कर्णाकडून जर त्याची कवच कुंडले काढून घेतली गेली नसती आणि इंद्राने दिलेले अमोघ अस्त्र जर कर्णाने घटोत्कचाऐवजी अर्जुनावर वापरले असते तर भारताचा इतिहास आणि धर्म आज काही वेगळाच असता.
भगवान कृष्णाला ही गोष्ट चांगली माहिती होती की जोपर्यंत कर्णाच्या जवळ त्याची कवच कुंडले आहेत तोपर्यंत त्याला कोणीही मारू शकत नाही. अशामध्ये अर्जुनाच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नाही. इकडे देवराज इंद्र देखील चिंतेत पडले होते, कारण अर्जुन त्यांचा पुत्र होता.
तेव्हा कृष्णाने इंद्राला एक उपाय सुचवला आणि इंद्र एका ब्राम्हणाच्या वेशात कर्णाजवळ पोचला. इतरांच्या प्रमाणेच तो रांगेत उभा राहिला. कर्ण सर्वांना काही न काही दान देत होता. पुढे जेव्हा इंद्राची पाळी आली तेव्हा कर्णाने विचारले - विप्रवर, आज्ञा करा. कोणत्या गोष्टीची अभिलाषा घेऊन आला आहात?
विप्र बनलेल्या इंद्राने म्हटले, महाराज! मी खूप दुरून आपली प्रसिद्धी ऐकून आलो आहे. असे म्हणतात की आपल्यासारखा दानी या अखंड धरतीवर दुसरा कोणीही नाही. तेव्हा मला आशा नाही तर विश्वास आहे की माझी इच्छित वस्तू तर मला तुम्ही नक्कीच द्याल. परंतु तरीही मनात कोणतीही शंका राहू नये यासाठी आधी तुम्ही संकल्प करा मगच मी तुमच्याकडे मागीन, अन्यथा तुम्ही म्हणाल तर मी रित्या हस्ते निघून जाईन.
तेव्हा ब्राम्हण वेशातील इंद्र म्हणाला, "नाही महाराज, मला तुमचे प्राण नकोत. मला केवळ इच्छित वस्तू मिळाली तर मला आत्मशांती लाभेल. तेव्हा आधी तुम्ही संकल्प करा मगच मी दान मागेन.
कर्णाने जल हातात घेऊन म्हटले, मी संकल्प करतो विप्रवर. आता त्वरित मागा. तेव्हा इंद्र म्हणाला, महाराज आपल्या शरीरावरील कवच आणि कुंडल मला दानाच्या स्वरुपात पाहिजे. काही क्षण सुन्न शांतता पसरली. कर्णाने एकदा इंद्राच्या डोळ्यांत रोखून पाहिले आणि मग दानशूर कर्णाने एकही क्षण न गमावता आपले कवच आणि कुंडल खन्जीराच्या मदतीने आपल्या शरीरापासून अलग केले आणि ब्राम्हणाच्या हवाली केले.
इंद्र कवच कुंडल घेऊन रथातून निघून गेला परंतु काही अंतर गेल्यावर इंद्राचा रथ खाली उतरून जमिनीत धसला. तेव्हा आकाशवाणी झाली, देवराज इंद्रा, तू घोर पाप केले आहेस. आपला पुत्र अर्जुन याचा प्राण वाचवण्यासाठी तू कपट करून कर्णाचे प्राण धोक्यात आणले आहेस. आता हा रथ इथेच अडकून पडेल आणि तू देखील इथेच अडकून पडशील.
तेव्हा इंद्राने आकाशवाणीला विचारले, यातून वाचण्याचा काय उपाय आहे? तेव्हा आकाशवाणी म्हणाली, तुला दान देण्यात आलेल्या वस्तूच्या बरोबरीची एखादी वस्तू तुला द्यावी लागेल. तेव्हा इंद्र पुन्हा कर्णाकडे गेला. परंतु या वेळी ब्राम्हणाच्या वेशात नाही. त्याला येताना पाहून कर्ण म्हणाला, देवराज, आदेश करा, आणखीन काय पाहिजे?
इंद्र म्हणाला, दानशूर कर्णा, आता मी याचक नाहीये तर तुला काही देण्यासाठी आलो आहे. कवच कुंडल सोडून माग तुला जे काही मागायचे असेल. कर्ण म्हणाला, देवराज, मी आजपर्यंत कोणाकडे काही मागितलेले नाही, आणि मला काहीही नको. कर्णाला दान देणे माहिती आहे, घेणे नाही.
तेव्हा इंद्र विनम्रतापूर्वक म्हणाला, महाराज कर्ण, तुला काहीतरी मागितलेच पाहिजे, अन्यथा मी आणि माझा रथ इथून जाऊ शकणार नाही. तू काही मागितलेस तर माझ्यावर फार उपकार होतील. तू जे काही मागशील ते देण्यास मी तयार आहे. कर्ण म्हणाला, देवराज, तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी काही मागू शकत नाही. मला फक्त दान देणे माहिती आहे, घेणे नाही. मी आयुष्यात कधीच कोणतेही दान घेतले नाही.
तेव्हा लाचार इंद्राने म्हटले, मी ही वाज्ररूपी शक्ती बदल्यात तुला देऊन जात आहे. तू ही ज्याच्यावर वापरशील, तो वाचू शकणार नाही. मग भले साक्षात काळावर का चालवेनास. परंतु याचा उपयोग तू केवळ एकदाच करू शकशील.
कर्ण यावर काही बोलण्या आधीच देवराज वज्रशक्ती तिथे ठेवून त्वरित निघून गेले. नंतर कर्णाला ती शक्ती नाईलाजाने स्वतःजवळ ठेवावी लागली. परंतु दुर्योधनाला जेव्हा समजले की कर्णाने आपली कवच कुंडले दान देऊन टाकली, तेव्हा दुर्योधनाला चक्करच आली. त्याला हस्तिनापूरचे राज्य हातातून निसटून जाताना दिसू लागले. परंतु जेव्हा त्याला समजले की त्याच्या बदल्यात वज्र शक्ती मिळाली आहे तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला.