशे दहा एकर इतकी जमीन देऊ केली. अमेरिकेतील हे कृष्णवर्णीयांचे पहिले स्मारक होते. या विस्तृत स्मारकात पाउण मैलाची नैसर्गिक सहल आहे शिवाय १८८१ सालचे मोझेस कार्व्हर यांचे घर आहे आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची समाधी आहे. हे राष्ट्रीय स्मारक जुलै १९५३ साली सर्वांसाठी खुले करण्यात आले. डिसेंबरमध्ये १९४७ साली कारवर संग्रहालयाला आग लागली त्यामध्ये कार्व्हर यांचे बहुतेक संग्रही ठेवलेले साहित्य जळून गेले तर काही खराब झाले. त्यांच्या अठ्ठेचाळीस चित्रांपैकी तीन चित्र जळून गेली. असे होते कार्व्हर यांचे जीवन.