हिंदू धर्मात सर्वांत पूजनीय वेदांमध्ये आणि ब्राम्हण ग्रंथांमध्ये यज्ञ / होम यांचा काय महिमा आहे, त्याची थोडीशी झलक या मंत्रांमधून पाहायला मिळते

अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्. होतारं रत्नधातमम् [ ऋग्वेद १/१/१/]
समिधाग्निं दुवस्यत घृतैः बोधयतातिथिं. आस्मिन् हव्या जुहोतन. [यजुर्वेद 3/1]
अग्निं दूतं पुरो दधे हव्यवाहमुप ब्रुवे. [यजुर्वेद 22/17]
सायंसायं गृहपतिर्नो अग्निः प्रातः प्रातः सौमनस्य दाता. [अथर्ववेद 19/7/3]
प्रातः प्रातः गृहपतिर्नो अग्निः सायं सायं सौमनस्य दाता. [अथर्ववेद 19/7/4]
तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन् पुरुषं जातमग्रतः [यजुर्वेद 31/9]
अस्मिन् यज्ञे स्वधया मदन्तोधि ब्रुवन्तु तेवन्त्वस्मान [यजुर्वेद 19/58]
यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म [शतपथ ब्राह्मण 1/7/1/5]
यज्ञो ही श्रेष्ठतमं कर्म [तैत्तिरीय 3/2/1/4]
यज्ञो अपि तस्यै जनतायै कल्पते, यत्रैवं विद्वान होता भवति [ऐतरेय ब्राह्मण १/२/१]       
यदैवतः स यज्ञो वा यज्याङ्गं वा.. [निरुक्त ७/४]

या मंत्रांचा मूळ अर्थ आणि प्रार्थना या लेखाच्या शेवटी दिल्या जातील ज्या वाचून कोणीही व्यक्ती स्वतः होम करून आपले आणि इतरांचे भले करू शकतो. परंतु या मंत्रांचा सारांश असा आहे की ईश्वर मनुष्याला आदेश करतो की होम / यज्ञ संसारातील सर्वोत्तम कार्य आहे, पवित्र कर्म आहे जे करण्याने सुखांची बरसात होते.
एवढेच नव्हे, भगवान श्रीरामाला रामायणात ठिकठिकाणी 'यज्ञ करणारा' म्हटलेले आहे. महाभारतात श्रीकृष्ण सर्व काही सोडून देऊ शकतो परंतु होम हवन नाही सोडू शकत. हस्तिनापुरात जाण्यासाठी आपल्या रथावरून निघाले, तर वाटेत संध्याकाळ झाली, तेव्हा रथ थांबवून हवन केले. पुढच्या दिवशी कौरवांच्या राजसभेत हुंकार भरण्यापूर्वी आपल्या कुटीत हवन केले. अभिमन्यूच्या बलिदानासारखी गंभीर घटना घडल्यानंतर देखील सर्वाना सोबत घेऊन आधी यज्ञ केला. श्रीकृष्णाच्या जीवनातील एक एक क्षण जणू येणाऱ्या युगाला हा संदेश देतो की काहीही झाले तरी यज्ञ करणे कधीही सोडू नका.
ज्या कर्माला स्वतः भगवंत सर्वश्रेष्ठ कर्म म्हणून करण्याचा आदेश दिला आहे, ते कर्म कर्म नव्हे तर धर्म आहे. ते न करणे हा अधर्म आहे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel