वालीने सुग्रीवाचे राज्य घेतले आणि त्याची बायको हि पळवून नेली. त्यामुळे सुग्रीव चिंतीत झाला. तो मारुतीला बरोबर घेऊन राम लक्ष्मण मदत करतील का म्हणून विचारण्यास त्यांच्याकडे गेला. किम्किया पर्वतावरच त्यांची भेट झाली. तेथे सुग्रीवाने पाहिले की रामाचा बाण सात झाडांना पार करून जातो. तेव्हा त्याला विश्वास वाटला. सुग्रीव राम लक्ष्मणांबरोबर किष्किधानगरीत आला. त्यानें वालीला युद्धाला बोलाविलें. सुग्रीवाची हाक ऐकतांच वालीयुद्धास निघाला. पण ताराने त्याला अडविलें.

तारा म्हणाली, “दारल्यानंतर पुन्हां तो युद्धाला बोलावीत आहे तेव्हां त्यांत काही तरी काळे बेरें खास आहे. तुम्ही मंत्र्यांचा विचार घेतल्याशिवाय जाऊ नका."

पण वाली का कोणाला दाद देणार...! तो तसाच युद्धाला गेला. दोघांचे युद्ध सुरू झाले. बराच वेळ ते दोघे लढत राहिले. शेवटी वालीने एक असा बाण सुग्रीवावर सोडला की घायाळ होऊन तो खाली पडला. हनुमानानें रामाला त्याच्या वचनाची आठवण करून दिली. रामाने वालीवर एक बाण सोडला. बाण लागल्याने वालीला मूर्छा आली. पण थोड्याच वेळांत तो सावध झाला आणि त्याने तो बाण उचलुन पाहिला.

त्यावर रामाची मुद्रा ओळखून तो रामाला म्हणाला, "रामा, अशा त-हेनें मारण्यांत अधर्म नाहीं काय ?"

त्यावर राम म्हणाला, "पशूवत प्राण्याला तसे मारण्यांत मुळीच अधर्म नाही आणि दुसऱ्याची बायको पळवून आणून तिला आपली बायको म्हणणे हे मनुष्यत्वाला साजें से काम नव्हे."

एवढें होई तो पर्यंत वालीचा अंतकाळ जवळ येऊन ठेपला. त्याने आपला मुलागा अंगद याला बोलाविले आणि त्याला सुग्रीवाच्या स्वाधीन केले. आपली कंठी सुग्रीवाच्या गळ्यांत घातली. नंतर मारुतीने त्याला पाणी आणून दिले. ते पिऊन त्याने प्राण सोडला. वाली, राज्य रामाने सुप्रियाला दिले, त्या नंतर रामाच्या मदतीसाठी त्याने आपली सारी वानर सेना दिली. सीतेच्या शोधासाठी त्याने चारी दिशांस आपले वीर पाठविले.

अंगद व मारुती दक्षिण दिशेला गेले. तेथे त्यांना समजले की सीता लंकेत आहे. त्यांना एवढे कळतांच तिला तेथून शोधून काढण्यासाठी हनुमानाने हवेत उड्डाण केले आणि समुद्र ओलांडून केला गेला. हनुमानाने सर्व लंकापुरी हूंढाळून पाहिली पण त्यात त्याला सीता कोठेच दिसली नाही. तो एका उंच झाडावर बसून विचार करीत होता की सीता कोठे दिसेल??

तो मनांत म्हणाला, "काय मूर्ख आहे रावण..! इतके सुंदर वाडे, शोभीवंत उद्याने, उत्तमोत्तम फळा फुलांच्या बागा आणि हे वैभव रावण आपल्या हट्टीपणामुळे नष्ट करून टाकणार आहे. रामाच्या शक्तीची त्याला कल्पना नाही."

थोडा वेळ विश्रांति घेतल्यानंतर हनुमान पुन्हा उठला आणि सीतेला शोधू लागला. त्याने नदी घाट पाहिले. उद्यानांत फिरुन पाहिले. रावणाच्या बंदीशाळेत डोकावून पाहिले. पण त्याला कोठे हि सीता दिसली नाही. त्याने येतांना सीतेला दाखविण्यासाठी रामाची अंगठी आणली होती. ती पाहून त्याला फार वाईट वाटत होते. शेवटी आता लंके भोवती पुन्हा एकदां चक्कर मारून जावें असा विचार करून निघाला. थोड्या वेळाने त्याला एक सुंदर बाग दिसली. ती पाहून त्याला रावणाच्या वैभवाचे आणि त्याच्या आवडीचे व हौशीचे कौतुक वाटले.

त्या बागेत एका झाडाखाली सीता बसली होती. तिच्या भोवती बसून राक्षशीणी पाहारा देत होत्या. रावणाने सीतेला अशोक वाटिकेत ठेविलें होते. तो रोज येई आणि आपल्याशी विवाह करण्यासाठी तिला विचारी. ही गोष्ट तिला इतकी असह्य झाली की जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे असेंच तिला वाटू लागले. परंतु राम केव्हांना केंव्हातरी येऊन आपली सुटका करतील ह्या आशेवर ती जगली होती.

हनुमान सीतेला खूण पटवून द्यावी या विचारांत होता. इतक्यांत दोघां मशालीच्या बरोबर रावण सीतेकडे येत असलेला त्याला दिसला. तो झाडावरच लपून बसला आणि रावणाच्या सर्व हालचाली बारकाइनें पाहूं लागला.

रावण सीतेला म्हणाला, “वेड्या मुली..! किती दिवस अशी रडत बसशील. अग तो राम का आता तुला सोडविण्यास येणार आहे..! विसर त्याला. मी बघ तुला सर्व तऱ्हेचे सुख देतो. तूं माझ्याशी लग्न कर आणि मग पाहा. रावणाचे अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून मारुतीला फार राग आला. त्याने आपल्या मनाशी निश्चय केला की एकदां खोड मोडली पाहिजे."

रावणाचे ते अभद्र शब्द ऐकून सीता चिडली.

सीता म्हणाली, “माझा तुला शाप आहे."

सीतेच्या पातिव्रत्यामुळे खरोखरच तिच्या वाणीने सारे अंग गरम झाले आणि तो घाबरून निघून गेला. नंतर हनुमान दळूच खाली उतरला आणि सीतेजवळ जाऊन त्याने मी रामाचा दूत आहे असे सांगितले.

हनुमान म्हणाला, "आपल्या विरहामुळे रामचंद्र अगदी दुःखी कष्टी आहेत.”

सीतेला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा हनुमानाने रामाची अंगठी तिला दाखविली. आपली हकीकत सांगितले. वाली सुग्रीवाच्या युद्धाची हकीकत सांगितली. सुग्रीव आणि रामाच्या मैत्रीचे वर्णन केले.

हनुमान म्हणाला, "मी रामचंदाच्या आज्ञेवरून येथे आलो आहे. लवकरच ते लंकापुरीत येतील आणि रावणाचा वध करून तुमची सुटका करतील."

"माझी चेष्टा चालविली आहे रावणाच्या मायावी राक्षसांनी...! की हे सारे स्वम आहे...!" सीता आपल्याशीच म्हणाली.

"यांत शंका करण्याचे कारण नाही. खरोखरच मी रामाचा दूत आहे. त्यांच्या कडूनच आलो आहे." मारुतीने विश्वास दिला.

“असे असेल तर त्यांना माझी हकीकत कळवा. पण त्यांना माझ्यामुळे दुःस्व होणार नाही ना!" सीतेचा निरोप घेऊन तो जाण्यास निघाला.

जाताना आपल्या आगमनाची बातमी रावणाच्या कानावर घालावी असें त्याला वाटले. त्याचा राग वाढत चालला होता. त्याने आपला हा राग अशोक बारिकेवर काढला. ज्या बागेतील एक फूल सुद्धां तोडण्याची मंदोदरीची इच्छा नव्हती त्या मनमोहक उद्यानाचा मारुतीने अक्षरशः नाश केला. शंकुकर्ण नावाच्या वाटिका रक्षकानें रावणाला कळवितांच त्याने मारुतीला पकडण्यासाठी त्याने आपल्या सैन्याची एक तुकडी पाठविली.

मारूतीने राक्षसांना मारले. त्यानंतर अक्षाबरोबर पांच सेनापति आले. त्यांनाही त्याने मारून टाकले. थोडक्याने ऐकणारे हे माकड नव्हे असें वाटून रावणानें युवराज इंद्रजितला पाठविले. मारुतीने त्याच्याशी सुद्धा युद्ध केले, पण थोड्या वेळाने आपल्याला पकडवून घेतले, कारण त्याला रावणाला पाहावयाचे होते.

रावणाला मारुतीची हिम्मत पाहून पूर्वी जुनी आठवण झाली. रावणाने शंकराची भक्ति करून वर मागून घेतला होता. तें पार्वती आणि नंदीला न आवडून त्यांनी शाप दिला होता. तोच शाप हा असावा असे त्याला वाटले. त्याने मारुतीला आपल्या समोर आणण्यास सांगितले व विभीषणाला हि बोलावणे पाठविलें.

रावणाने मारुतीला विचारले “कोण तूं?”

"मी हनुमान वायुदेव आणि अंजनीचा पुत्र आणि रामाचा दूत आहे. ऐक त्यांचा निरोप." रामाचे नांव ऐकताच रावण खवळला.

म्हणाला,"मारून टाका या माकडाला."

“दादा, किती झाले तर तो दूत म्हणून आला आहे. त्याला शिक्षा करणे अन्यायाचे आहे. ल्याने आणलेला निरोप तरी ऐक...! मग काय करावयाचे ते कर..." विभीषणाचे म्हणणे मान्य करून रावणानें मारुतीला रामाचा निरोप सांगण्याची आंज्ञा दिली.

"रामचद्रांनी सांगितले आहे की त्रिभुवनांत कोठे हि स्वरक्षणासाठी धांवलास, प्रत्यक्ष शंकराची मदत मिळविलीस तरी माझे बाण तुला लवकरच यमलोकांत पाठविणार आहेत." मारुतीने निरोप सांगितला.

"अस्स! माझ्या शस्त्रास्त्रा समोर आजपर्यंत कोणी टिकू शकले नाही. सर्व त्रिभुवन माझ्या आधीन आहे. इतकेच नव्हे तर मी कुबेराकढून त्याचे पुष्पक विमानसुद्धा आपल्या ताब्यात घेतले आहे. तो राम ! तो मर्त्य लोकांतील एक साधा माणूस ! तो काय मला मारतो..!" रावण कुत्सित हास्य करून म्हणाला.

"एवढा पराक्रमी आहेस मग सीतेला कपटाने पळवून कां आणलेस?" मारुतीने विचारले.

मारुतीचे उत्तर विभीषणाला आवडले. पण रावणाला ते झोंबलें. त्याचा राग कोणावर तरी काढावयाचा म्हणून तो विभीषणाला म्हणाला, "फितुरी सुचते आहे वाटते..?"

“तसं नव्हें दादा. पण अन्यायाने व्यर्थ कुल नाश होईल. त्या पेक्षां बऱ्या बोलाने सीतेला परत पाठविलेलें बरें." विभीषण म्हणाला.

पण उन्मत्त रावणाला का ते पटणार...! हनुमानाला त्याच्या त्या बढाया आणि रामाची निंदा ऐकवली नाही.

तो म्हणाला, "तूं श्रीरामांचा अपमान करीत आहेस...! साक्षात् विष्णू आहेत विष्णू, ही सारी तुझे दिवस भरल्याचीच लक्षणे आहेत."

क्रोधाने रावणाचे सर्व अंग थर थर कापूं लागलें, “त्याला खरे म्हणजे मारूनच टाकलें पाहिजे. पण केवळ हा दूत म्हणून आला आहे म्हणून त्याच्या शेपटीलाच आग लावून सोडून द्या."

मारुतीच्या शेपटीला चिंध्या बांधून ती पेटवण्यात आली.

“ए माकडा, जा आपल्या रामाला जाऊन सांग की मी तुझी बायको पळवून आणली आहे. तुझा अपमान आहे असे जर तुला वाटत असेल तर आणि जर तलवार हातांत धरता येत असेल तर माझ्याशी युद्ध करून ने आपल्या बायकोला सोडवून." रावण ऐटीत म्हणाला.

मारुती निघून गेल्यावर विभीषणाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर रावणाने उलट त्यालाच हद्दपारीची शिक्षा दिली. मारूतीने जातां जातां सारी लंकाच पेटवून दिली. मारुती लंकेतून परत येईपर्यंत राम लक्ष्मण आणि सुग्रीव त्याच्या सर्व सैन्यासह समुद्र किनाऱ्याला येऊन बसला होता.

मारुतीला पाहताच त्यांना हर्ष झाला. सुद्धा आश्चर्य वाटले. कारण अग्नि देवाने सीतेला वाचविले होते. अग्नीत जळून भस्म होण्याऐवजी सीता जास्तच तेजस्वी दिसू लागली. तिच्या तेजानें सारी लंकापुरी चमकली.

अग्निदेव प्रकट झाला आणि रामाला म्हणाला, "ही अनिंद्य आणि निष्कलंक आहे. ही लक्ष्मी आहे. पवित्र आहे."

“त्याची मला खात्री होतीच. पण त्याची साक्ष साऱ्या जगाला पटावी म्हणून मला कठोर होणे भाग पडले." राम म्हणाला.

त्याच ठिकाणी अग्निदेवानें राम व सीता यांचा राज्याभिषेक केला. त्या वेळी स्वर्गातून इंद्रादि देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टि केली.

“माझ्या बाणांना शत्रुपर्यंत पोहोचण्याला फक्त हा एवढा समुद्रच आड आहे. तो हि पार झाला की झालें समज आपले काम."

मारुती किना-यावर येऊन पोहोचतो न पोहोचतो तोच त्याला विभीषण हि येतांना दिसला. त्याला ओळखले.

तो रामाला म्हणाला, “हा रावणाचा भाऊ आहे. त्याने त्याला आपल्या राज्यांतून हद्दपार केल्यामुळे इकडे येत आहे."

रामाने त्याच्या स्वागतासाठी लक्ष्मणाला पाठविले. पण सुग्रीवाला त्याच्याविषयी संशय आला. त्याला राक्षसांच्या मायेचा अनुभव होता. परंतु मारुतीने सांगितले की तसे भिण्याचे कारण नाही. लंकेंतच तो आपल्या भावाला समजावून सांगत होता. त्याला आपल्या भावाचे काम मुळीच आवडले नाही. रामाने विभिषणाकडून लंकेची सारी माहिती काढून घेतली व समुद्रावर सेतु बांधण्यासाठी आपल्या सैन्याला आज्ञा दिली.

त्या सर्वानी सेतु बांधला आणि राम सर्व सैन्यासह लंकेत जाऊन पोहोचला. थोड्याच वेळांत नल नील दोघां वानरांना घेऊन रामा समोर आला आणि म्हणाला हे शरण आलेले आहेत. परंतु विभीषणाने त्यांना ओळखले व रामाला सांगितले की ते दोघे रावणाचे विश्वासू सेवक सुक व सारण आहेत. ते हेरगिरी करण्यासाठी आले आहेत. त्यांना शिक्षा झालेलीच बरी. रामाने विचार केला आतां तर युद्ध व्हावयाचेच आहे. मग आत्तांच यांना मारण्याची काय जरूर..!

त्याने त्यांना सर्व वानर सैन्यांत फिरविले आणि त्यांच्याच करवी रावणाला कळविलें की,

“तू विनाकारण हे युद्ध ओढवून घेत आहेस."

लवकरच युद्ध सुरु झाले. राक्षस सैन्यांतील मोठमोठे वीर पडले. कुंभकर्ण पडला. तेव्हा रावणाच्या मंत्र्यांनी त्याला पुन्हां सुचविले की त्यानें बऱ्या बोलाने सीतेला परत करावे. परंतु रावणाचे डोळे अजून सुद्धा उघडले नव्हते. रावणाने आपल्या विधु जिल्हा नांवाच्या कारागिराला राम लक्ष्मणांचे मुखोटे करून आणण्यास सांगितले आणि तो सीतेकडे गेला.

रावण म्हणाला, "अजून तरी आपला हट्ट सोड, राम लक्ष्मण युद्धांत मारले गेले आता तुला सोडवायला कोण येणार...!”

सीतेचा त्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. पण तेवढ्यातच त्या कारागिरानें राम लक्ष्मणाचे मुखोटे आणून रावणाला दाखविले. ते पाहून सीता मूर्च्छित झाली, थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर ती दुःख करीत म्हणाली,

“ज्या तलवारीने रामाचे शिर उडाले ती तलवार माझ्या मानेवर पण पडू दे."

"बस ओरडत. इंद्रजिताने त्या दोघांना कधीच मारून टाकले आहे." रावण हे सांगत असतांच,

एक राक्षस धांवत येऊन म्हणाला, "महाराज इंद्रजिताला लक्ष्मणाने मारून टाकले."

"आं..! हे काय वर्तमान तूं आणले आहेस?" असे म्हणत रावण मूर्च्छित झाला.

तितक्यांतच आणखी एका दुतानें येऊन सांगितले की, “रामाच्या सेनेने आपल्या सैन्याचा नाश आरंभिला आहे.”

रावणाचा क्रोध अनावर झाला. तो सीतेला मारण्यासाठी थांबला पण अबलेवर शस्त्र उचलणे पाप आहे, पराक्रमाचा अपमान आहे. असे सांगून राक्षसांनी त्याला अडविले. शेवटी तो चिडला आणि आत्ता जाऊन त्या दोघांना मारून टाकतो म्हणून रथांत बसून समर रणांगणी गेला. राम रावणांचे युद्ध सुरू झाले. दोघे परस्परांवर बाणांचा वर्षाव करीत होते.

रावण रथांत होता आणि राम जमिनीवर. रावणाला ते बरे वाटले नाही. म्हणून त्याने आपल्या सारथीला सांगून एक रथ, त्याच्यासाठी पाठवून दिला. रामानें त्या रथात बसून रावणावर शस्त्र सोडले. ते सरळ रावणाला लागले आणि परत आले. रावण पडला आणि युद्ध संपले. रामाने विभीषणाला लंकेचे राज्य दिले. तो राज्याची निरवा निरव करीत होता. एवढयात त्याला कोणी तरी सीता येत असल्याचे सांगितले.

रामाने विभीषणाला सांगून सीतेला थांबण्यासाठी निरोप पाठविला.

तो म्हणाला, “इतके दिवस रावणाकडे राहिल्यानंतर इकडे येणे म्हणजे कुळाला दुषण आहे."

सीतेने रामाची वाणी ऐकली. तिला फार वाईट वाटले.

ती लक्ष्मणाला म्हणाली, "भाऊजी, चिता रचा आणि त्यात प्रवेश करण्याची आज्ञापण माझ्यासाठी मागून आणा."

रामाची आज्ञा ऐकून लक्ष्मण अवाक् उभा राहिला. त्याचे मन जणु बधिर झाले.

तो मारुतीला म्हणाला, "हनुमाना, तुला शक्य झाले तर तूंच कर ते काम."

"असे का म्हणता. हाच एक मार्ग आहे काय?" मारुतीने विचारले.

लक्षमण म्हणाला, "आपली इच्छा वा विचार आपल्या पुरते. वडील भावाच्या आज्ञेचे पालन करणे माझे कर्तव्य आहे.”

चिता तयार झाली. अग्नि प्रज्वलित झाला. सीतेनें निर्विकार मनाने अग्नीत प्रवेश केला.

केवढे हे धैर्य...!!!

ज्या प्रमाणे एकादा राजहंस सहज गतीने सरोवरांत शिरतो त्या प्रमाणेच, तितक्या सहज रीतीने सीतेला अग्नीत प्रवेश करतांना पाहून रामाच्या मनाला किंचित धक्का बसला.

तो आवेशाने तिला "थांब...!!! थांब...!!!" म्हणून म्हणाला.

सीता थांबली नाही. तो अग्नीप्रवेश पाहून प्रत्यक्ष रामाला सुद्धा आश्चर्य वाटले. कारण अग्नि देवाने सीतेला वाचविले होते. अग्नीत जळून भस्म होण्याऐवजी सीता जास्तच तेजस्वी दिसू लागली. तिच्या तेजानें सारी लंकापुरी चमकली. त्यानंतर अग्निदेव प्रकट झाला.

अग्निदेव रामाला म्हणाला, "ही अनिंद्य आणि निष्कलंक आहे. ही लक्ष्मी आहे. पवित्र आहे."

“त्याची मला खात्री होतीच. पण त्याची साक्ष साऱ्या जगाला पटावी म्हणून मला हि कठोर होणे भाग पडले." राम म्हणाला.

त्याच ठिकाणी अग्निदेवानें राम व सीता यांचा राज्याभिषेक केला. त्या वेळी स्वर्गातून इंद्रादि देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टि केली. असा होता ईश्वाकु वंशाचा राज्याभिषेक आणि सीतेची अग्निपरीक्षा...!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel