मी विराज .... तुमच्यासाठी अजून एक कथा घेऊन आलो आहे...हि कथा मला माझ्या गावातील मित्राने सांगितली होती.हि त्याच्या आजोबांबरोबर घडलेली घटना आहे.तर मी सुरवात करतो. .
हा डिसेंबरचा महिना होता.दाट धुके पडले होते.त्याचे आजोबा शहरामध्ये क्लार्क म्हणून काम करायचे.त्या दिवशी ऑफिसमधील काम संपवून सगळे लोकं लवकर घरी परतण्याची तयारी करत होते.आजोबा तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक होते.नेहमी प्रमाणे तेही आपले काम संपवून आपल्या गाडीने घराकडे निघाले.त्यांना बाजारातून काही सामान घ्यायचे होते म्हणून ते बाजाराच्या दिशेने जाऊ लागले.पुढे जाउन त्यांना मच्छी मार्केट दिसले.व त्यांनी मासे घ्यायचे ठरवले.ताजे मासे बघण्यात आणि घेण्यामध्ये थोडा जास्तच उशीर झाला.त्यांची नजर आपल्या घड्याळाकडे गेली तेव्हा त्यांना समजले कि घरी पोहोचण्यासाठी खूपच वेळ लागेल.मग त्यांनी लवकर घरी पोहोचण्यासाठी जंगलाच्या वाटेने जायचे ठरवले.मग त्यांनी आपला रस्ता बदलला आणि जंगलाच्या दिशेने गाडी वळवली. रात्रीचे ११ वाजले होते त्यामुळे आजोबा गाडी वेगात पालवत होते.तेव्हा अचानक त्यांनी जोरात ब्रेक मारला आणि गाडी थांबवली.त्यांनी पहिले कि रस्त्याच्या मधोमध एक बाई जोरजोरात रडत होती.पण त्यांनी विचार केला कि एवढ्या रात्री हि बाई जंगलात काय करत आहे? पण त्यांना वाटले कि हि कोणत्या मजुराची बायको असेल आणि त्याच्याशी भांडून हि इथे पळून आली असेल.ते गाडीतून उतरले व तिच्या जवळ जाऊ लागले.आणि त्यांनी तिला विचारले कि एवढय रात्री तू इथे काय करत आहेस? हे ऐकून ती काही उत्तर न देत अजून जोरात रडू लागली.संपूर्ण जंगलात तिचा तो रडण्याचा भयानक आवाज घुमू लागला.आजोबांनी परत विचारले कि तू कोण आहेस? तरी पण ती काहीच नाही बोलली.तेव्हा आजोबा तिला म्हणाले कि आज माझ्याबरोबर माझ्या घरी चाल आणि सकाळ झाल्यावर परत आपल्याघरी निघून जा कारण ह्या जंगलात थांबणे धोकादायक आहे.म्हणून रात्रभर इथे ह्या जंगलात थांबण्यापेक्षा माझ्या घरी चाल आणि सगळ्यांकरिता जेवण बनवून सकाळी परत आपल्याघरी निघून जा.हे ऐकून ती लगेच आजोबांबरोबर जाण्यासाठी तयार झाली. आणि गाडीच्या मागच्या सीटवर बसली.
आजोबांनी तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न केला पण तिने तिचे तोंड साडीचा पदराने झाकून ठेवले होते. काही वेळात गाडी घराजवळ आली.घरातील सगळे कधी पासून त्यांची वाट पाहत होते.गाडी थांबतच त्यांच्या आईने त्यांना विचारले कि आज अचानक एवढा उशीर का झाला?तेव्हा आजोबांनी सगळी घडलेली घटना त्यांच्या आईला सांगितली.आणि सांगितले कि आज रात्री जेवण हिच्याकाढून बनवून घ्या आणि उद्या सकाळी ती परत आपल्या घरी निघून जाईल.एवढ्या रात्री हि बिचारी जंगलात एकथि कुठे भटकली असती म्हणून मी हिला माझ्यासोबत घरी घेऊन आलो.पण त्यांच्या आईला त्या बाईवर थोडासा संशय आला कि हि कोणी चोर तर नसेल..किंवा रात्री सगळे झोपल्यानंतर हि काही चोरणार तर नाही ना?पण मुलाच म्हणन कसं टाळणार. त्यांच्या आईने त्या बाईला सांगितले कि "हे बघ आजच्या दिवस मी तुला राहू देत आहे पण उद्या सकाळ होताच तुला इथून जावे लागेल.आणि तिला ते सामान उचलून किचन मध्ये जायला लावले.आणि जेवण तयार करायला सांगितले.ती बाई परत काहीच नाही बोलली.फक्त हम्म अस करून ती ते सगळ सामान उचलून आईच्या मागे मागे किचन मध्ये गेली. सामान ठेवून झाल्यावर आईने तिला लवकर जेवण बनवायची ताकीद दिली.आणि आई तिथून निघून गेली.पण त्यांना अस्वस्थ वाटत होते.परत काही वेळाने त्या किचन मध्ये ती बाई काय करत आहे हे बघण्यासाठी गेल्या आणि आईला त्या बाईचा चेहरासुद्धा बघायचा होता.पण तिथे पोहोचून त्यांनी पाहिलं कि ती बाई अजून मास्यांचीच पिशवी काढत होती. हे बघून त्या ओरडल्या कि हे काय तू अजून मास्यांचीच पिशवी काढत आहे बाहेर सगळेजण जेवण्यासाठी थांबले आहेत आणि तू काय जेवण उद्या सकाळी बनवणार आहेस का?आणि तिच्या चेहऱ्यावर अजूनही पदर होता.नंतर आई तिला म्हणाली कि तू जेवण बनवायची तयारी कर मी तोपर्यंत चूल पेटवते.पण ह्याच बरोबर आई त्या बाईचा चेहरा बघण्याचा खूप प्रयत्न करत होती. पण ती जेवढा प्रयत्न करायची तेवढा ती बाई अजून पदर ओढून घायची स्वताच्या चेहऱ्यावर.शेवटी आईने नाईलाजाने त्या बाईला म्हणाली कि हे बघ मी चूल पेटवली आहे आता लवकर जेवण बनव आणि काही गरज पडली तर बोलाव मला. तरीपण ती बाई काहीच नाही बोलली. आईला वाटले कि इथून जाणेच चांगले राहील. नाहीतर माझाही वेळ वाया जाईल ..आणि त्यांना वाटले कि ती बाई अनोळखी माणसांना घाबरत असेल... हा सगळा विचार करून आई त्या बाईला म्हणली कि मी येते लवकर तू जेवण बनवून ठेव.आणि तिथून निघून गेली.
त्या अजूनही अस्वस्थ होत्या.त्या कधी आपल्या खोलीत ,कधी आपल्या मुलांच्या खोलीत , कधी बाहेर सगळी कडे चक्कर मारत होत्या कि कधी काही अभद्र घडू नये म्हणून...एक मिनिट पण त्या शांत बसत नव्हत्या.अजून फक्त ५ मिनिटच झाले होते पण त्यांना एक एक मिनिट खूप मोठा वाटत होता.वेळ जातच नव्हता.आठ मिनिट खूप मुश्किलीने गेले तेवढ्यात त्यांना काहीतरी जाणवले आणि त्या लगेच किचनकडे गेल्या..आणि तिथे पोहोचल्यावर त्यांना जे दिसले ते पाहून त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता....
किचन एवढे भयानक दिसत होते .त्यांचे पाय हलतच नव्हते.त्यांच्याकडून ना पुढे चालवले जात होते ना मागे. हे दृश्य पाहुन्त्यांचे हृदय काम करेनासे झाले होते..ती बाई त्यांच्यासमोर बसून कच्च्या मास्याचे लचके तोडत होती.पूर्ण किचन मध्ये रक्त आणि मास्यांचे तुकडे पडले होते... त्या बाईच्या तोंडावरून पदरही सरकला होता एवढा भयानक चेहरा आज पर्यंत आईने नव्हता बघितला . लांबच लांब केस , वाढलेली नखे, दात ओठ फाडून बाहेर आलेले ,डोळे एकदम लाल आणि मोठे आणि भयानक. हे सर्व पाहून आईच्या काळजाचा थरकाप उडाला होता..पण त्या बाईचे आईकडे लक्षच नव्हते एवढी ती बाई मासे खाण्यामध्ये मग्न होती..आणि किचन मध्ये तिचा तो भयानक आवाज घुमत होता... किचन घरच्य मागच्या बाजूला असल्यामुळे घरातील लोकांचे तिथे लक्ष्य नव्हते.
आईला काहीच सुचत नव्हते कि काय करावे.त्यांना वाटले कि जर मी ओरडले तर हि बाई घरातल्यांना काही नुकसान तर करणार नाही ना ? ह्या बाईपासून घरातल्यांना कसे वाचवावे हे त्यांना समजतच नव्हते..त्यांच्या डोक्यात फक्त देवाचा विचार येत होता. त्या हळूहळू ओट्याजवळ गेल्या आणि त्यांनी पटकन एक ताट उचलला आणि त्या चुलीच्या दिशेने पाळल्या .पण त्या बाईचं त्यांच्याकडे लक्ष्य गेला आणि ती बाई पण काहीतरी विचार करून आपल्या जागेवर उठली आणि आईच्या दिशेने चालू लागली...पण आईला माहित होते कि थोडाही वेळ वाया घालवून चालणार नाही आणि जर असे झाले तर काहीही विपरीत होते शकते...त्या बाईने काही करायच्या आताच आई चुलीजवळ पोहोचली आणि तिने जळता कोळसा त्या ताटात भरून त्या बाईच्या अंगावर फेकला... त्यामुले तिला भयंकर वेदना होऊ लागल्या आणि ती भयानक आवाज काढू लागली.आता ती एवढ्या जोरात ओरडत होती कि तिचा आवाज बाहेर पर्यंत ऐकू येत होता.तो आवाज ऐकून घरातील बाकीचे लोकं किचनच्या दिशेने पळाले. ती बाई जोरजोरात गुरगुरत होती तो आवाज ऐकून आईने कान बंद करून घेतले तरी सुद्धा आवाज येत होता. आणि ती आईला पकडण्यासाठी तिच्या जवळ येत होती..तोपर्यंत घरातील सगळे किचनमध्ये आले...
एवढी गर्दी बघून ती बाई घाबरली...आणि एकदम जोरात ओरडली ह आवाज ऐकून सगळे कान बंद करण्याचा प्रयत्न करू लागले...आणि घाबरून ती बाई जंगलाच्या दिशेने पळत गेली आणि अदृश्य झाली... हे सर्व पाहून घरातील सगळे खूप घाबरले आणि तसेच बघत राहिले..त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता...ह्या सगळ्यानंतर त्यांनी आईने दाखवलेल्या हिंमतीची दाद दिली ...अशा प्रकारे आजोबांच्या आईने त्यांच्या घरातल्यांना एका चुडेल पासून वाचवले... THE END ...!!!