आपण कुठे तरी जाण्यासाठी निघालेलो असतो.... पण कुठे जायचं हे पण माहित नसत आणि कसं जायचं हे पण माहित नसत.. मग सुरू होतो विचारांचा कोलाहल आणि मनाच मनाशीच युद्ध.. .. कधी एक मन हरत तर कधी दुसरं ... कधी एक मन जिंकत तर कधी दुसरं ...
अशा वेळेस गरज असते ती एका वाटाड्या ची... एका समुपदेशकांची पण तो नसतो... मग आपण आपल्याच मनातल्या काही निकषावर ... काही निर्णय घेतो आणि ती थांबलेली आपण थांबलेली जागा सोडण्यासाठी एक पाऊल उचलतो आणि सुरू होतो मग एक प्रवास.... एक असा प्रवास जो कुठे जाणार आहे आणि आपल्याला कुठे नेणार आहे हे माहीत च नसत आपल्याला पण आपल्याला चालावं लागतं आणि पुढं जात राहावं लागतं.
असच चालत असताना कोणी तरी भेटत आणि अपलयाल त्याला विचारावं वाटत पण मनाची हिम्मत होत नाही आणि आपण चालतच राहतो आणि काही अंतर कापतो मग वेळ झालेला असतो म्हणून मग आपला इच्छित पत्ता आपण कुणाला तरी विचारतो आणि तेव्हा कळत ... आपला मार्ग चुकला आपला रस्ता चुकला पण आता काही पर्याय च नसतो आपण खूप लांब त्या मार्गाने आलेलो असतो आणि आणि परत जाण्याचे मार्ग तेव्हा बंद झालेले असतअतात
मग प्रश्न हा आहे की त्या चुकीच्या मार्गानेच चालत जायचं क की परत फिरायचे की नवीन मार्ग शोधायचा की जिथे अपलायल जायचं आहे ते shatlach सोडून द्यायचं.... काय कर्याच.... कश थांबवायचं हे मानायला युद्ध कसा द्यायचा या भरकटलेल्या जीवनाला आकार... खूप अवघड आहे या प्रश्नाचं उत्तर.... पण उत्तर तर दवायच लागेल आणि मार्ग पण शोधावच लागेल ..
या अशा वेळी जर तुमचं कोणी सोबती असेल तर ते असनार .... तुम्ही स्वतचं आणखी दुसरं कोणी ही नाही.... ज्या मनाने काही काळापूर्वी तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवला किंवा तुमचं रस्ता भरकत्वला आता तुम्ही त्यालाच तुमचा सोबती बनवा आणि दोघं पण सोबत चला... तरच तुम्ही जिथे जायचं आहे तिथे पोचू शकाल... सर्व जग सरी दुनिया जरी तुमच्या सोबत नसली तरीही तुम्ही तुमच्या सोबत रहा... जर तुम्ही तुमच्या सोबत असला ना तर तुम्हा ल कोणीच हरवू शकणार नाही....
पण हे वाटत तितकं सोपं नसतं... पण हे आपल्याला करवच लागत... कारण साऱ्या प्रश्नाचं उत्तर यातच अस्त...
So. ..Be yourself..live yourself and win the world