ध्रुवाची तू ग चांदणी,
जावून बसलीस तारांगणी,
गाण्याची तू तर पट्टराणी.
|| जावून बसलीस तारांगणी,
ध्रुवाची तू ग चांदणी||
मंगेशकरांची ग कन्या गुणी,
घरामधील थोर अन् महा धोरणी,
मोहित झाले तव गाण्यावर हिंदुस्थानी ,
अशी तू ग ध्रुवाची चांदणी ||धु||
सकाळ होते तव मधुर भजनी,
दु:खी मने स्वर ऐकता जाती भरुनी ,
बालकांची कोमल मने ऐकती बालगाणी,
वीरांना वाहिली अंजली तू गाउनी विराणी,
सदैव अढळ अशी ग ध्रुवाची चांदणी ,
निद्रादेवीला प्रसन्न करीशी अंगाई गाउनी,
घायाळ सैनिकांना धीर देशी,
तू आपल्या गोड स्वरांनी,
अशी तू ग ध्रुवाची चांदणी ||धु||
गेलीस तू मंगेशा परी,
दुसरे होणार नाही ग कुणी ,
तू तर ध्रुवाची चांदणी ||धु ||
श्रीमती सीमा रमेश जोशी
बोळींज, विरार
16/02/2022
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.