भरू आयुष्यात रंग
आयुष्य रंगीत करू
उधळीत स्वप्न रंग
आनंदीत होळी करू ॥

रेलचेल जिव्हाळ्याची
नात्यांना  देऊ उभारी   
निसटलेल्या क्षणाची
दिवाळी  करू साजरी  ॥

भरकटलेल्या मना
हळूच कवेत घेऊ
दोन प्रेमाच्या शब्दांनी
सौख्याचा रंग उधळू॥

गोंजारता आयुष्याला
हळूच कवेत घेऊ
पांघरताना वात्सल्य
सुखस्वप्न मार्गी लावू  ॥

सौ.अर्चना जितेंद्र परदेशी
लासलगाव

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel