पूर्ण चंद्राची ती पुनवेची रात्र होती …. वाउऊऊsssssss….व्हा­उऊऊऊऊऊ …….. . करत स्मशाणाच्या दिशेने पाहून कुत्री जणू जिवाच्या आकांताने इवळत होती….. घनदाट अश्या त्या काळोखात त्यांचा आवाज सर्वत्र कहर माजवत होता इतका कर्णकर्कश….. त्या स्मशानातून जणू वटवाघळे आपापली झाडावरील जागा सोडून …सैरवैर होऊन फडफड फड फड उडत होती….

त्या स्मशानाच्या एका कोपर्यातून घुबड जणू त्या अंधारात मृत्यूराग गात होत…. ते भयाण वातावरण… एखाद्या… अमानवीय ताक्तीच्या.. वास्तव्याची पुष्टी करत होत…. स्मशानातील चांडाळ(स्मशानातील तांत्रिक) आपल्या…. पडक्या जुनाट घरातून खिडकीतील दिवा लावत लावत…. बाहेर धुरकटलेल्या वातावरणात चालणार्या हालचाली पाहत होता …..आणि चिंतातुर होऊन म्हणाला “आई जगदंबे हे काय घडतय …. काय जाणवतय हे मला……

कोणाची चाहूल आहे ही…… काय आहे हे … ना मनुष्य…..! ना श्वापदं.. .आई . धाव! आई जगदंबे …. धाव! ” असे म्हणत त्याने बाहेरच्या वातावरणातील आपली नजर काढून … काठीच्या सहायाने लंगडत लंगडत आत आला आणि आत येऊन … त्याने राखेने … एक लहान वर्तुळ आखले….. आणि तोंडातल्या तोंडात … काहीतरी मंत्र त्याने पुटपुटला व खिशातून थरथरत… कवड्या काढून त्यावर फुंकर मारली….. आणि मुटठी फिरवत … त्या वर्तुळात फेकल्या…. फेकताच क्षणी जणू भयाण शांतता त्या स्मशानात पसरली ….. त्याने

आपल्या कवड्यांना निरखून पाहिले… हळू हळू जणू … त्या आपल्या रंग बदलत होत्या … लाल …. लाल…… लालभडक … विसतवा सारख्या त्या तापल्या होत्या…. की अचानक त्या करपून काळभोर पडून गेल्या ….. त्याने थरथरत्या हातात त्या उचलून घेतल्या … उचलून घेताच काही क्षणात त्याच्या तोंडून शब्द आपोआप बाहेर .. पडले “नाश …. नाश होणार…. खूप मोठा नाश आई जगदंबे …असे म्हणत तो लंगडत लंगडत जाऊन .. खिडकीतून बाहेर

वरती आकाशाकडे पाहत…कळवळीने हात जोडतो आणि म्हणतो “.मदत कर ग आई जगदंबे …. तो आलाय … तो परत उठला आहे या कबरीमधून ….. ” ….. त्याची गरज आहे…. असा जो … विचाराच्या पलीकडील विचार ठेवणारा असावा …. जो वाघाच काळिज ठेवणारा असावा आई …… तसे त्याचे बोलण थांबताच क्षणी खिडकीतून… बाहेर ढगाआड लपलेला चंद्र निखळत बाहेर येतो … व त्याच्या अंगवार त्या च्ंद्राचा लक्ख प्रकाश पडतो…. चिंतेच्याच सुरात स्मित हस्य करत… तो आकाशाकडे पाहून आपले हात जोडतो…..

***

“वुssssssss धदड..धदड…धदड..धदड धड…. ससस्ससस……. ” करत रेल्वे वाकवड स्टेशन वर थांबली …. त्यातून एक पंचीविशितील एक देखणा असा तरुण..कडक पण साधे वस्त्र घालून….असलेला …हातात एक बॅग आणि पाठीवरती एक बॅग… असे घेऊन तो उतरला … स्टेशन वरील थंड हवा त्याच्या अंगाला झोंबत होती तरी… ती सहन करतच

तो खाली उतरतो….इकडे तिकडे नजर टाकत असतो की अचानक त्याच्या नजरेस ‘ ती’ पडते..तिला पाहताच त्याच्या तोंडून एक स्वर निघतो “व्वा ..! किती सुंदर आहे ती…?”

ती ..अंगाला लागणारा गार वारा टाळण्यासाठी अंगाभोवती शाल गुंडाळून उभी होती…एका हातात कसले तरी पुस्तक होते ..तेच सांभाळत शाल आवळून धरत होती …. वार्याने आपल्या चेहर्यावर येणारे केस सावरत…होती चिंतेने आतुर होऊन एकवेळ स्टेशनच्या गेटकडे तर कधी आपल्या बॅगेकडे पाहत होती….जणू कोणाचीतरी वाट पाहत होती… इतकी सुंदर

की स्वर्गातील अप्सरा देखील तिच्यासमोर फिकी पडेल… जणू परीच होती ती… समुद्रा सारखे खोल वाटणारे, निष्पाप हरिणी सारखे सुंदर टपोरे डोळे… गुलाबाच्या पाखळीपेक्षा ही लाल ओठ …त्याला वाटत होते की तेथे चंद्राचा नाही…. तर तीचाच प्रकाश सर्वत्र पसरला आहे… इतकी ती सुंदर होती… खूप मनमोहक…. एवढ्यातच तिच्या जवळ कोणीतरी आले.. एक वृद्ध पण मध्यम वयाचा गृहस्थ .. जवळ येऊन जणू तो तिला उशीर झाल्याबद्दल माफी मागत होता .आणि भीत भीत गडबडीत तिचे सामान उचलत होता … तेवढ्यात याच्या ही जवळ कोणीतरी येत.. व त्यास म्हणते “साहेब टांगा ” तसे त्याचे लक्ष तिच्यावरचे हटून

त्या टांगा विचारणार्याकड जाते…. तो त्यास पाहत उत्तर देतो “हो पाहिजे टांगा ” तेवढे बोलून तो त्या मुलीस पाहण्यास वळतो…. पण ती तेथून नाहीशी होते … स्टेशन तसे खूपच लहान होत .. एकूण 10 – 15 च लोक

होती तिथ…पण ती त्याच्या नजरे पासून नाहीशी झाली होती…. हा ही मग निघतो … व टांग्यात जाऊन बसतो…. चक…चक …चक.. आवाज करत घोड्याच्या टापाना साथ देत टांगा पळत होता…. घनदाट अश्या जंगलातून .. जात जात जंगली श्वापद… पशू चित्र विचित्र आवाज करत.. होती… तेवढ्यात टांगेवाला … त्यास म्हणला “साहेब तुम्ही कुठल म्हणायच ? आणि इथ काय करताय आमच्या गावा मंदी ” तसा तो तरुण त्यास स्मित हास्य देत म्हणतो “मी अमन…. येथे तुमच्या गावात फिरायला आलोय… मस्त निसर्गरम्य आहे रे तुमची गाव… खूपच छान …. “असे बोलता बोलता तो अचानक थांबतो .. व एका गूढ विचारात बुडून जातो…. “कोण असेल ती ? याच गावातील असेल का? किती सुंदर होती …

आणि किती मनमोहक?”

त्याच्या विचारात बाधा बनत तो टांगेवाला त्याला विचारतो….. “साहेब कुठ न्यायच तुम्हाला ?

अमन म्हणतो “इथे तुमच्या गावात एखादे कोंटेज आहे का रे ? राहण्या करिता … ” होय न साहेब आहे लय मोठ बघा … पण काही दिसा पूर्वी तिथ एक कुटुंब राहयला आल होत … तुम्हाला म्हणून सांगतो साहेब.. ते कुटुंब आले त्याच्या दुसर्या दिवशीच गायब झालं बघा! म्हणून तिकड कोण जास्त फिरकत सुदिक नाही आम्ही बी नेत न्हाय …. पण तुम्ही नवीन दिसतात म्हणले न्यावे “असे बोलत बोलत तो टांगेवाला अचानक दचकून थांबतो…. जणू त्याचे घोडे पुढ जाण्यास तैयार नव्हते त्यास जणू कसल्यातरी अडखळीची चाहूल.. लागली होती….टांगयावाला ही जणू भांबरलेला… समोर काहीतरी पाहून…. अमनला कळलेच

नाही “टांगा का थांबला असेल?” असा विचार करत त्याने टांग्यावल्याच्या दिशेने बाहेर पाहिले … तर बाहेर पाहताच क्षणी … त्याच्या नजरेस ते ‘कोटेज’ पडले … इतके सुनसान… इतक भयंकर वाटत होत की विचारू नका …… .मोठे असे लोखंडी फाटक होत त्याला…. एकूण दोन- एकमजली होत ते कोटेज…. अंधारात बुडालेल फक्त

त्याच्या फाटकाशी दिव्याचा उजेड होता … .तसे टांगेवाला अमनला भीतभीत म्हणाला “साहेब तुम्ही जावा इथून पुढ!… मी नाय येऊ शकत … जावा तुमचं तुमी …” असे म्हणत तो टांगेवाला गरर्कन आपला टागा वळवून घेतो … व अमनला थोड्या दूरच सोडत निघून जातो… अमन आपले सामान घेऊन .. फाटका जवळ जाऊन इकडेतिकडे पाहतो…. तस समोरून अमनला फाटकातून दिसते हातात एक कंदील घेऊन … अंगाभोवती घोंगडे गुंडाळून एक माणूस त्याच्याकडे येताना त्याला दिसतो…. अमन त्यास … श्ंकाकुर नजरेने पाहतो…. तसे तो जवळ येत होता … तो खूपच जवळ आला होता …. जवळ येताच त्याने फाटकाच्या आतून .. अमनच्या चेहर्यावर कंदील धरला … तसे अमनने आपला हात उजेड

टाळण्यासाठी आडवा धरला…अचानक अमनला त्याच्या कानावर एक एक साधा आणि गावठा आवाज त्याच्या कानी पडला “कोण म्हणायच तुम्ही ?” अमनने आडवे धरलेल्या हातातूनच त्या माणसाला पाहिले… व म्हणला “मी… मी अमन… मी.. एक पर्यटक आहे …हे गाव पाहण्यासाठी आलोय येथे “….. तसे त्य माणसाने ते फाटक एका हाताने उघडले ” या आत….. हाय आमच्या हिथ राह्यला जागा …. रावू

शकता तुम्ही “असे त्याचे म्हणणे ऐकून अमन त्यास म्हणतो “ओह धन्यवाद!! हा खूप आभारी आहे मी आपला ” असे म्हणत अमन नी आपले सामान उचलले व त्याच्या मागे मागे जाऊ लागला …. सामान घेऊन जात असताना त्याची नजर

वरती एका खिडकीवर पडली … त्या खोलीतिल उजेडात आत कोणीतरी बसले

असल्याची साउली खिडकीवर पडत होती…. कोणी तरी जणू टेबलवर बसून काहीतरी लिहतय अशी साउली होती…. अमन थोडा वेळ नीट निरखून पाहू लागला … ती एक तरुण मुलगी वाटत होती…. …खिडकीतून तिची फक्त साउली पडली होती…. तसे अमन पाहत पाहत आत त्या कोटेजात जातो … आत जाताच सर्व पाहून तो अचंबून जातो.. इतके विचित्र वाटणारे ते कोटेज होत…..काही मोजक्या नेमक्या खोल्याच उजेडात होत्या… आणि दुसर्या मजल्यावर जाण्या करिताच्या दोन्ही बाजूस पायर्या होत्या त्याही … काळोखात होत्या ….त्या माणसाने कंदिलचा उजेड पायर्याच्या दिशेने केला…. व अमन ला वरती जाण्याचा इशारा केला व त्यास सौम्य आवाजात म्हणाला साहेब गाव आहे ना हे लाइट नसते आमच्या इथ जास्त म्हणून कंदील वापरताव आम्ही… तेवढ्यात लाइट येते .. व अमन चे त्या माणसा कडे लक्ष जाते त्याला पाहताच अमन एका विचारात पडतो…

असे का वाटत आहे मी याला पाहिलय या आधी पण…. कुठे? कुठे पाहिले आहे मी याला ?” तो व्यक्ति अमन पासून थोडा दूर काही तरी आणण्यास जातो तेव्हा अमन च्या लगेच लक्षात येते …” अरे हा!” चुटकी वाजवत अमन म्हणतो “मी याला स्टेशन वर पाहिलय हा त्या मुलीस न्यायला आला होता? तिची माफी मागत होता “…. तसे अमन जणू खूपच उत्सुक होतो… व त्याच्या जवळ जाऊन त्यास म्हणतो…. “राव ऐकता का? जरा…

मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी स्टेशन वर पाहिले होते … ?” तसे तो नौकार माणूस अमन कडे वळतो आणि त्यास काही आठवून दचकत म्हणतो “स्टेशन वर ओह हा ! मगाशी मी आलो होतो स्टेशनवर ….. काव्या मेमसाबला आनायला आलो होतो ?” तसे अमन खूपच उत्सुक होतो… आणि विचारतो “काव्या मेमसाब? म्हणजे त्या ज्या मगा स्टेशनवर उभ्या होत्या पहा शाल पांघरून?….. आणि तुम्ही त्यांची समजूत घालत होतात त्याच ना …. ” “होय होय साहेब त्याच त्याच काव्या नाव आहे त्यांचं त्या लेखिका हायेत साहेब मोठ्या त्या भुताखेतावर गोष्टी लिवतात बघा…. ते त्या वरच्या खोलीत राहतात इथ या आमच्या काटेजात … लय घटना घडल्या हुतया म्हणून, त्या इथ रिसर्च का काय ते

करायला आल्या आहेत…. आणि पुस्तकं लिवायला पर तुमी का ईचारताय ” तसे अमन म्हणतो “अरे काही नाही… सहजच “…. बार साहेब मी जातू .. माझ घर लांब बघा बाहेर गावात हाय माजी सायकल हाय … काय जेवाय लागले तर आत मंदी म्या डबा ठेवलाय बार म्या जातू ” असे म्हणत तो नौकार ही जातो… अमनला लाइट आलेली देखील असताना… ते घर थोड विचित्र वाटते…. अमनच्या डोक्यात लगेच विचार चमकला .. “अरे अमन ती मुलगी तर इथच वरती राहते …. जीला तू स्टेशनवर पाहिलेले अमन… यार तीच नाव पण काय छान आहे “काव्या”…. “काव्या ” काव्य आणि अमन….. “काव्यामन” वा अमन काय जुळवा जुळव करतोयस यार…. चला तिला भेटून येऊन….. ” असे म्हणत अमन पायरहून वरती जाऊ

लागतो की अचानक थांबतो व किचन कडे वळतो .. आणि आत जाऊन तेथील डब्बा हातात घेतो .. व मजेणे नाचत नाचत …काव्याच्या खोलीकडे जाऊ लागतो….की अचानक काव्याच्या खोलीतून एक किंकाळी अमन ला ऐकू येते ..अमन नाचणे थांबवतो आणी धावतच जाऊन… काव्याच्या खोलीचे दार उघडतो…..” काय..? काय झाले ? “…. अमन आत गेला तेव्हा त्याने पहिले … की काव्या …. भीतभीत

वरती भिंतीच्या एका कोपर्यात पाहत होती…तिचा फक्त टेबललॅम्प चालू होता.. त्या उजेडात

तिला भिंतीच्या कोपर्यात काहीतरी दिसले होते..तसे अमन ने विचारले “काय झाले ? का ओरडलात तुम्ही काव्या? ” तसे काव्याने त्या भिंतीच्या कोपर्याकडे आपले बोट करून दाखवले तिथे एक पाल वळवळत होती… तिला पाहूनच

काव्या ओरडली होती… तसे अमन ने पालीला पाहताच त्याला मोठमोठ्याने हसू फुटले… तो जोरजोरात हसू लागला “हहाहाह

हहाहहह ….अहो अहो पाल तर आहे ती फक्त …..

हहाहा किती घाबरलो मी .. मला वाटले काय झाले का काय ? ” …. तसे म्हणत अमन ने झाडूने पाल हाकलली… काव्या त्याच्या कडे जणू नाराजीच्या नजरेने पाहत होती …. अमन ल तिचा अर्थ

कळला आणि तो म्हणाला “सॉरी सॉरी .. अहो मी कंट्रोल नाही करू शकलो …. प्लीज मला माफ करा “…… तसे काव्या त्यास भुवया आकसून डोळे तीक्ष्ण करून त्यास पाहत म्हणाली .. “बाय द वे मिस्टर हू आर यू ? आणि इथे काय करताय तुम्हाला माझे नाव कसे माहीत आणी न विचारता माझ्या खोलीत कसे काय शिरलात…. “ती त्याच्या कडे बोट करत म्हणाली … तसे अमन भांबरला “आ…म… मी मी … मी ” “बोला ! बकरीसारखं म ममम काय करताय” “अहो मी हे गाव फिरण्यास आलो होतो ….. येथील सौंदर्य पाहायला …

मला राहयला जागा हवी होती … म्हणून मी येथे या कोटेज मध्ये आलो …. तो नौकार गेला निघून त्याला उशीर होत होता म्हणून आणि त्याने डब्बा ठेवला होता तुमच्यासाठि तोच देण्यास आलो होतो…. पण तुम्ही किंचाळलात मग मी धावत आत आलो …. आणि आत आलो तर पाहतो ” “बस बस समजले मला आणा तो डब्बा इकडे … ” असे म्हणत काव्या त्याच्या कडून.. डब्बा घेतो … व त्यास म्हणते “ठीक आहे जाऊ शकता तुम्ही ” अमन लगेच गुपचुप आपली मान खाली घालून दरवाज्याकडे वळतो आणि जाऊ लागतो तसे मागून काव्या त्यास हाक मारते “अहो … थॅंक्स .. त्या पालीला हाकलल्या बद्दल ” अमन उत्सुकतेने वळून

तिला काहीतरी बोलणारच

असतो की ती म्हणते …”थॅंक्स अगेन बाय “… मग अमन तिला पाहत पाहत च “ओके .. बाय ” आला तसाच उलट्या पावलाने बाहेर जातो.. आपल्या खोलीकडे जाण्यास निघतो….तसे काव्या ही डब्बा टेबलवर ठेवते आणि काहीतरी लिहण्यात गुंग होऊन जाते जे तिने पाली मुळ अर्ध्यातच सोडले होते… लिहता लिहता ती खूप गुंग होऊन जाते.. बाहेर अमन.. आपल्या खोलीत जाऊन पडतो… काव्या त्या गावात … त्याच कोटेजच्या अफवाह ऐकून आली होती…. तिथे राहयला आलेल एका रात्रीत एक कुटुंब नाहीसे झाले होते….. काव्या ने त्या कोटेज बाबतीत आपल्या डायरीत लिहून ठेवत होती .. ती एक लेखिका होती आणि तिला अशाच एका घटनेची आणि जागेची गरज होती…. पण ती समोर आ वासून असणार्या मृतयू मय संकटापासून अजाण होती….. लिहता लिहता काव्याला जाणवू लागले की खिडकीच्या बाहेर

खाली एका झाडपाशी कोणीतरी उभे राहून तिला पाहत होत….अंधारात तो अंधुक अंधुक असा दिसत होता जरा पन्नाशितील व्यक्ति होता तो.. एका हातात लंगड्या पायसाठी आधार म्हणून काठी होती.. तो खूप मोठे मोठे डोळे करून तिला पाहत होता… काव्या उठली आणि खिडकीतून तिने खाली पाहिले

पाहता क्षणी ती दचकली … तिला अंधारात तो ठीक रीतीने दिसला नाही पण तिला एक जबर कोरडा आणि डांबरट ” आवाज आला “चूक करतेयस ….खूप मोठी चूक करतेयस तू पोरे….. त्याच्या विषयी लिहून…. येत आहे तो परत…. लक्षात ठेव या पारबाचे शब्द …. ” काव्या त्याच्याकडे खूप अवाक होऊन पाहत असते त्याच्या प्रत्येक शब्दांनी तिच्या अंगावर काटा उभा राहो तिचे कानसुल तिला गरम भासत होते… तश्या स्थितिच काव्या आपले लिहणे बंद करते व बेड वर निपचीत जाऊन पडते …तिला झोप लागते की अचानक

तिला कोणीतरी श्वासाच्या आवाजात हाक मारते

“काव्या ससाससास्सस…..हाहहहहहह….” असे शब्द काव्याच्या कानावर पडताच ती दचकून जागी होते पण तिथे तिला कोणीच दिसत नाही ..पण पुन्हा तोच आवाज तिला ऐकू येतो काव्या घाबरते व भीत भितच आपला कापरा वाज थोडा वाढवून विचारते “कोण? कोण आहे ? …. स स समोर का येत नाही ” काव्याच्या त्या आवाजाने तो दूसरा आवाज जणू झाकला गेला व पुन्हा आला नाही …. काव्या जवळ ठेवलेले ग्लासभर पानी घटाघाट प्यायली …. तसे त्या सोबत तिने

ठरवले …उद्या त्या माणसास हुडकून भेटायचे “काय म्हणणे असेल त्याच? का नको लिहू म्हणत आहे तो मला मनीष बद्दल? असे काय आहे होत या कोटेज मध्ये मला याचा थांगपत्ता लावावा लागेल” विचार करत करत काव्या झोपी गेली …….. पहाट झाली काव्या आपल्या अंथरुणात साखरझोपेत होती … पण तिच्या त्या साखरझोपेत भंग पडण्यास काही वेळ लागला नाही….. अचानक तिचे अंग थरथरू लागले जणू ती कशापासून तरी आपली सुटका करवून घेण्याचा प्रयत्न करत होती… कोणीतरी जणू तिला जाक्डून टाकलंय … तिचा श्वासोच्छवास वाढला होता अंगास घामाच्या धारा लागल्या होत्या .. तिच्या कानात हात पायात जणू मुंग्या आल्या होत्या …. तिच्या कानाजवळ कोणीतरी जणू फुसफुसतंय … तेच रात्रीचे शब्द पुन्हा पुन्हा तीच रात्रीची हाक तिला पुन्हा ऐकू येत होती “काव्यःहा स्स्स्सस्स्स ,,,,,,….हहहह्हहह” आणि त्याच लंगड्या माणसाचे वाक्य “चूक करतेयस तू खूप मोठी चूक करतेयस ……”…. हे सर्व वाक्य शब्द तिला चलबिचल करून टाकत होते …. ती धडपडत होती .,.., की चाललय हे समजून घ्यायला पण अचानक धक दिशीने काव्या भानावर आली … बाहेरील खिडकीतून कवडसे आत पडत होत …. ते थेट तिच्या चेहर्यावरती ती उठली आपल्या अंगावरील चादर बाजूला करून … बाथरूम मध्ये बृश करण्यास गेली … ब्रश झाला … तिने तोंडावर पाणी मारून घेतले आणि आरशात पाहून टॉवेलने तिने आपले तोंड पुसले … आणि जसा तिच्या चेहऱ्यावरील तिने टोवेल बाजूस काढला तसा तिला एक भयंकर चेहरा आरशात दिसला जो तिच्या मागे उभा राहून हसत होता … काव्याला एक जोरदार झटका बसला तिची बोलती बंद झाली … त्याचा चेहरा .. जळका … आणि त्यावरतीच असंख्य जखमा त्याचे डोळे जणू त्याच्या डोळ्यांना बुभळ च्या नावाखाली … दोन जणू लहानसे काळेभोर टिंब काव्याने एका क्षणात मागे वळून पाहिले .. तो नाहीसा झाला .. काव्यास काही समजेना झाले होते … ती तशीच बाहेर पडली … बाहेर पडताच बाहेर दारातच अमन तिच्या करिता चहा घेऊन आला होता …. त्याला पाहताच तीला थोडा धीर आला … . काव्या घाबरलेली होती तिने जे दृश्य आत पाहिले होते ते तिच्या लक्षातले जात नव्हते …अमन ला जाणवले त्याला कि काव्या खप घाबरलीय कशाला तरी … अमन ने हातातील ट्रे खाली ठेवला आणि … त्याने तिला विचारले “काय झाले काव्या ?” तशी काव्य बोलू लागली .. ‘”माझ्या रूमच्या बाथरूम मध्ये कोणीतरी आहे ” त्याने काव्यास आत नेण्याचा प्रयत्न केला पण ती काही आत येण्यास तैयार होईना …. ती अमन च्या हातातून आपला हात सोडवून बाहेर येऊ लागली .. अमन ने हि जास्त कः न बोलता तिचा हात सोडला व त्याने विचारले काय झाले काव्या ? काव्या घाबरत घाबरत च त्यास म्हणाली माझ्या बाथरूम मध्ये काय तरी आहे . कोण तरी आहे ,,,, एकदम ….. तिचा श्वास भरत होता ती तसेच बोलण्याचा प्रयत्न करीत होती ….. एकदम विचित्रच चेहरयाचे आहे ते ….. अमन म्हणाला थांब मी पाहतो …. तसे अमन आत गेला त्याने ,,,… बाथरूम चे दार आत लोटले … आणि आत गेला अमन ने इकडे तिकडे पाहिले पण कोणीच नव्हते आरशावरील वाफ पुसत त्याने पाहिले तिथे हि कोणी नव्हते … पण जसे तो मागे वळला त्याची नजर फरशीवरील…. पायांच्या ठश्यांवर गेली … तर ते रक्ताचे ठसे होते … एका माणसाच्या पायाचे होते ते … अमन ला खूपच वेगळे वाटले … अमन त्या कडे पाहतच राहिला त्याला काहीच कळेनासे झाले कोण आले होते इथ ?…. कि अचानक अमनच्या डोळ्यासमोरच ते पायाचे ठसे नाहीसे झाले… अमनने परत इकडे तिकडे नजर टाकून काही तरी शोधण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ …अमन बाहेर आला त्याने काव्यास एकदा पाहिले आणि आपल्या चेहऱ्या वरती …एक स्मित हास्य आणत तिला म्हणाला … “नाही अग कोणीच नाहीये आत मध्ये तर … तुला शक्यतो भास झाला असेल ….” अमनने तिला ते सांगण्याचे टाळले…. कारण जर तीला ते सांगितले असते तर तीन अजूनच घाबरली असती …. अमन ने काव्यास खाली आणले … का जणू तिच्या त्या घाबरलेल्या अवस्थेची त्याला खूप कीव येऊ लागली होती … जणू तिचा त्रास तो त्याचा त्रास असा तो मानून होता … आणि तसेच होते .. कारण ती त्याच्यासाठी सर्वस्व झाली होती …. अमन ने काव्याला चहा दिला तिला थोडे बरे वाटले … आणि ती अंघोळीस गेली …. अमन आता खूप गूढ विचारात बुडून गेला होता … चहा घेत घेत तो बाहेर आला आणि वर्हांड्यात बसला …. त्याच्या डोक्यात बर्याच प्रश्नांनी काहूर माजवला होता …. तो त्यांनाच सोडवण्यात गुंग होता … कि अचानक त्यास … दूर कॉटेज पासून काही अंतरावरती एक वयस्क व्यक्ती उभा राहून आपल्याकडे पाहतोय अस त्याला दिसले …. अमनला वाटले असेल कोणीतरी … पण त्याने पुन्हा नजर टाकली तर तो त्याच्याकडेच पाहत होता .. अमन आपल्या जागे वरून उठला …. आणि त्याच्या जवळ जाऊ लागला इकडे काव्याला देखील एकटे सोडणे भाग नव्हते तरी त्याने त्या माणसाकडे जाण्याचा प्रयन्त केला आणि तो त्याच्या कडे पोहचला तो व्यक्ती आपल्या एका हातात काठी घेऊन … आपल्या दुसर्या तुटलेल्या पायाला आधार देत … खुन्नाशीने अमन ला पाहत होता … अमन त्याला काही विचारणार तेव्हढ्यात तो म्हणाला “का आलात इथ ?….. तो तुम्हाला सोडणार नाही .. तो तिला घेऊन जायला आलाय …. आणि तू हि त्याला पाहिलाच हो किनय” त्याच्या चेहर्यावर एक आशावादी क्रूर हस्य उमटले… अमन ला काही समजेना तरी त्यांने सरळ प्रश्न केला “कोणाबद्दल बोलताय ? कोण आलंय? कोणाला पाहिलं मी ? ” तसे तो माणूस स्मित क्रूर हस्य करत त्याला पाहू लागला …. आणि त्याने आपली काठी … एका हाताने वळवत माघारी घेतली … आणि जाता जाता तो अमन ला म्हणला “शैतान आहे तिथ …. निघून जा तिला घेऊन नाही तर तो तिला तुझ्या आधी घेऊन जाईल नरकात ”… अमन ला त्याच्या बोलण्याचे काही सुत जुळवून आणता येत नव्हते … पण त्याने जे पहिले होते ते देखील … अनपेक्षित होते …. न विश्वास ठेवता येणारे … अमन आत मध्ये फाटकातून आला … आणि दार आत ढकलून पोहचला … समोरील दृश्य पाहून त्याचे डोळे जणू लक्ख प्रकाशाने दिपले गेले … हृदयात जणू एका क्षणास .. असंख्य… वेळा ठोके पडत होते .. जणू त्याला जाणवत होत कि तो जिवंत आहे … कारण ती त्याच्या समोर उभी होती …. एकदम सुंदर …जणू परीच ! ओले केस सावरत . टॉवेल ने पुसत… खिडकीत उभी होती … तिचा तो सुंदर गोड मुखडा पाहून .. अमन पुन्हा त्याच्या विश्वात हरवला गेला होता …. अमन आत आलेला आहे हे पाहून तिने त्याच्या कडे पाहत स्मित हस्य केले .. व जवळ आली “चहा खूप छान होता धन्यवाद ! तुझे … मला जरासे बरे वाटले ” अमन तिच्या त्या सुरेख आवाजाने भानावर आला … तसी ती पुन्हा म्हणाली मी रात्री झोपण्या पूर्वी काही विचित्र गोष्टी झाल्या होत्या …. अमन कटक्ष झाला … त्याने तिला विचारले कसल्या गोष्टी काव्या तशी ती म्हणाली मी जेव्हा रात्री माझी कथा लिहित होते तेव्हा खिडकीतून बाहेरून एक लंगडा माणूस मला पाहत ओरडत होता कि “चूक करतेयस तू …. खूप मोठी चूक निघून जा ” आणि झोपण्या पूर्वी कोणी तरी मला एक विचित्रच अश्या आवाजाने हाक मारत होत …. खूपच वेदनादायक आवाज होता तो …. अस वाटत होत … आणि आता देखील बाथरूम मध्ये तो चेहरा …. खूप भयंकर वाटतय हे ….. अमन ने विचार केला काय असेल हे ? तो माणूस ज्याच्या बद्दल काव्या सांगतेय तो तर आताच बाहेर येऊन गेलाय ……..तेव्हा सखा माळी सायकल वरती आला होता … त्याने वर्हांड्यात आपली सायकल लावली आणि तो आत आला … आत येताच त्याने खांद्यावरील थैली बाजूला काढली आणि त्यातून एक डबा बाहेर काढला तो डबा त्याने काव्या आणि अमन च्या न्याहारी साठी आनला होता .. अमन ला भूक नव्हती आणि जे काही घडतय ते पाहून तर त्याची खायची इच्छा पण होत नव्हती ….. म्हणून अमन न तो डबा काव्यास दिला …. आणि तो किचन मध्ये सखा कडे गेला .. सखा किचनच्या कामात गुंग होता … अमन त्याच्या जवळ गेला … आणि म्हणाला “काय हो सखा भाऊ तुम्ही इथ किती वर्षे झाले काम करताय ?”….. सखा हातातील काम थाबवत म्हणाला एकूण “१० वरीष झाल असत्याल बघा !” अमनने पुन्हा विचारले “म्हणजे तुम्हास या गावातील लोकांचे या घराच भरपूर काही माहिती असेल ” तसे सखा बावरला “आं घराच ? काय माहित असं पाहिजे कि जवां मी इथ कामास आलो तेव्हा इथ फकस्त याचा एक जुना मालक होता पर आता त्यो इथ नाई रात त्यो शहरांनी राहतूया काव ?” तसे अमन म्हणाला “काही नाही ? तुम्हास कोणी असा गावातील एखादा लंगडा का पायाने असणारा माणूस माहित आहे का ?” अमन च्या त्या प्रश्नाने सखाला यावेळी जोरदार धक्का बसल्यासारखे झाले त्याच्या हातातील बशी खाली पडून फुटली … तो अजूनच बावरला त्याच्या माथी घामाचे ओस आले होते …. तो हळू हळू अमन कडे वळाला ,…,, आणि तो अमन ला काही क्षण फक्त पाहतच राहिला …. आणि त्याच्या तोडून फक्त एक शब्द बाहेर पडला आणि तो म्हणजे “पारबा,,,..!” अमन काही क्षण त्या कडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होता …. कि कोणीतरी किचन च्या दारात उभे होते मध्येच म्हणाले “काय ? काय म्हणलात तुम्ही ?” ती काव्या होती बशी फुटल्याचा आवाज ऐकून ती तिथे आली होती आणि त्या दोघांच बोलन ऐकत होती …. ती तशीच सरसर आत मध्ये आली “आणि म्हणाली अमन हाच तो माणूस हेच ते नाव .. जो एक लंगडा माणूस माझ्या खिडकीच्या खाली उभा राहून ओरडत होता कि ” “चूक करतेयस तू .. लक्षात ठेव या पारबाचे शब्द ” हेच म्हणत होता ना” सखा काव्या सांगण्या आधीच म्हणला काव्या चकित झाली “हो हो हेच हेच ! तो पण म्हणत होता , पण तुम्हाला कसे माहित झाले ”…. सखाचा चेहरा चिंतातूर झाला होता… तो म्हणाला “ बाईसाहेब!!! अमनराव तुम्हाला धोका आहे … तुमच्या जीवाला लय मोठा धोका हाय …. ”…,. अमन ला काही समजेना तो म्हणाला नेमक काय झालय सविस्तर सांगा … कोण आहे हा पारबा ? का धोका आहे आम्हास …?” “सांगतो ….. सांगतो अमनराव … पारबा आमच्या गावच्या स्मशानातला चांडाळ हाय …. तांत्रिक हाय त्यो … आं त्यो कधी त्याच्या मसनातून बाहेर पडत न्हाय जर त्याला कुठशी लयच इपरीत वाटल तरच त्यो त्यची जागा सोडून एखाद्याला चेतावणी देतो …. पिशाच्च त्याच्या भोवती सतत भटकत राहत्यात ….. काय माहित कस केल लोक म्हणत्यात त्याच्याकड जगदंबा आईच वरदान हाय जगदंबा आईचा लय मोठा भगत हाय त्यो आन त्यान आपला एक पाय देवीला अर्पण केलता तवा पासून त्यो तसा हाय .. त्यान पर गावात कधी ….संकट आल्यास लय बरी मदत केली हाय … लोक त्याच्या कड कधी कधी जायला बी लय भित्यात …. आं त्यान स्वतः तुमच्या कड आलाय म्हणजे काय तरी इपरीत होणार हाय इथ तुमच्या संग देव करो तुमास्नी काय बी हु नि पर ” काव्या जराशी घाबरली होती …. अमन थोडा रागवला “हे बघा सखाराम अश्या भाकड कथा ऐकवून भेड्वू नका ” तेव्हा सखा म्हणला .. “भाकड कथा … येक सांगा मग अमनराव … जवा पारबा माघारी फिरला तवा तुम्हास्नी बघून त्यो हसला का ?” आता हे ऐकून अमन जरा सावरला त्याच्यात जणू एक जिज्ञासा निर्माण झाली त्याने बाकीच काही विचारले नाही …. तो थेट म्हणला “मग त्याचा अर्थ काय आहे ?” त्यो तुमास्नी बोलवतोय …. अमन हुंकारला “ह्म्म्म ठीक आहे कुठे भेटेल मग मला तो ” तसे काव्या त्यास म्हणली ….. “का ? कशासाठी ? ऐकल नाहीस तू ते आय म्हणतायत तो पारबा कसा आहे ते आणि तू तुझा जीव का धोक्यात घालतोयस …” … अमन काही बोलला नाही त्याने फक्त काव्या वरती एक नजर टाकली … आणि तो कॉटेज मधून बाहेर पडला सखाराम ने सांगितले होते .. इथून ६० एक पावल चालत गावाबाहेर जाव लागल … तिथ दोन पायवाट लागत्यात ..” अमन सांगितल्या प्रमाणे जात होता तो ६० पावल चालून दोन पायवाट असणार्या ठिकाणी पोहचला एक जी मुख्य रस्त्यास मिळत होती आणि दुसरी जी जंगलात जात होती .. अमन जंगलाच्या दिशेने चालत जाऊ लागला . सखाने सांगितल्या प्रमाणे अमन एका भल्या अवाढव्य वडाच्या झाडा पर्यंत आला त्या जंगलात जणू दिवसा सेखील अंधार गुडूप होता … सूर्याचे एखादेच कवडसे झाडाच्या फांदीतून आत येत होत… अमन त्या झाडा जवळ आला सखा सांगता सांगता म्हणला होता जवा तुमी झाडा जवळ पोचताल तवा त्या झाडा पासून थोड पुढ गेल कि एक कोरडी हिर असल त्याच हिरी पासून समोर बघितल कि त्योच असणार …. पारबाचा मसानवाटा . अमन तेथे पोहचला त्या स्मशानात कोणीच दिसत नव्हत ,,,,… फक्त .. स्मास्नातील झाडावर घुबड बुवळत होती …. “व्हुहू हुहुः ….””व्हुहुऊ हुह्ह ”…. अमन फाटक उघडून आत गेला समोर त्यास एक झोपडी दिसली … अमन हळू हळू तिकड जाऊ लागला अमन त्या झोपडी जवळ गेला आणि त्याने हळू त्याचे दार आत ढकलले … आतून कोणाचा तरी आवाज आला .. “ये आत मध्ये ” अमन तो आवाज ऐकून दचकला आणि आत गेला आणि म्हणला ..”पारबा … आहेत का ?” इकडे काव्या कॉटेज मध्ये काहीसे करमेना म्हणून बागडत होती ,,…, सायंकाळ होत आली होती .. तिने कॉटेज पूर्ण पाहिले नव्हते म्हणून ती सखा ला न कळवताच .. इकडे तिकडे पाहत होती पाहता पाहता ती कॉटेज च्या एका वेगळ्याच भागात गेली .. तेथून वरती जाण्यास पायऱ्या वाटत होत्या … काव्या त्या पायऱ्या चढत चढत .. वरती जात होती ….. ती वरती गेली .. आणि तिने दार उघडले कि एक जोरदार वाऱ्याचा झपक काव्यास शिवून गेला….. आणि इकडे परबाच्या तोंडून शब्द बाहेर पडले ….. “अनर्थ ,,,,…अनर्थ झाला आई जगदंबे !!! तीन चूक केलीच अखेरीस …” अमन ला काही कळेना तो म्हणला “काय झाले ?”,,….. तिने त्याला सोडल आता तो सगळ्यांच्या नाशाच कारण बनणार …आहे … आणि तिच्या साठी आलंय आत तो खरा … त्याच ते दुष्ट प्रेम परत जाग झालय … तो परत आला ,,,… अमन ओरडला त्याचा बांध तुटला होता “कोणाबद्दल बोलताय तुम्ही ”,..,… ‘’’’……..मनीष….””’ पारबा ओरडून म्हणाला …. त्याच्या त्या आवाजाने झादावेरील पक्ष्यांचा किलबिलाट सुरु झाला होता … मनीष आहे तो .. एक माणसाच्या वेशातला राक्षस …. ज्याला स्वताच प्रेम मिळवता आल पण पूर्ण पणे नाही त्यान एका मुलीवर जीवापाड प्रेम केल होत .. आणि तीन हि त्याच्या वर सुवर्णा नाव होत तीच …. इकडे काव्या त्या बंद खोलीत गेली तिथ आतच टेबलावर एक डायरी होती … जिच्यात काही बरेच लिहले होते ,,,,. काव्याने तीच्या वरील धूळ फुकून साफ केली … आणी ती वाचण्यास सुरुवात केली,,..,.. त्यात लीहले होते ….

“मी सुवर्णा ,,… मी माझ्या जीवनात फक्त एक मोठी चूक केली आणि ती म्हणजे मनीष सारख्या राक्षसावर प्रेम …” पाने पालटली जात होती .. काव्या ते सर्व वाचत होती वाचता वाचता तिच्या डोळ्यातून टप टप पाणी त्या डायरीच्या पानावरती पडत होते … इकडे पारबा सांगत होता अमनला … “मनीष ला त्याच प्रेम मिळवण्यास बरीच कष्ट करावी लागली …. पण त्याला त्याच प्रेम मिळाल खर .. पण सुवर्णाच्या घरच्यांनी तीच लग्न दुसरी कडे ठरवले होते …. हि गोष्ट मनीष च्या कानावर पडली होती …. त्याने सुवर्णास न कळू देताच तिच्या घरच्यांचा निर्घृण रीत्या खून केला होता ,,. इतका क्रूर आणि अमानुष रित्या कि …. जणू एक राक्षस असे करेल …. सुवर्णास काही कळाले नाही तिला फक्त मनीषचाच आधार वाटत होता …. म्हणून तिने मनीष सोबतच लग्न केल …. आणि तीच तिची सर्वात मोठी चूक होती …. लग्नानंतर काही अनपेक्षित घटनांनी सुवर्णास समजून आले कि मनीष नेच आपल्या घरच्यांना मारले आहे … ती त्याला टाळू लागली …. त्याला बोलणे बंद केले …. पण मनीषने भयंकर यातना सुवर्णास देण्यास सुरु केल्या … तिला जगण्या पेक्षा मरणे सोपे वाटले म्हणून तिने मनीष घरी नसल्याचा फायदा घेऊन घरातील पंख्यास गळफास घेऊन स्वतहाला संपवले मनीष हे सहन नाही करू शकला आणि त्याने हि विरहा मध्ये आपला प्राण त्यागला पण त्याची दुष्ट आत्मा त्या घरात … कैद झाली होती .. आणि काव्या जशी आली तशी त्याची राक्षशी वृत्ती पुन्हा जागी झाली … आणि आता तो फक्त काव्याला आपल्या सोबत घेऊन जाण्यास … आलाय… तुला जावे लागेल तिच्याकडे… आणि तीला वाचवाव लागणार … चल ,,, इकडे काव्याने .. ती डायरी बंद केली तिचे पाणवलेले डोळे तिने पुसले आणि तिने वारी पाहताच तिच्या समोर तो भयंकर चेहर्याचा व्यक्ती साक्षात पुढ्यात उभा होता …. त्यांनी फक्त… आपले तोंड उघडले त्याचे तोंड उघडताच … त्यातून काळा कुट्ट द्रव पदार्थ .. तिच्या चेहर्या वरती उडाला .. काव्या जोरदार किंचाळली … तिचा आवाज.. पूर्ण कॉटेज मध्ये घुमला सखा… दचकला …. तो इकडे तिकडे बावरा होऊन पळू लागला होता …. त्याचे लक्ष पायऱ्या कडच्या खोली कडे गेले … तो हळू हळू तिकडे जाऊ लागला … तो त्या खोलीत पोहचला .. पण आत कोणी नव्हते … सखाला कोणीतरी जणू त्याच्या वरती आहे असे वाटत होते ,,….त्याची नजर वरती गेली .. तेव्हा वरील पंख्यास …. काव्या दात इचकत हसत पाहत होती …. आणि तिच्या हातात धारदार सुळे होते … तिने…सखाच्या अंगावरती झडप घेतली आणि ते धारदार सुळे त्याच्या मानेपासून घुसवत पाठीच्या मणक्यातून बाहेर काढली … सखाचे डोळे फाटले होते … काव्या च्या कपड्यावर जणू काही काळा रक्ताळलेला चिकट द्रव पदार्थ होता … आणि तिच्या चेहर्यावरती जणू सुरकुत्या आणि जखमांचा कहर होता …. आणि रक्ताचे अश्रू असलेले तिचे डोळे ….. इकडे अमन घरी आल सोबत पारबा देखील होता…. .. आत येताच त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून अमन ला धास्की भरली होती …. .. कारण मानेतून आरपार झालेलं सखा च प्रेत … वरील झुंबराला लटकत होते … त्याच्या उन टप टप .. करीत रक्त खाली ओघळत होते … सायंकाळ झाली होती ..

सूर्य मावळतीस आला होता…. त्या अंधारात त्या शैतानाच धैय तो साधून घेणार होता. त्याला काव्या हवी होती … अमन आत आला आणि पारबा देखील होता .. आत येताच पारबाने हातातील हातातील काठीने अमन ला अडवले व लंगडत लंगडत त्या झुंबरा खाली गेला … आणि आपली मान वरती केली … बाहेरील अंधार जणू आत सगळे झाकत होता…पारबा नी वरती पाहतच त्याला झुंबरावर काव्या दिसली… तिने त्या प्रेताच्या मानेतून सूळ बाहेर काढताच ते खाली पडले … आणि काव्या तीच सूळ घेऊन,,,,…. अमनच्या अंगावर आली पण…. पण का माहित कसे ती अमनच्या जवळ येऊन अचानक थांबली … ती जनु काव्या होती जी तिच्यातील मनीष ला अडवू पाहत होती… ती रडत होती धडपडत होती… पण मनीष तिच्यावर हावी होत होता …. तोच मनीष ला मारू पाहत होता ,,… पारबा मनीष ला वाचवण्यास जवळ आला होता…. कि काव्याने एका झटक्यात पारबाच्या गळ्यात ती सुळे घुसवून त्यास गतप्राण केला …. त्याच्या तोंडून घाण भयंकर अपशब्द निघत होते ….. पारबाच्या हातून काही कवड्या खाली पडल्या होत्या…. अमन ची आपले प्रेम वाचवण्यासाठी काहीही करण्याची तैयारी होती … अमन तिला धरण्यास पुढे सरसावला … त्यच्या तोंडून काव्यासाठी तळमळीचे शब्द बाहेर पडत होते … काव्या …..तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे ग…. माझ्या साठी लढ त्याच्याशी …… काव्या रडत होती… आणि मनीष… अमन वर वार करू पाहत होता ….काव्याने अमनला एका झटक्यात दूर हिबाळून लावले … अमन इतका झटक्याने दूर जाऊन पडला … कि त्याच्या बरगड्याची हाड तुटल…. त्याच्या छातीतून.. जणू जाख झाली होती आणि त्यतून रक्त येत होत …. अमन तडफडत होता … काव्याच्या दिशेने हात करू पाहत होता…. काव्या आता पूर्ण मनीष च्या आधीन झाली होती …. ती जणू आपल्या दोन्ही हात आणि पायांनी …. सरपटत सरपटत पारबाच्या दिशेने गेली आणि तिने पारबाच्या प्रेतातून सूळ उपसून घेतली …. तिच्या चेहर्यावर एक क्रूर हास्य उमटले होते … ती एकदम वजनदार सूळ खाली जमिनीवर टाकून सरपटत …..””ख्र्हर्ह्र्रर्र्र्र,,र,र्र्र्रर्र,र्र्र्र….खर्र्रर्र्र्र” करत ओढत आणत होती ….” ती जवळ आली होती … तिने आपल्या हातातील सूळ …. उगारली आणि एका फटक्यात ती अमन च्या डोक्यात घातली … एक खट अस आवाज झाला जणू तो आवाज अमन च्या डोक्यातील हाडाचा होता,,…. … काव्या हसू लागली ….. “हिही….आहाह…स्स्स…...ह्छ्छ्ह आत हि माझी झाली ….. अमन ऐकतोयस ना … हीहीहीही …..” पण अमन जणू त्याच्या शेवटच्या घटका मोजू लागला होता…. अमन च्या पुढ्यात त्याला अंधुक अंधुक असे काही तरी पडलेले दिसले होते …. ते काय होते ते समजू शकत नव्हता … त्याला काव्याचा सुंदर चेहरा समोर दिसत होता …. जणू तिच्या प्रेमानेच त्याला ताकत दिली होती … अमन स्वतःला सावरत कसा बसा उठला … आणि त्याने त्या वस्तू उचलल्या आणि त्या होत्या पारबाच्या हातातील कवड्या … अमन पुढे सरावला आणि इतक्यात काव्याने पुन्हा त्याच्या पायात … इतक्या निर्घुण रीत्या सूळ घुसवली कि त्याच्या तोंडून एक भयंकर किंकाळी बाहेर पडली …. तो त्या दुखाने ओरडत होता … तो सरपटत त्या कवड्या जवळ पोहचला आणि अमन ने त्या कवड्या उचलून हातात घेतल्या …. त्याच्या मनात त्याने आई जगदंबेच नाव घेतल… आई मला शक्ती दे जगदंबे असे म्हणून त्याने आपली सर्व ताकत एकटवली …. आणि काव्यास आपल्या मिठीत घेऊन तिच्या कानात तो जोर जोरात दुर्गा कवच म्हणत होता …. ती त्याला असंख्य रीत्या वारावर वार करत होती …. त्याच्या पाठीत सुळे घुपसत होती …. अमन तिला ओरडत होता काव्या माझ तुझ्या वर खूपच प्रेम आहे ग …. माझ्या साठी लढ परत ये काव्या माझ्या साठी मला तुझ्या सोबत जन्मभर जगायचं आहे … ग …. काव्या जोरदार .. चीरकली … कि काही क्षणात.. ती बेशुद्ध झाली … आणि तिझ्या…तून जणू .. मनीष ,,.,,..तिच्यातून बाहेर आला होता….. कि कोणीतरी त्याला बाहेर ओढले होते … ती होती सुवर्णा …. तिच्या आत्म्याने काव्यास अमन ला परत केल होत …. आणि मनीष ला त्यांच्या नरकाच्या जगात परत घेऊन गेली ……..

कॉटेज मुक्त झाल ,,.. अमन बेशुद्ध झाला होता .. आणि काव्या हि …. बराच वेळ झाला …. जणू ती सुवर्णाच परत आली होती … जिने … अमन च्या पूर्ण जखमा भरून टाकल्या होत्या ….

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel