लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत. हे तत्त्व आपल्याला आपल्या ध्येयांकडे आणि स्वप्नांकडे आकर्षित करते. तुम्ही नेहमी जो विचार करता तसे घडत जाता. या आकर्षणाच्या सिद्धांताचे नेमके रहस्य काय आहे? आणि ते आपल्या दैनंदिन जीवनात कसे कार्य करते हे आपण जाणून घेऊया.  

तुमचा या आकर्षणाच्या सिद्धांतावर विश्वास असो वा नसो, परंतु तो नेहमी तुमच्यावर काम करत असतो. तुम्ही कुठेही जा,  काहीही विचार करा किंवा कोणतीही कृती करा, हा आकर्षणाचा सिद्धांत तुमच्याशी सतत जोडलेलाच असतो.

विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की जेव्हा आपण काही विचार करतो तेव्हा आपल्या मेंदूतून काही किरण बाहेर पडतात. जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर तुमच्या मनातून सकारात्मक किरण बाहेर पडतात आणि जर तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मक किरण बाहेर पडतात. आपल्या मनातून निघणारी ही किरणे, आपण जसा विचार करतो, तशाच प्रकरच्या गोष्टी चुंबकाप्रमाणे आकर्षित करतात.

काहीवेळा लोक म्हणतात

"अरे, मी सकाळी तुझीच आठवण काढत होतो आणि तुला इथे रस्त्यात भेटलो"

"रात्री मी स्वप्नात पाहिले की आज रिजल्ट कळेल आणि आज खरोखरच रिजल्ट नेटवर आला. "

"अरे, मी खरच तुला मिस करत होतो आणि इतक्यात तुझा फोन आला"

अशा अनेक गोष्टी आपण रोज ऐकतो, पण हा निव्वळ योगायोग असतो का? याचा कधी विचार केला आहे का? हाच "आकर्षणाचा सिद्धांत" आहे.

तुमचे मन तुम्ही जसा विचार करता तसे परिणाम द्यायला सुरुवात होते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला नोकरी मिळेल, तर तुम्हाला नोकरीचे ईमेल, नोकरीच्या जाहिराती ठिकठिकाणी पुन्हा पुन्हा दिसू लागतील

तर मग हा आकर्षणाचा सिद्धांत नेमका कसा काम करतो ते जाणून घेऊया. मित्रांनो, आपण अनेक लोकांकडून अनेकवेळा ऐकले असेल की, एखाद्या मंदिरात जाऊन एखादी इच्छा देवा जवळ व्यक्त केली तर ती इच्छा पूर्ण होते आणि असे केल्याने अनेक लोकांच्या मनोकामना प्रत्यक्षात पूर्ण होताना आपल्याला दिसतात. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन एखादी इच्छा व्यक्त करता किंवा नवस मागता तेव्हा तुम्ही हे मनापासून स्वीकारता की तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल कारण या मंदिरात सर्वांची इच्छा पूर्ण होते आणि जेव्हा तुमचे मन हि गोष्ट स्वीकारते तेव्हा ते तसे कार्य करु लागते. तुमच्या मनातून सकारात्मक किरण बाहेर पडतात, तुमच्या मनात सकारात्मक विचार येतात आणि आकर्षणाचा सिद्धांत तुम्ही जत गोष्टींचा विचार केलेला असतो त्या गोष्टी तुमच्याकडे खेचतो आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात.

स्वामी विवेकानंद यांचा एक सुविचार आहे - “माणूस जसा विचार करतो तसा तो बनतो.”

स्वामीजींची ही गोष्ट १०० टक्के खरी आहे आणि ही गोष्ट आकर्षणाचा सिद्धांत देखील खरा असल्याचे सिद्ध करते. तुम्ही जसा विचार करता, तसे तुमचे विचार बनत जातात, तुमचे आचरण देखील तसेच बनते आणि तुमचे आचरण तुमचे चारित्र्य घडवते. तर थोडक्यात तुमची विचारसरणी तुम्हाला घडवते.

आकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे नुसता विचार करून तशा गोष्टी घडतात का? आता अनेकवेळा लोकांच्या मनात प्रश्न येतो की केवळ आकर्षणाच्या सिद्धांताचा केवळ विचार करून यश मिळेल का? जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की तो आयआयटी मध्ये टॉपर होऊ शकतो, तर तो केवळ सकारात्मक विचार करून टॉपर होईल का?

ओम शांती ओम या चित्रपटात शाहरुख खानचा एक डायलॉग आहे.

“अगर आप किसी चीज को पूरी शिद्दत से चाहते हैं, तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने की तैयारी में जुट जाती है”

"जर तुम्हाला मनापासून खरोखर काहीतरी हवे असेल, तर संपूर्ण विश्व ते तुमच्यापर्यंत आणण्याचा कट रचते."

जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की त्याला आयआयटीमध्ये टॉपर व्हायचे आहे, तर आकर्षणाचा सिद्धांत त्याला त्याच्या गंतव्यस्थानाकडे आकर्षित करून नेईल आणि चांगला अभ्यास करण्यास प्रवृत्त करेल. जर आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला अभ्यास करण्यास प्रवृत्त करत नसेल, तर कुठेतरी तुमच्या विचारात कमतरता आहे, तुमचा स्वतःवर विश्वास नाही आणि त्यामुळे तुमच्या मनातून सकारात्मक किरण बाहेर पडत नाहीत.

तर वाचक मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत पूर्णपणे तुमच्या प्रत्येक विचाराशी निगडीत आहे,  हा आकर्षणाचा सिद्धांत प्रत्येक परिस्थितीत तुमचे अनुसरण करत असतो. त्यामुळे तुम्हाला जे हवं आहे त्याचाच विचार करा, तुम्हाला जसं बनायचं आहे तसा विचार करा, तुम्हाला जे आयुष्यात मिळवायचं आहे त्याचा विचार करा,  मग बघा आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानाकडे आकर्षित करून नेईल.

तर मित्रांनो,  तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंट द्वारे जरूर कळवा. तुमच्या टिप्पण्या आम्हाला चांगले लेखन करण्यासाठी प्रेरित करतात. धन्यवाद!!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel