लेखिका - अश्विनी कुलकर्णी
माझे बापजादे जर टाटा अंबानी असते तर मी सुद्धा मोठा उद्योगपती झालो असतो. " व्यवसाय करायला माझ्याकडे मोठे भांडवल नाही. माझ्याकडे मोठी जागा नाही. " माझ्याकडे हे नाही. माझ्याकडे ते नाही. " असं रडगाणं गाणारे तुमच्या आजूबाजूला शेकडो सापडतील. एका बुटांच्या कंपनीत काम करणाऱ्या एडी डॉसलरकडे सुद्धा यापैकी काहीच नव्हतं. पण त्याच्याकडे होती एक जिद्द - फक्त खेळाडूंसाठी स्पोर्ट्स शूज बनवायचे. एकदा का ते खेळाडूमद्धे लोकप्रिय झाले कि हजारो लोक आपले स्पोर्ट्स शूज खरेदी करतील. आपली कल्पना साकार करायला तो तडक कामाला लागला. त्याने ती नोकरी सोडली. घरातील ऐसपैस बाथरूममद्धेच त्याने हातानी बूट शिवायला सुरुवात केली. जोडीला त्याचा भाऊ होता. त्या एवढ्याशा जागेत त्याने आपल्या भव्य स्वप्नाचा पाया रचला. आणखी दोन वर्षांनी त्याच्याकडे मोठी जागा होती, जिथे एका वेळी २७ लोक काम करू शकत होते. त्याच्या त्या छोट्याशा कारखान्यात दररोज बुटांचे १०० जोड बनू लागले होते. फक्त खेळाडूंसाठी बूट बनवायचे हि कल्पना तोपर्यंत कुणालाही सुचली नव्हती. " आदीदास " नावाने विक्रीला आणलेल्या त्याच्या स्पोर्ट्स शूजनी बाजारात चांगलाच जम बसवला.
बर्लिन ऑलिम्पिकमद्धे त्याच्या कंपनीचे बूट घालूस महान धावपटू जेसी ओवेन्सने चार सुवर्ण पदकं मिळवली आणि आदीदासच्या स्पोर्ट्स शूजची चर्चा जगभर सुरु झाली. १९५४ च्या फूटबॉलच्या विश्वचषक सामन्यात हंगेरी विरुद्ध जर्मनी असा अंतिम फेरीतील सामना होता. हंगेरी बलाढ्य संघ होता. त्यामुळे तोच जिंकणार अशा पैजा लागल्या होत्या. प्रत्यक्षात जर्मनीने हंगेरीचा पराभव करून विश्वचषक जिंकला. जर्मनीच्या त्या विजयाचे सारे श्रेय जर्मनीच्या आदीदास कंपनीला मिळाले. कारण पावसामुले निसरड्या होणार्या मैदानावर खंबीरपणे खेळण्यासाठी आदीदासने खास प्रकारचे बूट आपल्या खेळाडूंसाठी बनवले होते. एडी डॉसलर यांनी त्यांच्या बुटाना स्कृच्या सहय्य्याने स्टडस बसवण्याची सोय करून दिली होती. हवामान चांगलं असेल तेव्हा छोटे स्टडस, तर मैदान पावसामुळे ओलं झाल्यास छोटे स्टडस काढून लांबट स्टडस बसवणं खेळाडूना शक्य झालं. त्या दिवशी मोठा पाउस पडू लागला. तेव्हा जर्मनीच्या खेळाडूंनी आपल्या बुटाना लांबट स्टडस बसवले. त्यामुळे त्या निसरड्या मैदानावर जर्मन खेळाडूंचा खेळ हंगेरीच्या खेळाडूंपेक्षा अधिक बहरला. आणि त्यांनी चक्क विश्व चषकाला कवेत घेतलं.
त्या दिवसापासून " आदीदास " नावाच्या त्या ब्रांडने पुऱ्या विश्वाला भुरळ घातली. फूट बॊलच नव्हे तर टेनिस, बास्केट बॉल, क्रिकेट, हॉकी अशा प्रमुख अकरा प्रकारच्या खेळातील खेळाडूंसाठी आदीदासने अकरा प्रकारचे बूट बाजारात आणले. खेळाडूंनी आणि त्यांच्या चाहत्यांनी आदीदासला डोक्यावर घेतलं. तोपर्यंत दोघा भावामद्धे वितुष्ट आलं. अन ते वेगळे झाले. दुसर्या भावाने " प्युमा " नावाने आपली वेगळी कंपनी स्थापन केली. १९७८ मद्धे एडी डॉसलरच निधन झालं. तोपर्यंत १९६५ मद्धे अमेरिकेची नाइके कंपनी त्यांना स्पर्धक म्हणून पुढे आली. आज स्पोर्ट्स शूज, स्पोर्ट्स क्लोथस, गोगल, अक्सेसरीज, अशा विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आदीदासमद्धे तब्बल ५७ हजार कर्मचारी काम करतात. त्याची उलाढाल आहे - तब्बल सव्वा लाख कोटी रुपये. ब्राजिल विश्व चषक सामन्याचे प्रमुख प्रायोजक आहेत " आदिदास " .आज चांगल्या पगाराची नोकरी मिळाली कि भारतीय तरुण आवर्जून खरेदी करतो ते आदिदास कंपनीचे १०-१२ हजारचे स्पोर्ट्स शूज. आज देशात असे लाखो तरुण आहेत, तर जगभरात करोडो तरुणांना आदिदास नावाने भुरळ घातलीय. मित्रानो, एका सामान्य माणसाने पाहिलेल्या भव्य स्वप्नाची हि कहाणी तुम्हाला आयुष्यात नक्कीच प्रेरणा देत राहील. आयुष्याच्या बिकट वाटेवर तुम्ही अनेकदा पडाल, धडपडाल. त्यामुळे नाउमेद व्हायची काहीच आवश्यकता नाही. पुन्हा उठून कामाला लागा. विश्वास ठेवा यश तुमची आतुरतेने वाट पाहत असेल.