मागील काही महिन्या पासून आमच्या नास्तिक ग्रुप चा अभ्यास योगी, ध्यान इत्यादी विषयावर सुरु आहे. मला विशेष रस नसला तरी स्लेन्डरमन मर्डर्स ह्या विषयावर अभ्यास करणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी एक तिबेटियन लामाशी भेट झाली. तिबेटियन लामाने मला तुलपा विषयी माहिती दिली आणि तुलपा ह्याचा सीलेंडरमॅन शी काही संबंध असावा असे समजून मी तुलपा चा अभ्यास सुरु केला.

स्लेन्डरमन मर्डरस :

जास्त खोलांत जात नाही. अमेरिकेत विविध ठिकाणी आणि विविध काळांत पौंगडावस्थेतील मुली अचानक आपल्या मैत्रिणींचा खून करू लागतात. तापसांत ह्या मुली सांगतात कि हे खून त्यांनी एका व्यक्तीच्या प्रभावा खाली केले. सदर व्यक्तीच्या प्रेमात पडून त्या व्यक्तीचे प्रेम प्राप्त करण्यासाठी हे खून आवश्यक आहेत असे ह्या १२-१३ वर्षांच्या मुली सांगत असत. घटना वेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी त्या व्यक्तीचे वर्णन मात्र समान असे.

विकिपीडिया आर्टिकल नुसार किमान दोन सीलेंडरमॅन खून संदर्भ म्हणून उपलब्ध आहेत पण ज्या महिलेशी वार्तालाप झाला तिच्या मते ह्या साच्यातील अनेक खून विविध भागांत झाले असून बहुतेक वेळा पोलीस स्लेन्डरमन अँगल जाणून बुजून लपवतात कारण त्यामुळे लोकांत भीती पसरण्याची शक्यता असते.

एका केस मध्ये मुलीने चक्क आपल्या बापावर रेप चा आरोप टाकला होता. काही वर्षांनी चौकशीद्वारे स्पष्ट झाले कि बापाने असे काहीही केले नसून हि मुलगी स्लेन्डरमॅन च्या नादात अडकली होती.

स्लेन्डरमन एक प्रकारचा Schizophrenia असावा अशी मनोचिकित्सकांची धारणा आहे.

तुलपा :

हा एक तिबेटियन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो "घडवणे". संस्कृत शब्द आहे "निर्मिती". [१] जास्त माहिती साठी कृपया विकी आर्टिकल वाचा. हिंदू शास्त्रा नुसार एकूण ८ प्रकारच्या सिद्धी आहेत. पण ह्यांत निर्मिती चा समावेश होत नाही. निर्मिती कदाचित प्राकाम्य ह्या सिद्दीशी निगडित असावी.

तुलपा हा प्रकार अमेरिकेतील तरुण मुलांत प्रचंड लोकप्रिय झाला आणि Reditt ने त्याला विशेष प्रसिद्धी दिली. तुलपा चा आभास करणारे लोक स्वतःला "Tulpamancers" असे म्हणतात.

नक्की प्रकार काय आहे:

तुलपा मध्ये आपण ध्यान करून एक काल्पनिक व्यक्ती तयार करतो. काळाप्रमाणे ह्या काल्पनिक व्यक्तीला आपली एक अशी पर्सनॅलिटी मिळू लागते. काही काळाने ह्या काल्पनिक व्यक्तीला स्वतःची ओळख आणि विचार उपलब्ध होतात. त्यानंतर हि व्यक्ती आपल्याशी इतर माणसा प्रमाणे बोलू लागते. आपण तिच्याशी संवाद करू शकता.

पुढे पुढे ह्या व्यक्तीची एकूण ओळख इतकी वाढते कि आपण आपल्या शरीराचा ताबा ह्या काल्पनिक व्यक्तीला देऊ शकता.

तुलपा हा प्रकार अलेक्सान्द्र नील ह्या महिलेने पाश्चात्य जगा पुढे आणला. ह्या महिलेचा आणि माझा फार जुना संबंध आहे.

माझ्या प्रथम निरीक्षणा प्रमाणे हि सगळी Schizophrenia ची लक्षणे आहेत. A Beautiful Mind हा चित्रपट पहिला असेल तर मी नक्की काय म्हणतेय हे आपण समजू शकता. Schizophrenia एक फार गंभीर मनोविकार असून ध्यान किंवा इतर कुठल्याही मार्गाने हा विकार आपण स्वतःहून ओढवून घेऊ शकत नाही. ड्रग्स इत्यादी वापरून आपण भ्रम निर्माण करू शकता पण हा विकार त्यामुळे होत नाही.

माझे अनुभव :

एका भारतीय योगीने बऱ्याच प्रयत्नान्ती मला ह्या मार्गावर चालायला मदत करण्यास होकार दिला. सदर योगी एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस आपल्या फावल्या वेळांत योगाभ्यास करतो. मागील किमान ५० वर्षां पासून ह्यांचा अनुभव योग क्षेत्रांत असल्याने मी बहुतेक वेळा ह्यांचा सल्ला घेते. सल्ले वगैरे देण्यास त्यांना अत्यंत संकोच वाटतो पण वडिलांची ओळख असल्याने मी विना संकोच चिवटपणा दाखवते.

त्यांच्या मते तुलपा हि अतिशय निकृष्ट दर्जाची सिद्धी आहे. इतकी निकृष्ट कि कुठलाही खरा योगी ह्याच्या कडे सिद्धी ह्या दृष्टिकोनातून पाहणार सुद्धा नाही.

आपली ओळख "मी" म्हणजे आपले "मन" नाही. अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा "मन" म्हणजे मेंदूतील चेमिकल लोचा आहे. मेंदूला इजा झालेल्या लोकांचा स्वभाव आणि मन पूर्णपणे बदलून जाते ह्यातून "मन" हा एक "शारीरिक" भाग आहे असे आपण म्हणून शकतो. [२]

पण मन सोडून "मी" हे अस्तित्व आहे हे विज्ञानाला मान्य नाही. योग अभ्यासांत आपण मन शरीर आणि आत्मा ह्या तिन्ही घटकांचा शोध घेतो. शारीरक अनुभव हे सर्वांत खालच्या पातळीचे अनुभव मानले जातात पण हे अनुभव घेणे सर्वांत सोपे असतात. त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्तीला हे अनुभव एकाच प्रकारे मिळू शकतात. आमचिये सर्वांची शारीरिक ठेवणं जवळ पास एकाच प्रकारची असल्याने आधुनिक साधने वापरून आम्ही योगाभ्यासाचे शारीरिक बदल सहज सिद्ध करू शकतो.

मानसिक अनुभव हे थोड्या वरील पातळीचे असतात. "मन" शरीरा प्रमाणे प्रेडिक्टॅबल नसल्याने ह्याचे अनुभव सुद्धा प्रेडिक्टॅबल नसतात. त्यामुळे एकच प्रकारचा ध्यानाभ्यास करणाऱ्या माणसाला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. तुलपा हा मानसिक स्तरावरील अनुभव आहे.

आत्मिक अनुभव ह्या विषयावर माझे ज्ञान शून्य असल्याने आणि माझ्या मनात फार शंका असल्याने मी त्यावर बोलायला जात नाही.

मी एकूण ९ दिवस अभ्यास केला. अनुभवाने मला घाबरवून सोडल्याने त्या दिशेने आणखीन प्रवास करण्याचा प्रयत्न तूर्तास तरी मी करणार नाही.

अभ्यासक्रम :


दिवस १ ते ३:
डोळे बंद करून बसावे. ध्यानमग्न होऊन आपल्या कल्पना शक्तीने एक काल्पनिक जागा निर्माण करावी. एक छोटीशी खोली पासून प्रचंड मोठे पॅरलल युनिव्हर्स पासून आपलय कुवती प्रमाणे आपण काहीही कल्पना करू शकता. पाहिजे असेल तर आपण लेगो प्रमाणे विटा मनात घेऊन त्यापासून एक छोटी खोली बनवू शकता.

इथे सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे डिटेल. प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने बनवली गेली पाहिजे आणि तुम्हाला आपल्या मेमरी मधून त्या जागेचा कुठलाही भाग अगदी स्पष्ट पाने ओळखता आला पाहिजे. माझ्या जागेंत मी एक चाळीतील खोलीची कल्पना केली होती. हि खोली एका वाळवंटातील ४०० माजली इमारतीतील ३०० व्या मजल्यावर होती. वर चढायला एक गंजलेला जिना होता (fire escape) आणि एक जुनाट लिफ्ट. फ्लॅट नंबर होता ३११. फ्लॅटचे दार निळे पत्र्याचे.
भिंतींचे रंग पिवळे होते पण तो रंग उडून सिमेंट दिसायालाल लागले होते.

आंत १००चा एक दिवा एक जुनाट टीव्ही. एक जुनाट सोफा. एक छोटा बाथरूम इत्यादी. एक खिडकी ज्यातून बाहेरील वाळवंट दिसत होते आणि उघडली तर प्रचंड गरम हवा आंत येत असे.

अनेक तास लागून मी अक्षरशः ह्या खोलीत राहिले. सोफ्यावर कपड्यांचा ढीग, टीव्हीच्या रिमोटवर झिजलेली बटणे. शेजारच्या खोलीतून येणाऱ्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज. इत्यादी इत्यादी गोष्टीत अत्यंत बारकाईने मी डिसाईन केल्या होत्या.

दिवस ४ - ६:

ह्या तीन दिवसांत काल्पनिक व्यक्ती निर्माण करण्याचे काम हाती होते. वेगळ्या लिंगाची व्यक्ती निर्माण करणे सोपे होते म्हणून मी एका पुरुषाची निवड केली. पहिल्या दिवस मी प्रयत्न करून सुमारे १५-१६ वर्षांच्या लहान मुलाला डिसाईन केले. चेहरा, कपडे, डोळे, इत्यादी सर्व काही मी कल्पना केली होती. बहुतेक वेळा आपल्या जीवनातील एक कमी महत्वाचा भाग घेऊन त्याला तो दिला तर प्रगती जास्त चांगली होते. तर ह्या मुलाला मी धार्मिक प्रवृत्तीचा बनवले.

ह्या काल्पनिक व्यक्तीला नाव देणे आवश्यक असते. त्याला मी नाव दिले अभय. अभय ला बोलून अनेक गोष्टी सांगाव्या लागली. गुरूच्या मते हे एखाद्या रोबोट ला सुपरवाइस्ज्ड लर्निंग द्वारे ट्रेन करतात त्याच प्रकारचे होते.

अभय ला मी सोफ्यावरील कपड्यांची घडी घालून ठेवण्याची विनंती करून मी ती खोली बंद करून जिना उतरायला सुरवात केली आणि ध्यानातुन बाहेर आले.

सहाव्या दिवशी ध्यान मग्न होताना गुरूंनी सांगितले कि जर प्रयोग सफल झाला असेल तर माझ्या कुठलाही हस्तक्षेपाशिवाय त्या खोलीतील वस्तूंत बदल घडलेला असेल. कदाचित अभय ने कपड्यांची घडी सुद्धा करून ठेवली असेल.

मी ध्यानात गेले तेंव्हा ह्या प्रकारचे काहीही घडले नव्हते. आन खोलीत अभय सोफ्यावर ना बसता खुर्चीवर बसला होता आणि सोफ्यावरील कपडे, टीव्ही रिमोट, खिडकी इत्यादी गोष्टी मी जश्या ठेवून दिल्या होत्या तश्याच होत्या. मी खोलीतून बाहेर जाताना अभय उभा होता आणि आता तो खुर्चीवर बसला होता.

मी अभय शी बोलण्याचा प्रयन्त केला तर त्याचा चेहरा १००% निर्विकार होता. मी काय बोलतेय हे त्याला कदाचित समजत नसावे. पण एका लेव्हल वर अभय हे माझे क्रिएशन नसून वेगळे काही तरी असावे से मला हळू हळू वाटायला लागले होते. मी खूप काही बोलले तरी अभयवर त्याचा परिणाम झाला नव्हता. मी खोलीत पुन्हा फिरून सर्व गोष्टी जाग्यावर आहेत ह्याची खात्री केली. एक ग्लास शेल्फ वरून काढून त्यात पाणी भरून मी तो अभय पुढे ठेवला. त्याला पाणी पिण्याचा आग्रह केला. पण तो काही हलला नाही.

अजून पर्यंत अगम्य असे काही घडले नव्हते तरी निव्वळ दिवा स्वप्नांच्या द्वारे मी एक छोटेसे का असेना पण काल्पनिकजग निर्माण करू शकत होते हीच एक आश्चर्याची गोष्ट होती. ६ दिवसांत माझ्या कल्पनाशक्तीने बरीच मोठी झेप घेतली होती.

दिवस ७-८ :

दोन्ही दिवस ६ व्या दिवसा प्रमाणेच वाटले. ग्लासमधील पाणी कमी झाले नव्हते. काहीही वस्तू हल्ल्या नव्हत्या. अभय सुद्धा हलला नव्हता. टीव्ही बंद होता आणि खिडकीतून बाहेरील गरम हवा येत होती. ७व्या दिवशी मी ६व्य दिवस प्रमाणेच अभयशी बोलले. म्हणजे रम मध्ये काय काय आहे, तो कपड्यांची घडी कशी करू शकतो. आणखीन पाणी पाहिजे तर कसे घेऊ शकतो इत्यादी गोष्टी मी त्याला सांगितल्या. थोडे रिवर्स सायकोलोजि म्हणून खोली बाहेर पडू नको नको इत्यादी बंधने सुद्धा घातली.

८व्या दिवशी मात्र मला संपूर्ण प्रकारचा थोडा कंटाळा आला. अजून पर्यंत सर्व काही एखाद्या मनोचिकित्सास्कच्या खोलीत व्हावे असेच सर्व काही घडले होती. ८व्य दिवशी मी ठरवले कि अभय कडून काहीही अपेक्षा ठेवायची नाही. मी जाऊन टीव्ही लावला, स्वतःच कपड्यांची घडी लावली आणि लावता लावता मी माझा दिवस आज कसा गेला, माझी गाडी कशी जुनाट झाली आहे, इत्यादी इत्यादी पूर्णपणे वेगळ्या अश्या पर्सनल गोष्टी केल्या.

दिवस ९:

ध्यानमग्न होताना मी खोलीत आत गेले. अपेक्षे प्रमाणे अभय खुर्ची मध्येच होता. मला थोडी चीड आली. मी सोफ्यावर ठेवलेले कपडे उगाच जमिनीवर फेकून दिले आणि अभय समोरील ग्लास उचलून मी मोरीत नेवून ठेवला स्वतःसाठी दुसरा ग्लास कडून ओट्यावर ठेवला आणि जग शेल्फ वरून काढून मी परत फिरले आणि दचकळेच. अभयने ओट्यावरील ग्लास उचलून तो त्यांत मोरीतील नळाने पाणी भरत होता.

इतके दिवस मी स्वतःला त्याचा जनक समजत होते पण अभय आता स्वतःहून काम करत होता. त्याच्या चेहेऱ्यावर भाव विशेष दिसत नसले तरी तो थोडक्यांत पुटपुटत होता असे त्याच्या ओठावरून वाटत होते.

मी त्याला ओब्सर्व करत असताना अचानक तो माझ्या बाजून वळला. त्येच ओठ हलत नसले तरी त्याचा आवाज माझ्या डोक्यांत मला ऐकू आला. मी कपडे खाली फेकून दिले म्हणून तो चिडला होता. तो चालत गेला आणि त्याने कपडे उचलून सोफ्यावर ठेवले. काहींची घडी विस्कटली होती ती त्याने पुन्हा घातली.

मी अवाक होऊन पाहत होते. त्याने पुढे बरेच काही संभाषण केले पण ते एका आपातळीवर असंबंध वाटत होते त्याच वेळी तो मला "मॉक" करतोय असाही भास होता.

मी फोन वाजल्याचे निमित्त करून खोलीतून बाहेर गेले दरवाजा बंद केला आणि ध्यानातून बाहेर आले.

एकूणच अनुभव फार भीतीदायक होता. गुरुदेवांच्या मते माझ्या मनाच्या खोलीत अभय आणि त्याचे जग मी मरे पर्यंत राहील. कदाचित मी झोपेत वगैरे असताना माझ्या सुप्त मनाचा वापर करून अभय त्या खोलीतून हालचाल सुद्धा करेल. पण अभयच्या वाढीसाठी माझे अटेन्शन महत्वाचे असून जो पर्यंत मी त्याला ते देत नाही तो पर्यंत त्याच्यापासून मला कसलाही धोका किंवा फायदा नाही.

गुरुदेवांनी आधीच सिद्धी म्हणजे एक side-इफेक्ट असून अभुतेक योगी त्यांच्या कडे थोड्या "विकृती" ह्याच दृष्टीने पाहतात असे सांगितले होते. आता मला ते पटले सुद्धा.

[१] https://en.wikipedia.org/wiki/Tulpa
[२] https://en.wikipedia.org/wiki/Phineas_Gage
[3] https://www.reddit.com/r/Tulpas/
[4] http://philosophycourse.info/lecsite/lec-tulpas.html
[5] https://www.youtube.com/watch?v=z3j5gtUCkJg [तुलपाशी संवांद]


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel