आज आफिस मधे खुपच काम होत त्यामुळे सुरजला घरी जायला आज नेहमीपेक्षा जास्तच उशीर झाला... सुरज म्हणजे एक देखणा, रूबाबदार तरूण ... ऊंची साधारण सहा फुटाच्या आसपास ... क्लिन शेव्ह, काळेभोर सिल्की केस. स्वच्छ पाणीदार डोळे .. आवरा आवर करुन तो बाहेर पडु लागला तोच टेबलवर ठेवलेल्या मोबाइलची रिंग झाली... सुरजने गडबडीत फोन रिसीव केला... " हैलो.... Sorry sweetheart....खुप काम होत आज... त्यामुळे थोडा उशीर झाला... मी निघतोयच... अर्ध्या तासातच पोहोचतोय..." त्याच बोलण ऐकताच समोरून बोलणारी तरुणी म्हणाली... " तुझ तर नेहमीचच आहे.... आणखी किती वेळ मित्र मैत्रिणीना थांबवुन वाट पहायला लावु...." " sorry जान...फक्त अर्धा तास..." टेबल वर ठेवलेल्या गिफ्ट कडे पहात सुरज पुढे म्हणाला... " birthday girl साठी काहीतरी surprise आहे.... " " तु आणी तुझ surprise plz दोघेही लवकर या....कारण घरी जायला उशीर झाला तर माझे बाबा मला त्याहून मोठ surprise देतील Okay ... plz " " हो ग...आलोच ... आणि पुन्हा एकदा...happy birthday sweeti.... and love u so much....bye" मोबाइल बंद करून खिशात ठेवला आणि bag घेऊन बाहेर येत office lock करून मागे फिरला तसा समोर उभे वाचमन 'शामराव' यानी सुरजला हल्की स्माईल दिली... त्याने ही थोडा प्रतीसाद दिला आणि बाहेर आला, तर बाहेर त्याला पावसाच आक्राळ विक्राळ रूप दिसल .. लख्ख काळोख, जोराचा पाऊस, त्यात घोंघावणारा सोसाट्याचा वारा आणि विजांचा भीषण तांडव... एकुणच निसर्गाच हे रौद्र रुप आज एखाद्या भयंकर घटनेची पुर्वसुचनाच देत होत... वाचमन ने छत्री उघडली तसे दोघेही चालत कारच्या दिशेने निघाले... सुरजला त्याच्या कार पर्यन्त पोहोचवल तसा सुरजने गाडी स्टार्ट केली तोच काहीतरी त्याच्या लक्षात आल... " अरे यार..." अस स्वताशीच बोलत तो पुन्हा कार मधून उतरला आणि office च्या दिशेने निघाला... "काय झाल साहेब म्हणत वाचमन विचारल पन काही उत्तर न देत सुरज office च्या दिशेने गेला... वाचमन तिथच उभा रहात सुरज कडे पहात होता... सुरज ने दरवाजाच lock उघडल तोच सगळीकडच्या लाईट्स गेल्या ... " ओह... गॉड...." म्हणत त्याने खिशातील मोबाइल काढला आणि टार्च सुरू केली आणि टेबलवर विसरलेले गिफ्ट शोधु लागला... " अरेच्या ....... आता तर टेबलवरच होत, इतक्यात कुठे गेल... " म्हणत त्याचा शोध सुरू झाला... मोबाइलमधील टॉर्च च्या प्रकाशात सगळीकडे पाहल पन कुठेच सापडत नव्हते... तसा त्यान आपल्या गुडघ्यावर बसुन खाली वाकुन टेबलखाली पाहिल तर त्यान घेतलेल छोटस गिफ्ट हि-याची अंगठी टेबलखाली होती... त्यान आपल्या डाव्या हाती टॉर्च घेतली आणि उजवा हात अंगठी काढण्यासाठी टेबलखाली सरकवला... टेबलखालची जागा खुप अरूंद असल्याने सुरजच्या हाताला अंगठी लवकर लागत नव्हती.... तसेच बोटानी चाचपडत तो आपला हात पुढे सरकवु लागला...तस त्याच्या हाताला काहीतरी चिकट लागले... त्या थोड विचित्र वाटल .... आपला हात बाहेर काढून टॉर्चच्या प्रकाशात पाहिल तसा त्याच्या काळजाचा थरकाप उडाला... भितीने त्याचे डोळे पांढरे झाले... त्याच्या हाताला वाढदिवसाच्या केकचा काही भाग चिकटला होता,त्यावर कुणाचेतरी रक्तही लागले होते... थरथर कापत तो तसाच रांगत मागे सरकला आणि स्वता:ला सावरत टॉर्च च्या प्रकाशात टेबलखाली पाहु लागला... पन खुप अंधार असल्याने स्पष्ट काहीच दिसत नव्हत... थोड धाडस करुन पुढे जात टॉर्च टेबल खाली नेली तर ऐक रक्तान माखलेला birthday केक विस्कटून पडलेला... थरथरत तो तसाच मागे सरकला तसे त्या अंधारात त्याच्या हाताला एक कापड लागले... हाताला लागलेला केक त्या कापडाला पुसून हात स्वच्छ केले पन त्याला आश्चर्य वाटल की हे कापड मघाशी जाताना तर आपल्या office मधे नव्हते... दुस-या हातातील टॉर्चचा प्रकाश त्याने त्या कापडावर पाडला तसा तो भीतीने आणखीणच शहारला तो एका लहान मुलीचा फ्रॉक होता तो ही रक्ताने माखलेला... " नाही...." भीतीने इतकेच शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि त्यान तो फ्रॉक झटकन फेकुन दिला आणि त्याबरोबरच दुस-या हातातला मोबाइल पन खाली जमीनीवर उलट पडला आणि त्यातील टॉर्चचा प्रकाश थेट सुरजच्या चेह-यावर पडला.. सुरज त्या फ्रॉक कडे थरथरत्या नजरेने एकटक पाहू लागला.... काही वेळ तो तसाच बसुन त्या फ्रॉकला पहात होता.... एक निरव शांतता त्या जागेवर पसरली होती... तोच त्या अंधारात त्याला कर्रर्रर्र कर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्र असा आवाज ऐकू येउ लागला... आणि आवाजा बरोबरच सुरजच्या काळजाचे ठोकेही वाढु लागले... त्याला आता दरदरून घाम फुटायला लागला... त्याच लक्ष्य आवाजाच्या दिशेन गेल तस त्याच्या काळजात चर्रर्रर्रर्रर्र कन झाल... डोळे विस्फारून तो समोर पहात होता... त्याच्या समोर त्याचच खुर्चीवर कोणीतरी पाठमोर बसल होत... आणि एका लयीत खुर्चिवर बसुन हालत होत... सुरजच्या काळीजाचा थरकाप उडाला, जोरजोरात छातीत धडधडत होत जणु काळिज छाती फाडून बाहेरच यायचा प्रयत्न करत की काय... आपली नजर त्या खुर्चिवरील आकृतिवरून न हलवता खाली पडलेला मोबाइल डाव्या हाताने चाचपायला लागला.... तसा तो मोबाइल आणखी दुर गेला..
" क........क........ कोण आहेस तु....?" थरथरत्या आवाजात सुरजने एक प्रश्न केला तस त्या आकृतिन हालन बंद केल आणि तशीच शांत बसुन राहिली... पुन्हा त्याच्या केबिन मधे निरव शांतता पसरली... सुरजचा प्रण कंठाशी आलेला तरीही एकटक काळोखात दिसणा-या त्या मानवी आकृतिकडे पहात होता... " मला नाही ओळखलस... " भेसुर, भरड्या आवाजात बोलत खुर्चीवर बसलेली ती आकृति आता हळु हळू ऊभी राहु लागली तसा पुन्हा खुर्ची कर्रर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्रर्र असा आवाज करत पुर्ववत झाली.... हा आवाज त्याला थोडा ओळखीचा वाटला... टेबलच्या पलीकडे उभी ती आकृति आता सुरज कडे वळू लागली पन तीचा चेहरा निट दिसत नव्हता.... खाली पडलेला मोबाइल उचलालचा प्रयत्न करु लागला पन तो मोबाइल त्याच्या बोटानी सरकत आणखी पुढे जाऊ लागला तसा एका क्षणासाठी सुरज ने आपली नजर त्या आकृतिवरून काढली आणि मोबाइल कडे पहात झटकन वर उचलून समोर पाहील तर कोणीच नव्हत... सुरज दचकून जागेवरच बसुन राहीला... 'अरेच्चया .....आत्ता तर इथच होता.....' मनात म्हणत त्यान आपला मोबाइल चा टॉर्च आजुबाजुला फिरवायला सुरवात केली ...पन कोणीच नव्हत... आणि आश्चर्य म्हणजे त्या छोट्या मुलीचा फ्रॉक आणि तो रक्ताने बरबटलेला birthday केकही कुठच दिसत नव्हता.... स्वता:ला सावरत तो तसाच उठून उभा राहीला... आणि त्या लक्ष टेबलवर गेल तस त्याला पुन्हा आश्चर्य वाटल.... कारण काही वेळापुर्वी टेबलखाली पडलेली अंगठी टेबलवरच आणि तशीच होती... तसाच पुढ जात थरथरत्या हाताने तो अंगठी उचलणार इतक्यात कोणीतरी वरून जोरात त्याच्या टेबल च्या काचेवर पडल... आणि टेबलवरील काचेचे छोटे छोटे तुकडे सर्वत्र पसरले... टेबलवर पडलेला तो माणुस जखमानी भरला होता... त्याच्या जखमांमधुन वहाणार रक्त खाली टेबलवर पसरू लागल... असह्य वेदनेन कण्हत त्यान आपला हात पुढे केला आणि सुरजची दातखिळीच बसली... त्या व्यक्तिच्या हातात तोच एका छोट्या मुलीचा रक्ताने बरबटलेला फ्रॉक होता... तो फ्रॉक सुरजसमोर धरूत त्या व्यक्तीच्या तोंडातुन उद्गार आले... "मला वाचव..." त्या भीषण प्रसंगान सुरज जिवाच्या आकांताने ओरडला तोच लाईट्स आल्या... 'शामरावांची' वाचमनची ड्यूटी संपली होती आणि पुढच्या ड्यूटीसाठी 'पांडबा' आलेले साधारण पन्नास पंचावन्न वयाचे सावळे, धिप्पाड जेमतेम शामरावांसारखेच...दोघेही बाहेर उभारून आपापसात बोलत होते.. घरी जाण्यासाठी शामरावांनी सायकल काढलेली...तोच सुरजच्या आवाजाने घाबरून दोघेही धावतच सुरजच्या केबीन मधे आले, सुरज थरथर कापत त्या टेबलकडे पहात होता...त्याच अंग घामान भिजल होत आणि डोळ्यात एक अनामीक भिती दाटली होती... " स....... साहेब ... काय झाल......" सुरजची मानसिक स्थिति पाहुन शामरावानी विचारल... पन सुरज काहीच न बोलता त्या टेबलकडे पहात अजूनही थरथर कापत होता... शामरावांनी त्याच्या खांद्याला पकडुन थोड हलवुन पुन्हा विचारल तसा सुरज शुद्धीवर आला आणि आजुबाजूला पाहू लागल तर सर्व काही ठीक, व्यवस्थित होत... तो टेबल, त्यावरील काचही चांगली होती आणि ती अंगठी अजुनही टेबलवर तशीच होती.. मघापासुन भीषण बनलेल वातावरण आता सामान्य होऊ लागल.... वाचमन कडे पहात सुरज म्हणाला.. " क......काही नाही......" पण त्याच्या आवाजातली, आणी चेह-यावरची भिती लपण्यासारखी नव्हती... दोघे वाचमन एकमेकाकडे पहात खांदे उडवीत तीथुन बाहेर पडले.... सुरज अजुनही घाबरलेल्या स्थितितच होता गडबडीने अंगठी उचलली आणि office बंद करुन लगेच तीथुन बाहेर पडला... बाहेर अजुनही जोराचा पाऊस आणि वारा होताच... सुरजला येताना पाहाताच शामराव छत्री उघडून त्याच्याबरोबर चालत गाडीपर्यन्त गेला.... सुरजने काहीच न बोलता गाडी सुरू केली आणि सुसाट वेगात तीथु बाहेर पडला.... सुरजची गाडी वेगात जात होती..तुला पहातच शामराव मागे फिरले... तसे पांडबा थोड आश्चर्यान म्हणाले.... "साहेबाना अचानक काय झाल..." हातातील छत्री बंद करुन बाजुच्या कोप-यात ठेवत शामराव म्हणाले... "अचानक कुठ.....अरे जेव्हापासुन त्यांच्या मित्राने म्हणजे 'अमित' साहेबानी जिन्यावरून ऊडी मारून आत्महत्या केली त्या नंतर साहेबाना असेच भयंकर भास होत आहेत...." शामरावांच बोलण संपते न संपते तोच पांडबा म्हणाले..." पन सगळे म्हणत आहेत की दारूच्या नशेत सुरज साहेबानीच त्याना वरून ढकलून दिल असणार..." सायकलच लावलेल स्टैंड काढत शामराव म्हणाले... " आत्महत्या की खुन की आणखी काही.... पैसेवाल्या लोकांना काही फरक पडत नाही रे...चार पैसे तोंडात कोंबले की झाल...." बोलत बोलत एका हातात छत्री आणि दुस-या हातात सायकलचे हैंडल सावरत घरी निघाले... सुरज आपल्या नेहमीच्याच वेगात होता.. पावसाचे मोठ मोठे थेंब तड तड करत काचेवर आपटायचे, ते काचेवरचे पाणी व्हायपर बाजुला करून काच स्वच्छ करायच आणि पुन्हा पाण्याचे थेंब जणु काही त्यांचा खेळच सुरू होता... काही वेळा पुर्वी घडलेल्या भीषण प्रसंगातुन मन वळवण्यासाठी गाडीतील म्यूजिक प्लेयर सुरू करुन शांत पने गाणी ऐकत सुरजच गाडी चालवण सुरू होत.. सुरजची कार आता हायवे वर धाऊ लागली तसा पावसाचा जोर आणखीनच वाढला...
त्यातच अचानक विजेचा लख्ख प्रकाशाने डोळे दिपुन जायचे ..आज वाहनही फारशी दिसत नव्हती... काही अंतर पुढे येताच त्याला मागुन एक ट्रक येताना दिसला, ट्रकचा वेग फारसा नव्हता... सुरज ने बाजुच्या आरशात पाहील आणि त्याला पुढे जाऊ देण्यासाठी कार बाजुला घेतली तसा त्या ट्रक चालकाने ट्रक सुरज च्या कार सोबत आणला... पन तो ओव्हरटेक करून पुढे जात नव्हता... सुरज ने सहज त्याच्या कडे पाहील तर तो ट्रक ड्राइवर एकटक त्याच्याकडेच पहात होता... सुरजने त्याच्याकडे लक्ष न देत आपलीच गाडी वेगात पुढे नेली आणि पुन्हा गाणी ऐकण्यात मग्न झाला.... पन काही वेळातच पुन्हा तो ट्रक वेगात त्याच्या बाजुला आला... पन या वेळी तो ड्राइवर सुरजला मागे पहाण्यासाठी खुणावत होता... सुरजने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कारचा वेग आणखी वाढवून त्याच्या खुप पुढे निघून गेला... बाजुच्या काचेत पाहील आता तो ट्रक त्याच्या कारच्या खुप मागे राहीला आणि दिसेनासा झाला.... गाडीचा वेग तसाच होता... मोबाइलची रिंग वाजली तसा त्याने बाजुच्या सिटवरचा मोबाइल उचलला तोच तो ट्रक वेगात त्याच्या बाजुला आला आणि पुन्हा त्या ड्राइवर ने सुरज ला मागे पहाण्यास खुणावले... ****
आता मात्र सुरजला त्याचा भयंकर राग आला होता... त्यान मागे पाहील पन मागे कोणीच नव्हत... आणि इतक्यात त्याच लक्ष समोर गेल ... त्यान गाडीचा वेग कंट्रोल करायला ब्रेक दाबले तशी पावसाच्या पाण्यामुळे गाडी स्लीप होत पुर्ण तिरकी होऊन बाजुच्या झाडाला जाऊन धडकली आणि तीथच थांबली...समोर एक जिवघेण वळण होत... तो तसाच वेगात आला असता तर मोठा अपघात झाला असता... स्वता:ला सावरत त्यान आजुबाजूला पाहील पन तो ट्रक कुठच दिसत नव्हता... या प्रसंगान त्याच ह्रदय अजुन जोरजोरात धडधडत होत...दोन्ही हात स्टेअरिंग ठेऊन थोडा वेळ तो तसाच बसुन राहीला... हा भास होता की सत्य या विचारातच तो गुरफटल होता... काळजाचे ठोके normal झाले तशी गाडी घेऊन त्याने पुन्हा आपला रस्ता धरला... गाडी चालवत तो त्या ट्रक ड्रायवरचा विचार करत होता... जोराचा पाऊस, भयान काळोख आणि आता घडलेली थरारक घटना यामुळे तो आणखीणच दचकुन गाडी गाडी चालवत होता.... बाजुच्या आरशात पाहिल तर मागे एखादही वाहन दिसत नव्हत... हायवेवर असुनही आज भयान शांतता वाटत होती... बाजुला ठेवलेले सिगरेट च्या पाकिटातून एक सिगार काढली तोच त्याची नजर वर असलेल्या आरशात गेली आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला... मागच्या सिटवर एक व्यक्ती बसली होती... अंधार असल्याने चेहरा नीट दिसत नव्हता... पन ती व्यक्ति आपल्या लालबुंद झालेल्ला रक्ताळलेल्या डोळ्यानी एकटक सुरजकडे पहात होती... भीतीन सुरजच्या काळजाचा थरकाप उडाला होता... गर्रकन मान फिरवून त्यान मागे पाहील तर कोणीच नव्हत आणि काही समजायच्या आतच भरधाव वेगात असलेली त्याची कार एका रस्त्याकडेला उभ्या भल्या मोठ्या वडाच्या झाडावर जाऊन आदळली... धडक इतकी भीषण होती की हाद-याने गाडीच्या समोरची काच फुटून झाडाच्या पारंब्या, फांद्या आत आल्या.. सुरज ला खुप मार लागला होता, डोक्यावर मोठी जखम झालेली तर स्टेअरिंगवर छाती बडवल्याने त्याच्या तोंडातून रक्त येत होते... जख्मी अवस्थेतच तो तसाच उतरून गाडीतून बाहेर आला आणि तीथेच बेशुद्ध पडला... काही वेळात तो शुद्धीवर आला तशी त्याला आपल्या आजुबाजुला थोड़ी गर्दी दिसली...
लोक आपापसात कुजबूजत होती... त्यान उठायचा प्रयत्न गेला पन त्याच्या शरीराला भयंकर वेदना होत होत्या.. कोणीतरी आपल्याला hospital मधे घेऊन जाव अस वाटत होत पन त्याला बोलताही येत नव्हत.. त्या डोळसमोर अंधारी येऊ लागली.. आपन आता ईथेच मरणार या भावनेन तो हतबल होऊन तसाच पडून राहीला .... इतक्यात त्याला दुर वरून एका ambulance च्या सायरनचा आवाज येऊ लागला... तस त्याला थोड बर वाटल...जगण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.. ambulance त्याच्या जवळ येऊन थांबली... आपल्या आजुबाजूला होत असलेली हलचाल तो पाहु शकत होता... पन बोलण्याची शक्ति नव्हती... काही लोकानी त्याला उचलून ambulance मधे ठेवले तोच काही दिवसापुर्वी घडलेली एक घटना सुरजच्या डोळ्यासमोर जशी च्या तशी उभी राहीली... सुरज आणि अमित खुप चांगले मित्र, अगदी जिवाभावचे...काही दिवसापुर्वी दोघे पार्टी वरून घरी येत होते दोघानीही थोडी घेतली होती... मस्त enjoy चाललेला, पन बोलता बोलता दोघामधे किरकोळ वाद झाला आणि हा वाद वाढू लागला, दोघेही प्यायलेले त्यामुळे कोणी कोणाचे ऐकायला तयार होईना...वाद इतका वाढला की सुरजने गाडी रस्त्याकडेला थांबवली आणि गाडीतून बाहेर येत दोघे झटापटीवर ऊतरले... सुरजने अमितला जोरात मागे ढकलले, तसा अमित मागे रस्त्यावर पडला आणि मागुन भरधाव वेगात येणा-या ट्रक ड्राइवरने अमितला वाचवायला गाडी एकदम बाजुला वळवली पन ताबा सुटल्याने तो ट्रक तसाच वेगात एका झाडावर आदळला आणि जोराचा आवाज झाला. समोर घडलेल्या या भीषण अपघाताने दोघेही हादरून गेले...काय करावे दोघानाही सुचेनासे झाले... सगळ्या वातावरणात जिवघेणी शांतता पसरली होती... तोच कोणीतरी असह्य वेदनेने कण्हत असल्याचा आवाज आला... दोघेही एकमेकाला आधार देत त्या ट्रकच्या दिशेने चालू लागले... तसा कण्हत असलेल्या त्या व्यक्तिचा आवाज वाढू लागला... हळु हळू पुढ येत सुरज ने ट्रकचा दरवाजा उघडला, आत काचांचा खच पडला होता... स्टेअरिंग वर डोक आपटल्याने त्याचे डोके फुटून रक्तस्त्राव होत होता... धडक इतकी भीषण होती की ट्रकचा पुढचा भागा आत आल्याने ड्राइवर दोन्हीच्या मधे अडकला होता, या दोघाना पहाताच मदतीसाठी त्याने आपला रक्ताने माखलेला हात पुढे केला... त्याची अवस्था बघुन सुरज आणि अमित दोघाच्याही अंगावर काटा आला... भितीने पुढ जाण्याची हिम्मत होत नव्हती... दोघेही मागे फिरु लागले तसा तो रक्ताने बरबटलेल्या अवस्थेत त्या ड्राइवर ने पाणावलेल्या डोळ्यानी त्या दोघासमोर मदतीसाठी हात जोडले... त्याने एका हाताने बाजुला पडलेला ड्रेस उचलला... तो एका छोट्या मुलीचा होता ... आणि तीथेच चौकोनी कागदी box फाडून बाहेर आलेल्या केकवर थोड रक्त लागल होत... कदाचित त्या ड्राइवरच्या छोट्या मुलीचा वाढदिवस असावा .... कोणीतरी घरी त्याची वाट पहात होत... माझे बाबा आता माझ्यासाठी केक आणि नवीन कपडे आणतील म्हणून वाटेला डोळे लाऊन बसलेली आपली पाच वर्षाची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहीली...
त्याच्याकडे पहात अमित आणि सुरज मागे फिरू लागले तसा तो ड्राइवर रडुन मदतीची भिक मागु लागला पन मागे न पहाता ते तसेच आपल्या गाडीत बसले.. मदतीसाठी त्या ड्राइवरची येणारी किंकाळी,रडण, ओरडण याकडे दुर्लक्ष करून दोघानी गाडी काढली आणि तसेच वेगात निघाले... सुरजने बाजुच्या आरशात पाहिल तर तो ट्रक मागे पडू लागला... काही वेळापुर्वी गाडीत दंगा मस्ती करणारे दोघेही भीतीने शांत बसले होते... दोघानाही माहिती होत की त्या ड्राइवरच्या या अवस्थेला आपण कारणीभुत आहोत... त्यान ट्रक वळवला नसता तर अमितच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या असत्या.. काही वेळातच दोघे अमितच्या फार्म हाऊस वर परतले... पन दोघे एकमेकाशी बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते.. सुरज सोफ्यावर डोक धरुन बसलेला तर अमितने फ्रिज मधली पाण्याची बाटली काढली.... पाण्याच्या बाटलीचे टोपन उघडून गटागट पाणी पिऊ लागला आणी थोडे आपल्या डोक्यावर ओतून बाजुच्या खुर्चिवर बसला... तासभर दोघे तसेच बसुन होते... रोजच दंगा, मस्ती, दारू पिण याची सवय असलेल्या अमितच्या या फार्म हाऊस वर आज एक निरव शांतता पसरली होती... इतक्यात बाहेरून एखादी गाडी जोरात धडकावी आणि काचा फुटून चिंधड्या व्हाव्या असा आवाज आला...
दोघाच्या पायाखालची जमीनही हादरली इतका भीषण आवाज होता... भीतीने दोघाचेही काळीज जोरजोरात धडधडत होते जणु छाती फाडुन बाहेरच यावे असे.... एकमेकाकडे पहात दोघेही बाहेर धावले... आजुबाजूला पाहील पन काहीच नव्हत... दोघे तसेच रस्त्यावर आले पन दुरदूर पर्यन्त कुठलही वाहन दिसत नव्हत... दोघानाही थोड आश्चर्य वाटल कारण आवाज दोघानीही स्पष्ट ऐकला होता... दोघे तसेच आत आले, सुरज सोफ्यावर बसणार तोच पुन्हा तोच भीषण आवाज आला... आणि सोबत एका पुरूषाची आर्त किंकाळी ऐकु आली... भीतीने दोघेही गर्भगळीत होऊन एकमेेकाकडे पाहु लागले... अमितमधे आता पाय उचलण्याचही धाडस नव्हत... सुरज मात्र थोड धाडस कारत बाहेर गेला... अमित तसाच थरथर कापत भिंतीला चिकटून उभा होता... अचानक त्याला बारिक आवाजात कोणाचीतरी कुजबूज ऐकू आली... तो लक्ष देऊन ऐकु लागला, तस कोणीतरी भिंतीच्या पलीकडे आपापसात बोलत असल्याच जाणवल... त्यान शांतपणे आपले कान भिंती जवळ नेले तोच कोणीतरी त्याचे केस पकडून त्याच डोक भयंकर ताकतीन त्या भिंतीवर आपटल तसा अमित खाली पडला... अमितच्या डोक्यात भेग पडली आणि त्यातून एकसारख रक्त वाहु लागल... त्याच्या डोक्यातून वहाणार रक्त जमीनीवर पसरू लागल... तो मदतीसाठी सुरजला बोलवणार तोच पुन्हा कुणीतरी त्याचे केस पकडून डोक जमिनीवर आपटल... या वेळी दोन्ही दातामधे अडकल्याने त्याची जिभच तुटली... आता त्याच्या तोंडातून आवाजही येत नव्हता.. अमितने तशीच आपली मान फिरवून पाहिल तर त्याला मारणारा सुरजच होता.... त्याचा जिवाभावाचा मित्रच आज त्याचा जिव घेत होता... इतक्यात सुरज शुद्धीवर आला तस त्याने अमितकडे पाहिल, त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल पाहुन सुरज हादरुन गेला... थरथरतच त्यान अमितला विचारल... " अ......अ.....अमित ...... कोणी मारल तुला एवढ....थांब घाबरु नकोस... तुला hospital मधे नेतो..." तस त्यान अमितला ऊचलल.... अमितच जखमेन सुन्न झाला होता त्याला काहीच बोलता येत नव्हत.. त्याच्या डोक्यातून तोंडातून रक्त येत होत.... सुरज त्याला घेऊन जिन्याच्या पाय-या चढू लागला तसा अमित आणखी घाबरला... पन त्याच शरीर साथ देत नव्हत... सुरज तसाच त्याला वर घेऊन गेला आणि वरून खाली फेकुन दिल.... अमित जागेवरच संपला.... सुरज शुद्धीवर आला आणी अमितची अवस्था बघुन पुन्हा बेशुद्ध झाला... काही दिवसापुर्वी घडलेल हे थरारनाट्या सुरजच्या डोळ्यासमोर उभ राहिल... काही लोकानी जखमी सुरजला ambulance मधे ठेवले... आपला जिव वाचला या आशेन त्याला थोडा धीर आला... सायरन चा आवाज करत ambulance रस्त्याने धावत होती... स्ट्रेचरवर जखमानी कण्हत पडलेल्या सुरज ने विचारले... " hospital अजून किती दुर आहे ......" त्याच्या प्रश्नाला कोणीतरी भरड्या आवाजात उत्तर दिल... " hospital जवळ असो की दुर असो... तु नाहीस वाचणार ....." एवढ बोलुन ambulance च्या ड्राइवरने मागे सुरज कडे पाहिल आणि भयान हास्य करत पुढे म्हणाला.... "
मी पन वाचलो नव्हतो ....." त्याच्याकडे पहाताच सुरज चे डोळे पांढरे झाले.... त्या ओळखल हाच तो ड्राइवर जो आमच्या चूकीमुळे मेला होता... भीतीने तो जोरजोरात ओरडू लागला.. "..मला सोड ... मला माफ कर .... जाऊदे मला...." इकडे accident झालेल्या ठिकानी लघुशंखेस गेलेले ड्राइवर आणि एक कर्मचारी चालत आले... तर ambulance कुठेच नव्हती... त्या गर्दितलच एकजन म्हणाला तुम्ही इथ मग ambulance कोण चालवतय.... Ambulance मधे सुरजच ओरडण चालुच होत.... "मला सोडा...मला सोडा.. मला माफ करा...." आज सुरज आपल्या आयुष्याची भीक मागत होता... तोच सुरजला आपल्या पायाशेजारी खाली मान घालुन बसलेल्या आणखी एक माणसाचा आवाज आला... " तुला कस सोडु....." आवाज ओळखीचा होता, तसे सुरजने त्याच्याकडे पाहीले....आणि प्राण कंठाशी आला... भितीने त्याची दातखिळीच बसली... तस सुरजकडे पहात शेजारी बसलेला तो माणुस म्हणाला.... " तु तर माझा जिवाभावाचा मित्र आहेस.." त्यान आपली मान वर करत सुरजकडे पाहिल....तो अमित होता..... आता ambulance सूसाट वेगाने धावत होती...तसे सुरजच्या काळजाचे ठोके'धाड धाड धाड ' करत आणखी वाढु लागले...तशीच ambulance ससाट धावत एका वळणावरुन खाली कोसळली आणि यावेळी सुरजने शेवटचा श्वास घेतला...