न्यूटन ने काळाला एका बाणासारखे मानले आहे, जो एकदा सोडला की एका सरळ रेषेत जात राहतो. पृथ्वी वरचा एक सेकंद हा मंगळा वरच्या एक सेकंद एवढाच होता. ब्रम्हांडात पसरलेल्या सर्व गोष्टी एका गतीने चालत असत.
आईनस्टाईन ने एका नव्या क्रांतीकारी धारणेला जन्म दिला. त्यांच्या नुसार काळ हा एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे, जो तारे, आकाशगंगा यांच्या फिरण्यामुळे वाहत राहतो. त्याची गती ग्रहांजवळून फिरताना कमी जास्त होत राहते. पृथ्वीवरील एक सेकंद आणि मंगळावरील एक सेकंद भिन्न आहेत. ब्राम्हांदातील सर्व गोष्टी आपापल्या गतीने चालत राहतात. आईनस्टाईन यांना आपल्या मृत्युच्या पूर्वी एका समस्येला सामोरे जावे लागले होते.
प्रिन्स्टन येथील तचे शेजारी कर्ट गोएडल (जे कदाचित गेल्या ५०० वर्स्शांतील सर्वोत्कृष्ट गणितीय तर्क शास्त्रज्ञ आहेत) ने आईनस्टाईन च्या समीकरणांचे एक असे सोल्युशन काढले जे काळाच्या यात्रेला संभाव बनवत होते. काळाच्या या नदीच्या प्रवाहात आता काही भोवरे निर्माण झाले होते आणि तिथे काल एका वर्तुळात फिरत होता. गोयेडल चे सोल्युशन शानदार होते, ते सोल्युशन एका अशा ब्रम्हांडाची कल्पना करत होते जे एका फिरणाऱ्या द्रवाने भरलेले आहे. जो कोणी या फिरत्या प्रवाहाच्या दिशेने चालत राहील तो स्वतःला पुन्हा प्रारंभिक बिंदूवर घेऊन जाईल परंतु भूतकाळात. आ
पल्या वृत्तांतात आईन्स्टाईनने लिहिले आहे की तो आपल्या समीकरणांच्या सोल्युशन मध्ये काळाच्या यात्रेच्या सम्भावनेने हैराण झाला होता. परंतु त्याने नंतर असा निष्कर्ष काढला की ब्रम्हांड फिरत नाही, ते आपला विस्तार करते. (महाविस्फोट - Big Bang Theory). त्यामुळे गोएडलचे सोल्युशन मान्य केले जाऊ शकत नाही. स्वाभाविक आहे की जर ब्रम्हांड फिरत असते तर मात्र काळाची यात्रा संपूर्ण ब्रम्हांडात शक्य होती.