माझ्या बापाची झोपडी पाहून,
नकार देशील तु कदाचित
पण तुझ्या घराला स्वर्ग बनवायचा प्रयत्न
मी नक्की करेन मी....
नसेल मी तुझ्याएवढी शिकलेले,
पण आपली माणस जपायला,
आणि माणुसकी मात्र शिकले मी ......
असेल मला रानावनात ,काट्याकुट्यात,
अनवाणी फिरायची सवय;
पण ,
पार्टीमध्ये साडीतही तुझ्यासोबत उठून दिसेल मी.....
तुझ्या अपेक्षा एवढे पैसे नसेल कमावत मी,
पण,
तुझ्या प्रत्येक येणाऱ्या परिस्थितीत!
न हट्ट करता,खुश राहीन मी.....
दिसत नसेल मी सुंदर!
तुझ्या मनातल्या राणीसारखी,
पण!
मनाने मात्र तू विचार केला नसेल
त्याहून निर्मळ असेल मी........
असेल मी शांत,
पण!
आलचं एखाद संकट तुझ्यावरती,
तर!
तेव्हा मात्र तुझा आधार बनून,
तुझ्यासोबत असेन मी.......
प्रत्येक वेळी नाही व्यक्त करता येणार,
मला माझं प्रेम,
सीता नाहीये मी,
पण!
तेवढी प्रामाणिक तुझ्याशी असेन मी.........
माहीत नाही!
तुला मी आवडेल की नाही,
पण!
संधी मात्र दिलीच
तर,
शेवटच्या श्वासापर्यंत तुझीच असेल मी.....
प्रा. शुभांगी राजगुडे