यांशिवाय यज्ञासाठी केलेल्या प्रार्थना आणि मंत्र या वेदात आढळतात. दोन आप्रीसूक्ते या दृष्टीने लक्षणीय आहेत . यजुर्वेदातील मंत्रांशी मिळते-जुळते असे गद्यमंत्र १६ व्या कांडात दिसतात. एक ऋचा तर काही विवक्षित यज्ञसाधनांना उद्देशून रचिलेली दिसते. हवी अर्पण करताना म्हणावयाची विविध सूक्ते आहे.
विसाव्या कांडात सोमयागविषयक सूक्ते पहावयास मिळतात. या कांडातील बहुतेक सूक्ते ऋग्वेदातून घेतलेली असली, तरी त्यांतील कुंतापसूक्ते हा सूक्तांचा एक नवाच प्रकार लक्ष वेधून घेतो. या सूक्तांपैकी काहींतून कूटप्रश्न आणि त्यांची उत्तरे येतात . काहींत थोडी ग्राम्यताही आढळते). दानस्तुती हा काही कुंतापसूक्तांचा विषय आहे.
काही विवक्षित विषयांचा विशेष परामर्श घेणारी सूक्तेही उल्लेखनीय आहेत. उदा., रोहित या देवाला उद्देशून लिहिलेली चार दीर्घ सूक्ते कांड १३ वे, विवाहसूक्ते कांड १४ वे, व्रात्यविषयक सूक्ते कांड १५ वे, अभिषेकमंत्र व दु:स्वप्ननाशनमंत्र कांड १६ वे, एका संपूर्ण कांडाच्या स्वरूपात असलेले एक दीर्घ आयुष्यसूक्त कांड १७ वे आणि अंत्यविधीचे मंत्र कांड १८ वे इत्यादी कांडात वाच्वाय्स मिळतात रोहित ही देवता सूर्यदेवतेचेच एक रूप असून तिच्या सामर्थ्याचे वर्णन विस्ताराने केले आहे.
विवाहसूक्ते ऋग्वेदातील सूर्यसूक्तांशी मिळती-जुळती आहेत. ब्रह्माचे एक रूप आणि एक भटकी जमात या दोन्ही अर्थांनी ‘व्रात्य’ हा शब्द येथे आलेला दिसतो. या जमातीतील लोक ब्राह्मणधर्मीय नव्हते; परंतु त्यांना व्रात्यस्तोम ह्या विधीने त्या धर्मात येता येई, असे व्रात्यकांडावरून अनुमान होते. अभिषेकमंत्रांत उदकमाहात्म्य वर्णिले आहे. एका आयुष्यसूक्ताला संपूर्ण कांडाचा १७ वे कांड म्हणून दर्जा का मिळावा, हे समजत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.