मिलिंद बोकिलांच्या सिद्धहस्त लेखणीतून, शंभर वर्षांत एकदाच निर्माण होणारे अश्या प्रकारचे एक पुस्तक लिहून झाले. शाळा हे पुस्तक जोशी ह्या नववीत शिकणार्या मुलाची कथा सांगते. एका बाजूने इंदिरा गांधीनी लावलेली आणीबाणी आणि दुसर्या बाजूने जोश्याच्या मनात शिरोडकर विषयी निर्माण होणारी प्रेम भावना असे फार छान चित्रण बोकीलांनी केले आहे.

चित्रपटाने पुस्तकाला न्याय दिला आहे. लुयीस आर्मस्ट्रोन्ग ह्याच्या "ला विएन रोस " ह्या संगीताने चित्रपट उघडतो आणि कोवळ्या प्रेमाच्या दुनियेत आम्हाला घेवून जातो. जोश्याच्या नजरेतून आम्ही शिरोडकरला पाहतो. जोश्याच्या हृदयाच्या ठेक्याबरोबर आमच्या हृदयाचे ठेके सुद्धा वाढतात आणि जोश्याच्या नरूमामा चे शब्द आम्हाला आठवतात. "Life is what happens to you when you are busy doing something else".



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel