"अभिव्यक्ती स्वातंत्र्य" हा एक जबाबदारीचा अधिकार आहे हे सोयीस्कररीत्या विसरले जात आहे, लोकांच्या भावनांचा बाजार मांडून वेश्यावस्थेतील प्रसार माध्यम त्यात हातभार लावत आहेत. मनात येणार्या सर्वच गोष्टीना अधिकार आहे म्हणून जर उघडपणे मांडले तर अराजक माजेल, काही वेळा परिस्थिती चे भान ठेऊन व्यक्त व्हावे लागते हा साधारण विवेक आहे. जर सामाजिक भान, राष्ट्र भावनेचा आदर न ठेवता चित्रकार , शिल्पकार , आणि इतर सर्व "कार" व्यक्त होऊ लागले तर सामाजिक आरोग्य नक्कीच बिघडेल आणि जाणून बुजून जर हे कुणी करत असेल तर हा गुन्हा का होऊ नये ??? ....

ज्या वेळी आपण हक्क आणि अधिकार याबद्दल बोलतो तेव्हा कर्तव्य आणि जबाबदारी सुद्धा जोडीने येते .. "स्वातंत्र्याचा स्वैराचार होण्यास वेळ लागत नाही "

मुलभूत कर्तव्य-
संविधान ५१ क नुसार (४२ वी सुधारणा, कलम ११ द्वारे )
१. संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज , राष्ट्गीत यांचा आदर राखणे
२. ज्यांच्या मुळे आपल्या राष्ट्रीय लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करणे आणि त्यांचे अनुसरण करणे.
३. भारताची सार्वभौमता, एकता, यांचे संरक्षण करणे
४. वैज्ञानिक दृष्टीकोन,मानवतावाद, शोधकबुद्धी, आणि सुधारणावाद यांचा विकास करणे
५. देशाचे संरक्षण करणे आणि आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रसेवा बजावणे
६. संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारसाचे मोल जाणून तो जतन करणे
७. नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रा बद्दल दयाबुद्धी बाळगणे
८. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचार निग्रहपूर्वक टाळणे
९. राष्ट्र सतत, उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी कशा गाठत जाईल अशाप्रकारे सार्व व्यक्तिगत व सामुदाईक कार्यक्षेत्रात यश संपादन करण्यासाठी झटणे.

काय आपण आपली कर्तव्य योग्य पद्धतीने पाळतोय ?

लेखक - अमोल गायकवाड(मुंबई)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel