सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली Flag of Pakistan. पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. डिसेंबर १८ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. वरील मालिकेनंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात (नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या) जॉन राईटने सचिनचा झेल पकडला ज्यायोगे सचिन जगातला सर्वात तरूण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या इंग्लंडच्या दौऱ्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकवले. परंतु ह्या काळात त्याच्याकडून फारश्या लाक्षणिक खेळ्या झाल्या नाहीत. तेंडुलकरला खरा सुर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो (बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्ध) मालिकावीर राहिला आहे.
सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर ९, इ.स. १९९४ साली कोलंबो, श्रीलंका येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली.
सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले.
१९९७ साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा १००० कसोटी धावा केल्या. ह्याची सचिनने १९९९, २००१ आणि २००२ साली पुनरावृत्ती केली.
तेंडुलकरच्या नावे एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे. हा पराक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे (१९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३). १९९८ साली त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही.
गोलंदाजी
तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ३७ बळी आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते. आणि बऱ्याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरतो. जरी त्याची गोलंदाजीची सरासरी ५० च्या वर असली, त्याला 'जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज' समजण्यात येते.
अनेक वेळा[६] सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. खालील सामन्यांमध्ये सचिनच्या गोलंदाजीची नोंद घेता येईल,
१९९७-९८ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोची येथे ५ बळींची कामगिरी. २६९ धावांचे लक्ष्य समोर असताना ३१ व्या षटकात ऑस्ट्रेलियाची २०३/३ अशी मजबूत स्थिती होती. सचिनने १० षटकात केवळ ३२ धावा देऊन एम.जी.बेवन, एस.आर.वॉ, डी.एस.लेमन, टी.एम.मुडी आणि डी.एम.मार्टीन ह्यांना बाद करून सामना भारताच्या बाजूने वळवला
१९९३ सालचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील हिरो कप उपांत्य सामन्यामधील शेवटचे षटक. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी एक षटक शिल्लक असताना ६ धावांची गरज होती. सचिनने त्या सामन्यात एकही धाव न देता तीन चेंडू टाकले व संपूर्ण षटकात केवळ तीन धावा देऊन भारताला सामना जिंकून अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत केली.
शारजामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध[९] १० षटकांत ४/३४ ची कामगिरी केली. त्यामुळे विंडीजचा डाव १४५ धावांत आटोपला.
आय सी सी १९९८ मधील उपांत्यपूर्व फेरीमध्ये ढाक्कामध्ये त्याने १२८ चेंडूंत १४१ धावा केल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ बळी मिळवून भारताचा उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा मार्ग सुकर केला.