अशा प्रकारच्या मासिकांचे महत्व कोठवर वर्णावें? ग्लॅडस्टन या  महान्मुत्सद्याने यथार्थ उदार काढले कीं, ''मनुष्याच्या मनास वेड लावणारी ही पारलौकिक विद्या फार महत्वाची आहे. '' कोणतेही काम  एकदां हाती घेतले. म्हणजे त्याच्यासाठीं आपण जिवांचे रान कसें करितां, क्षणभरही फुरसत न घेतां कसें अखंड एकमानतेनें श्रम करितां हे मला पूर्णपणें विदित आहे. शिवाय या मासिकाचें संगोपन म्हणजे तर तुमंचे प्रेमाचे काम, तेथें तुम्ही तनमनधन अर्पण कराल यांत शंकाच नाही. तुम्हांला या गोष्टीत स्वत:चा अनुभव असल्यामुळे तर  यश हें ठेवलेलेंच. अशा प्रकारचें मासिक आपल्या देशांत एकच उत्पन्न होत आहे. जगांतील सर्व शोधांची संकलित माहिती यांत तुम्हांस देतां येईल'' अशा प्रकारचें ज्योतीद्र मोहन यांचे उत्तेजनपर पत्र आल्यावर हें मासिक काढण्याचे मुकर झालें. याचा पहिला अंक मार्च १९०६ मध्यें निघाला. या मासिकाचा उद्देश असा होता की, जुन्या पारलौकिक कल्पनांचा फैलाव करणें, आणि मृत्यूची भीती नाहींशी करणें. मृत्यु ही फार दैवी देणगी आहे असें सिद्ध करणें. पहिल्याचय अंकांत शिशिरबाबूंनी पारलौकिक विद्येंचे महत्व यांवर सुंदर लेख लिहिला आहे.  A man who is convinced of the existence of an after life, will consider death as merely a journey home” हें सिध्द करुन देऊन मनुष्याची खात्री करणें हें या मासिकाचें ध्येय होते. या मासिकांतून शिशिरबाबूंनी नाना लेख लिहिले आहेत. स्वत:चे अनुभव सांगितले आहेत. त्यांचा या परलोक व्याख्याविषयी भावाच्या बाबतींत अनुभव प्रसिध्दच होता. परंतु दुसरेही अनेक अनुभव तयांस आले. एक दिवस शिशिरबाबूंच जरा बरें नव्हतें. दोनचार जुलाब झाले होते. पोटहि फार दुखुं लागलें. त्यांच्या शेजारी मोतीलाल होते. एकाएकीं मोतीलालच्या चर्येत फरक पडला.  ते चेहरा कसासाच करुं लागले. शेवटी ते शिशिरबाबूंच्या जवळ येऊन  त्यांच्या अंगावर हात फिरवू लागले आणि त्यांस झोंप लागली. थोडया वेळाने मोतीलाल शुध्दीवर आले. शिशिरबाबूंची वेदनाही थांबली. कोणी तरी अंतरिक्षातील देवदुतानें आपली वेदना थांबविण्यासाठी भावांच्या शरीरांत प्रवेश करुन आपली दु:खे शमविली असें शिशिरबाबू म्हणत. परलोकविद्येच्या प्रसारार्थ अशा प्रकारें सदैव खटपटी चालूं होत्या त्यांच्या मासिकावर सर्वांनी उत्कृष्ट अभिप्राय आहेत. ते येथें सांगण्याची जरुरी नाही.

हें काम चाललें असतां निमाई चारित्राचा शेवटचा भाग ते लिहित होते. जरी आज ते दोन वर्षे हळूहळू आजारी होते तरी त्यांचे काम  रोजच्याप्रमाणे चाललें होतें. ते खरे कर्मयोगी होते. 'कर्तव्य' हेंच  त्यांच्या जीवनाचें रहस्य होत. आलस्य त्यांच्या गांधी नव्हते. शीरशहा म्हणत असे. 'नेहमी कार्यमग्न असणें हें मोठया माणसास शोभतें.  शिशिरबाबू जर प्रचंड लेखक होते तर ते प्रचंड वाचणरेहि होते.  'व्हॅरो' विषयी एका प्राचीन टीकाकारानें म्हटले आहे.  So much has he written that it seems impossible he could have read anything, os much has he read that it seems in credible he could have written anything मरणकाल समीप येत चालला तरी मासिकांचे काम नमुनेदार चाललें होते. निमायी चरित्राचा  सहावा भाग छापत होता. शिशिरबाबूंचे एक आवडतें वाक्य असे. ‘Time is the best gift of God to man’ या वेळाचा त्यांनी सदुपयोग केला. एक क्षणहि वायां दवडला नाही. निद्रानाश व अग्निमांद्य हे रोग त्यांस जडले होते तरी ते आपला वेळा ईश्वरांत लीन होण्यांत किंवा इतर व्यवसायांत दवडीत. लहानपणापासून त्यांचे जीवन मात्र दोन मार्गांनी चाललें होतें.

डॉक्टर पी. एन् नंदी यांच्या विद्युद्रुपचारांनी त्यांची प्रकृति सुधारत होती. मरण येण्यापूर्वी एक आठवडा त्यांना जबर पडसें झालें. व थोडा तापहि आला. त्या दिवशी ते बाहेर फिरावयास गेले नाहीत. अंत जवळ येत चालला. ते आतां फक्त पारलौकिक गोष्टीची चर्चा करीत होते. अंथरुणास ते खिळल्यासारखे झाले. ते मित्रांस म्हणत 'आतां ईश्वराशीं मला असें समरस होतां येंते आहे, तसें कधींच वाटले नाही. 'ज्या दिवशीं ते निजधामास गेले त्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी ते ईश्वराच्या प्रेमाची , त्याच्या निरतिशय सौंदर्याचींच फक्त स्तुतिस्तोत्रें गात होते. हें वर्णन करीत असतां त्यांस इतका आनंद झाला की ते समाधीत निमग्न झाले. अलीकडे अशी त्यांची पुष्कळा वेळा स्थिति होत असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel