कथा आहे सासवड मधली... माझा मित्र सुभाष हा वर्षातून एकदाच मुंबई वरुण त्याच्या कुटुंबा सोबत गावी सासवड ला जात असत त्याचा मोठा भाऊ कैलास हा ही गावी गेला असताना असाच एक दिवस गावी तो त्यांच्या चार पाच मित्रान सोबत बसला असताना त्यांच्या भुतांच्या कथा हा विषय चांगलाच रंगात आला होता न राहून कैलास बोलला " ये...बंद करा तुमचे हे असले फालतू विषय, भुत बीत काय नसते " एक मित्र म्हणाला " तुला काय माहित आहे तू राहतोस तिकडे मुंबई मधे जिथे रात्र दिवस लाइट असते इथे सात वाजले की अंधार पडतो न ही भुत बाहेर पडतात" कैलास हसत हसतच बोलला " सात वाजताच भुत दिसतात तुम्हाला ,,, ज्या मायला लवकरच बसता तुम्ही " (दारू पियाला बसतात असे म्हणायचे होते त्याला ) दूसरा मित्र म्हणाला " लांब कश्याला जायचे आपला जुना पुल हायना...तो ओड्या वरुण जातो बाजार पेठे कड़े तिथे पण भुत दिस्त्यात दिवसा ढवळ्या ,...आता नविन रस्ता झाल्या मुळ तिकड कोण जात न्हाय.....पण जो जो गेला तो तो मेलाय " कैलास पुन्हा जोर जोरात हसतच बोलला " काय तू पण 'म्हणे जो जो गेला तो तो मेला ' तुम्हाला ना गावात काय Time Pass नाहिये ...म्हणून तुम्हाला हे सर्व सुचतेय...बाकि काही नाही " एक मित्र कैलास ला समजाऊ लागला .." हे बघ कैलास तो जे सांगतोय ते खरे आहे...गावातल्या आड़बाजूला अशी खुप घान जागा आहेत तिथे आम्ही ही दिवसाच पण जात न्हाई " कैलास त्या सर्वांकड़े कुचेष्टेने पाहताच बोलला " अरे आडबाजू घान नाहीत तर तुम्ही अडानी आहात न तुमच्या डोक्यात घान भरलेय " कैलास चे हे शब्द कानावर पडताच त्यांच्यातला एकजण ताडकन उभा राहिला न रागा रागाताच बोलला " ये.....कयल्या...तुला काय रताळ माहीत हाय का...तुला गावातला शाम्या न तो इसन्या कोतवालाचा माहित हाय ना ते त्या पुला वरच्या भूता मुळ मेल्यात ...आणि आश्या लय केसेस (चक्क English) झाल्यात गावात....न आम्हाला आडानी म्हणतोय " अजुन एकजण म्हणाला " ती परटाची सगुना काकी ..फाटी गोळा करायला गेली होती पुला खाली ...न त्या नंतर घरातून बोमब्लत जाइची रात्रीची पूला कड...न मेली आठवडयात" दुसर्यानी सांगितले " त्या सगुनेला तर आम्हीच आनले होते पुला खालून ,,,,तिन्हिसंज झाली तरी घरी कशी आली न्हाय म्हणून आम्ही सात आठ जन गेलो होतो तिला शोधायला न ती पुला खाली बसून बडबड करत होती...आम्हाला सग्ळयांना आवरत नव्हती ती म्हातारी ....अचानक बेशुद पडली तव्हा कुठ उचलून आणली...नाय तर आम्हीच गार झालो होतो तव्हा" कैलास ने त्यांना तो जूना पुल कुठे आहे याची विचारना केलि ...त्याला एकाच अटी वर त्यांनी तो पुल कुठे आहे ते सांगितले न ती अट होती की "तू कधीच तिकडे जायचे नाही"" न कैलासने ते कबूलही केले ... पण या सर्वांना भुत वगेरे काही नसते हे दाखवावेच लागेल असा विचार करुण कैलास त्या पुला कड़े गेलाच मे महिना असल्याने कैलास पुला पर्यन्त जाई पर्यन्त चांगलाच घामाघूम झाला होता
कैलास पुला वर येताच त्याला तिथे कमालीचा गारवा जाणवला ...तो मनातच पुट पुटला की " एवडी मस्त रम्य न ठंड जागेला हे लोक घाबरतात ....मुर्ख साले" तेव्हा दुपारचे 12: वाजले होते सूर्य डोक्या वर होता उन्हाचा चांगलाच प्रभाव पडलेला असताना पुलावर कमालीचा गारवा होता म्हणून कैलास तिथेच थांबला थोड़ावेळ ....आता कैलास ने तिथून निघण्याचा निर्णय घेतला न नितक्यात त्याला तिथे एक कुल्फी वाला येताना दिसला तो कुल्फी वाला जवळ येताच त्याला कैलास ने एक कुल्फी दया म्हणून सांगितले तरी तो कुल्फी वाला पुढेच चाललाय हे पाहून कैलास जोरातच ओरडून बोलला " ओ....कुल्फी वाले ...अहो एक कुल्फी दया बोललो " तो कुल्फी वाला तिथेच थांबला न डेऱ्यातुन कुल्फी काडू लागला कुल्फी वाला कैलास पासून 15/20 फुटावर असेल कैलास एका जागी बसून घामाघुम झालेल्या शरीराला गारवा लागल्याने तो सुखावला होता न सुस्तावला होता त्याने कुल्फी वाल्याकडे उठून न जाता हाताने इशारा करत "कुल्फी आणा इकडे " असे म्हंटले...आणि पुला शेजारील परिसरा वरुण नजर फिरकाऊ लागला.. कुल्फी वाल्याने डेऱ्यातुन कुल्फी काडली न कैलास कड़े देत म्हणाला " घ्या ....शेठ तुमची कुल्फी " कैलासने कुल्फी घेण्यास त्या कड़े नजर केलि न कुल्फी घेन्या साठी पुढे केलेला हाथ विजेच्या गतीने मागे घेतला त्याच्या चेहर्यावर भीती दाटून आली होती त्याने पाहिले की कुल्फी वाला त्याच्या पासून 15/20 फुटवरच बसला आहे पण त्याचा हाथ खुल्फी घेउन कैलासच्या अगदी जवळ आला आहे...कैलासने एक नजर कुल्फी वाल्या कड़े टाकली तर तो जोर जोरात हसत होता... कैलासने आव बघितला न ताव तिथून माघारी धूम ठोकली पूलाच्या एका टोकावर पोहचताच त्याला एक बैलगाड़ी दिसली तो धावतच बैलगाड़ी जवळ गेला न बैल गाडीतल्या माणसाला ओरडून सांगू लागला त्या माणसाचा हाथ लांब झाला म्हणून बैलगाडीवाला मानुस बैलगाडी जोरजोरात पळवत होता न त्याने कैलासला बैलगाडित बस म्हणून इशारा केला न कैलासला गाडीत चडायला स्वताचा हाथ पुढे केला कैलास पाहतो तर काय बैलगाडीतल्या माणसाने देखिल हाथ लांब केला होता .... आता कैलास खुप घाबरला होता त्याने गावाकडे जाणार्या रस्त्याकडे धाव घेतली तसा कुल्फी वाला न बैलगाड़ी वाला कैलास कड़े पाहत जोरजोरात हसत होते ..... आणि मधुनच जोरजोरात ओरडत होते ""थांब.....थांब...""
कैलास जीव मुठीत घेउन पळतच राहिला न गावात आला तो पूर्ण घामाघुम झाला होता धाउन धाउन गुदमरला होता ... घरा समोर येताच कैलासने अंग जमिनी वर जोखुन दिले....थोड्या वेळाने घरच्यानचे लक्ष कैलास कड़े गेले हा असा काय करतोय म्हणून त्याला विचारले तर कैलासने झाला प्रकार घरच्यांना सांगितला न त्याच रात्रि कैलास झोपेतच चालत घरा बाहेर निघाला न त्याला गावातल्या एका माणसाने पाहिले न त्याला विचारले " कुणी कड निघाला म्हनायच येव्ह्ड्या रातच्याला "" पण कैलास त्याच्या कड़े काही लक्ष देत नाही हे बघून त्या माणसाने पुढे जाउन त्याचा हाथ पकडला न म्हणाला ""आरर ....तुला विचारतोय कुठ निघालास "" कैलासने त्याचा हाथ जोरात झटकला न त्याच्या कड़े पाहिले कैलासचा विद्रूप चेहरा न पांढरे फटक डोळे बघून तो जोरजोरात बोम्बलू लागला त्याच्या आवाजाने गाव जागे झाले झाला प्रकार त्याने सर्वांना सांगितला पण तो पर्यंत कैलास खुप पुढे निघून गेला होता गावकरी कैलासच्या शोधात पुला जवळ आले तिथे पाहतात तर काय कैलास एकाच जागेवर भवऱ्या सारखा फिरत होता ...काही वेळातच तो जमीनी वर कोसळला सात आठ जनान्नी त्याला उचलायचा प्रयत्न केला पण कैलास त्यांना हलत देखिल नव्हता त्यांच्यातला एका जाणत्या माणसाने हातात माती घेतली काहीतरी पुट्पुटत ती माती कैलासच्या अंगावर फेकली तेव्हा कुठे कैलासला उचलण्यात लोकांना यश आले.
..हे सर्व झाल्या मुळे कैलासच्या घरचे दुसर्याच दिवशी त्याला मुंबईला घेउन आले त्या नंतर कैलास खुप आजारी राहू लागला घरच्यांनी खुप दवाखाने केले पण डाँक्टरान्ना आजराचे निदानच कळुन येत नव्हते काही जन्नानी हा प्रकार जादुटोण्याचा दिसतोय तुम्ही तांत्रिक मंत्रिका कड़े जा असा सल्लाही त्याच्या घरच्यांना दिला पण त्याचे वडील पेशाने वकील होते त्यांचा या तांत्रिक मांत्रिकान वर विश्वास नव्हता न अश्यातच चार महिन्यांनी कैलासचे दुर्देवी निधन झाले.... ( ही करुण कहानी सांगताना शेवटी शेवटी सुभाषच्या डोळ्यातुन अश्रू आले होते त्याच्या या करुण कहानीने मी कोणाचे मनोरंजन कसे करू शकतो या विचार मूळे मी ही कथा आज सहा महीने पोस्ट नाही केलि .. पण कैलास सारखे अजुन कोण अश्या गोष्टीन कड़े दुर्लक्ष करू नये न आपला जीव गमाऊ नये बस याच उद्देशाने मी स्टोरी आज पोस्ट करत आहे ) . . ...................
अविनाश गुरव