सन ऑफ सॉईल

ह्या चित्तथरारक कथेचा काळ साधारण आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा आहे. दिनांक २२ जुलै १९४७ रोजी द रॉयल एअर फोर्सचा माजी कमांडर आपल्या घरात सहपरिवार रात्रीचे जेवण घेत होता. तो आणि त्याची पत्नी आपल्या लहान नऊ महिन्याच्या मुलांबरोबर गप्पा मारत, चांगला वेळ घालवत होते. साधारणतः रात्रीेचे दहा वाजले असतील. त्या शांत रात्रीला छेद देणारा फोनचा आवाज झाला. रात्री अचानक फोन खणालला. त्याने फोन उचलला. काही क्षणातच त्याला कळले की हा फोन माननीय पंतप्रधानांच्या ऑफिसमधुन होता. फोनच्य दुसर्‍या बाजुला त्याचा मित्र बोलतो आहे हे ही त्याने आवाजावरुन ओळखले. त्याचा मित्र त्यावेळचे माननीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऑफिसमध्ये काम करत होता. तो पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये नियुक्त अधिकारी होता. 

प्रसंगोपाताने हा माजी कमांडर जवाहरलाल नेहरुंचा चांगला मित्र आणि शुभचिंतक ही होता. काही वेळ तो नेहरुंशी बोलला. तेव्हा त्याची चर्या गंभीर होती. फोनवरचे बोलणे झाल्यावर तो शांतपणे जेवणाच्या टेबलाजवळ येऊन बसला. त्याची ती शांतता कमांडरच्या पत्नीला अस्वस्थ करणारी होती. थोड्यावेळाने त्याचा चेहराही बघणार्‍याला कळेल इतका विचलीत दिसत होता. त्याची मानसिक अनुपस्थिती त्याच्या बायकोने हेरली. त्याची तशी अवस्था पाहुन तिने कमांडरच्या खांद्यावर धीराने हात ठेवला आणि विचरले,

"काय झाले आहे? आपण इतके त्रस्त का दिसत आहात? हा कोणाचा फोन होता?"

"मला तातडीने माझ्या वैयक्तिक विमानाने इंडोनेशियाला जावे लागेल..!!" कमांडर उद्गरला.

पुढे त्याने सांगितले,

"तुला तर माहितीच आहे जेव्हा ही नेहरुजींचे निर्देश मला मिळतात तेव्हा मी त्यास अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक समजतो. मला एका व्ही.आय.पी व्यक्तीला डच सैन्याच्या तावडीतुन गुप्त पद्धतीने वाचवुन भारतात आणायचे आहे. ही व्यक्ती इंडोनेशियामध्ये आहे. अशा परिस्थितीत, सह-पायलटला माझ्याबरोबर जावे लागते परंतु ही एक गुप्त मोहिम आहे. मला यामोहिमेसंबंधीत जोखिम माहिती असतना देखील अश्या वेळी मी एखाद्या व्यक्तीस यात समाविष्ट करावे की नाही ही द्विधा मनस्थिती झाली आहे...!"

एक स्मित देऊन त्याच्या पत्नीने उत्तर दिले,

"प्रिय पती, मी एक पायलेट म्हणुन ९०० तास उड्डण करण्याचा परवाना मिळवला आहे. हे तु विसरलास का??? मी तुला सोबत करु शकेन इतकी कुवत कदाचित असेलच ना?  काळजी करू नकोस मी ऑपरेशनमध्ये तुझ्याबरोबर आहे. मी साथ देईन तुला."

आपल्या पत्नीकडून आलेला हा प्रस्ताव पाहून ते जरा गोंधळलाच होता. त्याने तिला विचारले की,

"आपल्या चिमुकल्या नऊ महिन्यांच्या बाळाला सोडून दोघेही कसे या मोहिमेवर जाऊ शकतो?"

बायकोने उत्तर दिले, "अरे, तु त्याची काहिच काळजी करू नकोस. फक्त काही तासांची बाब आहे. आपण मोहिमेवरुन परत येईपर्यंत आया बाळाची काळजी घेईल."

तिने हे विधान ईतक्या आत्मविश्वासाने आणि अश्या आविर्भावात केले की जणू काही रात्रीच्या छोट्याश्या समरंभासाठीच बाहेर पडणार आहेत आणि समारंभ आटोपुन घरी येणार आहेत.. तिने आपल्या बोलण्यातुन ते दोघं एखाद्या जोखमिच्या मोहिमेवर जात आहेत, त्या मोहिमेची काळजी वाटतेय असे कुठेच दर्शवले नाही..! तिचे हे आत्मविश्वासाने भरलेले बोल ऐकुन त्याचे उर भरुन आले.

या संवादानंतर त्यांच्या आयुष्यात जे काही घडले त्यामुळे एक इतिहास लिहिला गेला. हि घटना आधुनिक भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली होती. ते दोघे या मोहिमेसाठी तयार झाले. त्यांनी पालम विमानतळाकडे जाण्यासाठी आपले निवासस्थान आणि अवघे नऊ महिन्याचे बाळ आयाकडे सोपवुन कंबर कसली. पालम विमानतळावर त्यांचे वैयक्तिक डकोटा विमान त्यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत सज्ज होते. ए.टी.सी.ने उच्च अधिकार्‍यांनी दिलेल्या विशेष सूचनांवरुन त्या विमानाचे उड्डाण करण्यास परवानगी मिळवली होती.

विंग कमांडर यांनी आपल्या पत्नीसमवेत जकार्ताला मोहिमेसाठी उड्डाण केले.

इंडोनेशियन इतिहास जरा रंजक आणि अलिकडेच घडलेला आहे. इंडोनेशिया हा अनेक बेटांचा एकत्रित असलेला देश. सन १८१६ पासुन ही इंडोनेशियन बेटं डच सत्ताधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली होता.  हाच इंडोनेशियन बेटांचा समुह जपानी सैन्याने दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी डचांचा पराभव करुन ताब्यात घेतला होता. डच सैन्य आणि अधिकार्‍यांनी जपानी सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. जेव्हा डचांनी जपान्यांना आत्मसमर्पण केले तेव्हा इंडोनेशियातील एका राष्ट्रवादी पक्षाच्या सुकर्णो यांनी स्वतंत्र राष्ट्र घोषित केले होते.

सुकर्णो हे एक इंडोनेशियन राजकारणी, समाजकारणी, राष्ट्रवादी आणि क्रांतिकारक होते. सुकर्णो स्वतंत्र इंडोनेशियाचे पहिले अध्यक्ष ही होते आणि त्यांनी १९४५ ते १९६७ राष्ट्रउभारणीचे काम केले होते. डच वसाहतवाद्यांपासून इंडोनेशियातील स्वातंत्र्यलढ्यात सुकर्णो प्रमुख नेते होते.

जेव्हा स्वतंत्र इंडोनेशियाची घोषणा झाली तेव्हा मोठ्य बहुतेक बेटांवर डचांनी आपले नियंत्रण ठेवले होते. तथापि, इंडोनेशियाच्या विविध प्रभागांतुन होणार्‍या चळवळींच्या दबावामुळे डचांनी २५ मार्च, १९४७ रोजी इंडोनेशियाच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी सहमती दर्शविली. डचांनी विविध सबबी पुढे करत इंडोनेशियन स्वातंत्र्याला उशीर होइल असे अनेक डावपेच आखले.  शेवटी डच सैन्याने २१ जुलै, १९४७ रोजी मर्डेका पॅलेसला घेराव घातला आणि सर्व इंडोनेशियन मंत्र्यांना तुरूंगात टाकले.

सुकोर्णो आणि तत्कालिन पंतप्रधान सुलतान जहरीर हे भूमिगत झाले होते. डच सैन्याची देशावर पकड अजुनही मजबुत होती. त्यांनी देशाच्या सीमांलगतच्या भागांवर कडेकोट बंदोबस्त केला होता. यामुळे सुलतान जहरीर आणि सुकर्णो देश सोडून जाऊ शकत नव्हते. इंडोनेशियामधील नेमकी परिस्थिती जाणुन घेण्यासाठी व त्यावर काही तोडगा शोधण्यासाठी जहरीर यांची सुटका होणे संयुक्त राष्ट्र आणि जगासाठी अत्यंत महत्वाचे होते.

अशा आणिबाणीच्या परिस्थितीत भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची मदत घेण्यात आली होती. यासाठीच विंग कमांडर यांना ही जोखिमेची मोहिम देण्यात आली होती. हि कारवाई भारताकडुन झाली होती. २४ जुलै रोजी, डकोटा हे वैयक्तिक विमान पालम विमानतळावर केवळ एका यात्रीला घेऊन अवतरले होते. ही जोखमिची आणि चित्तथरारक मोहिम संपली होती.

हॉलंडकडून म्हणजेच डच अधिपत्यतुन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, कृतज्ञता, प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक म्हणून, इंडोनेशियाने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "सन ऑफ सॉइल" विंग कमांडरला प्रदान केला होता. हा पुरस्कार प्रथमता मिळवणारा मनुष्य एक भारतीय विंग कमांडर होता.

सन १९४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर, या विंग कमांडर कम पायलट यांना स्वतंत्र भारताच्या मंत्रीमंडळात पद देण्यात आले. विंग कमांडर यांना मंत्रीमंडळातील पोलाद व खाणी मंत्रालयाची जबाबदारी सांभाळण्यासाठी नियुक्त करण्यात आले. हेच विंग कमांडर कालांतराने ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.

या ऐतिहासिक घटनेचे शिल्पकार हे विंग कमांडर शिवाय पायलट श्री बिजू पटनायक आणि त्यांची स्वातंत्र्यपुर्व भारतातील लाहोरची पंजाबी पत्नी ज्ञान सेठी ह्या होत्या. योगायोगाने त्या भारत देशातील पहिल्या व्यावसायिक महिला पायलट ठरल्या होत्या. ते नऊ महिन्यांचे बाळ म्हणजे ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. नवीन पटनायक हे आहेत..!

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या काळातही अनेक महारथींनी इतरांचे आयुष्य वाचवण्यसाठी शर्थीचे प्रयत्न करुन आपल्या देशाचा नावलौकिक वाढवला आहे. अश्या अनेक रथी-महारथींना बुकस्ट्रक मानवंदना देतो.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel