माझा पूर्ण परिवार दोन दिवसांपूर्वीच गावी जत्रेसाठी गेला होता. त्यामुळे मला सोबत म्हणून विशाल माझ्या घरी गेल्या दोन दिवसांपासून झोपायला येत होता. आजही तो आला होता. घरी कोणी ओरडायला नसल्यामुळे, रात्रीचं जेवण आवरल्यावर मी आणि विशाल हायवेजवळ असलेल्या टपरीवर सिगरेटसोबतंच गरमागरम वाफाळलेल्या चहाचा घोट घेण्यासाठी माझ्या बाईकवरून निघालो. आमच्या घरापासून हायवे साधारण सहा किलोमीटर लांब. खरंतर चहा वगैरे बहाणाच.. हा थंडीचा मोसम.. त्यामुळे बाईकवरून असं रात्रीचं सुसाट जाण्याची मज्जाच काही वेगळी असते.. बाईकच्या वाढणा-या स्पीडसोबतंच सुईरारखी बोचणारी थंडी अंगावर मस्तीचे शहारे आणण्यासाठी पुरेसे असतात..!! त्यात विशालसारखा अतरंगी मित्र सोबत, मग काय धम्मालंच की...!!!
बाईक डांब-या रस्त्यांवरून सुसाट चालली होती.. रात्र असल्यामुळे रस्त्यांवर दिवसा असते तशी गाड्यांची वर्दळ नव्हती.. त्यामुळे बेशूट गाडी पळवण्याचा मला परवानाच मिळाला होता.. पण, ते कोण्या शहाण्याने म्हंटलंच आहे ना की, "जोश में होंश मत खो ना.." अहो आमचंही तसंच काहीतरी झालं तेव्हा. म्हणजे, सुसाट गाडी पळवण्याच्या जोशमध्ये आम्ही चहाच्या टपरीपासून एक दिड किलोमीटर थोडं जास्तंच पुढे आलो. मग गाडी तशीच कडेकडेनी "राँग वे" ने टाकत टपरीजवळ आणली. बाईक तिथेच आडोश्याला लावली आणि तडक हात सिगरेटच्या पॅकेटावर टाकले.. विशालच्या हाताचा पंजा आदीमानवासारखा फताडा असल्यामुळे ती खजिन्याची पेटी पहिली त्याच्याच हाताला लागली. शहाण्याने स्वतःसाठी एक सिगरेट काढली आणि पॅकेट माझ्याकडे वळवलं. मी ही एक सिगरेट काढून पॅकेट सरळ आत टपरीत भिरकावून दिलं.. टपरी पत्र्याच्या भिंतीने झाकली असल्यामुळे ते नाजूकसं पॅकेटसुद्धा पत्र्यावर आपटाचक्षणी विजेच्या कडकडांसारखा जोरदार आवाज झाला. मग त्यावर टपरीतल्या काका काकूंनी कवट्यामहाकाल सारखा खतरनाक लूक मला दिला. मीसुद्धा बघून नं बघितल्यागत केलं आणि गप्पं विशालजवळ जावून उभा राहिलो. तोपर्यंत काकूंनी चहाचा टोप गॅसवर चढवला.. थोड्याच वेळात चहाचा कडक सुगंध आमच्या नाकपुड्यांत घुसायला लागला.. सिगरेटसुद्धा संपल्यातंच जमा होती. म्हणून, शेवटचा श्वास घेत असलेल्या सिगरेटची धडपड मी एका दममध्येच थांबवून टाकली आणि मग तिचं उरलेलं अवशेष पायाखाली चिरडत पायानीच मातीत गाडून टाकलं..!! थंडी असल्यामुळे साहजिकंच लघवीलासुद्धा अधूनमधून जावं लागत होतं. काकू कळकटलेल्या पेल्यामध्ये वाफाळलेला चहा ओतायच्या आधीच मी तिथून थोडं पुढे रस्त्याच्या कडेला, वृक्षदिनाच्या निमित्ताने लावलेल्या रोपांचा आडोसा घेत हलका होवू लागलो. आजूबाजूला नजर टाकली तर नुसता काळोखंच काळोख.. आता विशालचा काळा चेहरा बघण्याची सवय झाली असल्यामुळे ह्या काळोखाची फारशी भिती वाटली नाही म्हणा. पण तरीही मी घाबरलो नाही हे माझं मलाच पटण्यासाठी गाणी गुनगुनू लागलो. आता माझ्या गाण्याचा प्रभाव म्हणा किंवा माझ्या सुरेल आवाजाचा प्रभाव म्हणा हवं तर..पण, ते ऐकून अचानक चक्क एक म्हातारी बाई माझ्यासमोर हाकेच्या अंतरावर प्रगट झाली. तिला बघून पटापट आवरतं घेत पटकन पँटची झीप लावली आणि गांगरलेली नजर तिच्याकडे टाकत एक जबरदस्तीची स्माईलंही दिली.. अबबबं..पहातोय तर काय, तर ती म्हातारीही शेवटचा उरलेला दात दाखवत ओठ पसरून चक्कं हसली.. च्याआयला, ऐवढा खर्च करून पण एक मुलगी पटत नाही ईथे आणि आता नं पटवताच ही म्हातारी फुकटची लाईन देतेय राव.. ह्यावर हसू की रडू हे समजत नव्हतं आणि तिला विचारण्याचं धाडस काय माझ्यात तरी नव्हतं बुवा.. त्यात तिथून विशाल "महिन्याभराचा कोटा आजंच पूर्ण करतोयस का.?? साल्या, चहा थंडं होतोय लवकर ये" हे घसा ताणून बोंबलत होता. आता त्याला काय सांगू ह्या म्हातारीला बघून मी कसा थंडं पडलोय ते..!! मला तर वाटतंय ही म्हातारी वेडी असणार.. बघा ना केव्हापासून नुसती वेड्यागत हसतेय. बापरे, कदाचित माझ्या मनातलं तिनं ऐकलं.. कारण, हसणं थांबवून ती आता माझ्या दिशेने एक हात मोडकळीस पडलेल्या गुडघ्याच्या वाटीवर ठेवून दुसरा पाय बहुतेक वाटी नसल्यामुळे फरफटत आणत होती. तिला बघून खरंतर मला जोरात किंकाळी फोडायची होती.. पण, का कोणास ठाऊक अशावेळी घशातून आवाज का निघत नाही..?? की, आवाजाचीही टरकते अश्यावेळी बाहेर पडायला..!! जे काय असेना ती म्हातारी आता बघता-बघता माझ्या पुढ्यातंच येवून उभी राहिली. माझ्या भेदरलेल्या डोळ्यांत डोळे घालून ती तिचा एक उरलेला दात दाखवत कसल्याश्यातरी नजरेने बघायला लागली. थोड्या वेळासाठी मला वाटलं, आता ही जादूची झप्पी देतेय की काय..!! पण, नशीब..तिने तसं काही केलं नाही.. कदाचित "मुन्नाभाई एम.बी.बी.एस." बघितला नसेल तिने..!!
अंगावर लालभडक नववारी साडी, हातात हिरव्या पिवळ्या बांगड्या, थकलेला पण तश्यातंही उठून दिसणारा चाबरट चेहरा, पाठीत वाकलेला कणा, डाव्या हाताने छातीशी धरून ठेवलेलं एक छोटसं गाठोडं आणि एका बाजूने चिमटलेलं डोकं.. ह्यापलीकडे आजीबाईंचं वर्णन करण्यासारखं काही नव्हतंच. हाताची बोटं तर चाकूसारखी दिसत होती. त्यामुळेच बहुतेक तिच्या हाताला चित्रविचित्रं जखमा झाल्या होत्या..!! ती तिची चाकूसारखी दिसणारी बोटं हळूहळू माझ्या चेह-यावरून फिरवू लागली..ओठांतल्या ओठांत काहीतरी पुटपुटायला लागली. आईशप्पथ सांगतो, मला तर तात्या विंचूच डोळ्यांपुढे दिसू लागला.. ओम फट स्वाहा..हा.! पण दुदैवं बघा.. ईथे लक्ष्याला वाचवायला ईनस्पेक्टर महेश जाधव जवळ नव्हता.. तो तर लक्ष्याच्या म्हणजे माझ्या वाटणीच्या चहाचा घोट मारण्यात दंग होता.. व्वा रे तेरी दोस्ती..!!
ती आजीबाई तर आता फुल फाॅर्ममध्येच आली होती की. तिने तोंडाचा जबडा अजगरासारखा उघडला.. आतून सापागत टोकाला विभागलेली जीभ भसकन बाहेर काढली. हो पण, भसकन काढण्याच्या नादात तिचा शेवटचा दातंही उखडून जमिनीवर टपकन पडला..!! आता काय.. हि बया तर आणखीनंच भयानक दिसायला लागली.. जीभ तर काय, ईथून तिथून नुसती थयथय नाचत होती.. डोळे तर वाटत होते की, आता कोणत्याही क्षणाला माझ्या थरथरत्या हाताच्या ओंजळीत येवून पडतील. काही वेळापूर्वी ओढलेल्या सिगरेटचा धूर आता ध्यानीमनी नसताना नको तिथून बाहेर पडत होता.. नुसता धूरंच धूररर.. धुराच्या वासाने म्हातारी आणखीनंच चेताळली. उभ्या जागेवरंच गरागरा फिरू लागली. डोळ्यांच्या बाहुल्या बेताल नाचवू लागली. मग, डोक्याला झटका देत केसांचा विरळ झालेला बुचडा झपकन चेह-यावर सोडला. त्या केसांच्याआड दिसणारा तिचा चाबरट चेहरा बघून मला भुलभुलय्यामधली मोंजोलीका आठवली नसती तर नवलंच..!! तेव्हा मग अक्षय कुमारला स्मरून होती नव्हती तेवढी सर्व हिंम्मत एकटवून तिला घाबरतंच विचारलं,
- "ओ आजी, बस करा की. पोराचा जीव घेताय का आता.? किती नखरे कराल ह्या वयात. घाबरलं की पोरगं..!!"
पण, आजी काय हू नाय की चू नाय. थोड्या वेळासाठी वाटलं की ही वेडीच नाही तर बहिरी आणि मुकी पण आहे. म्हणून म्हंटलं बघू साईड लँग्वेजमध्ये बोलून काय होतय काय. पण कसलं काय.. म्हातारी तर भलतीच शहाणी निघाली की राव. साणकन कानशीलात लावली माझ्या..
- ये भाड्या, तुला काय तसली बया वाटली व्हय रं.. नसत्या
खाणाखुना कशाला करतंय..??
देऽऽऽवा.. हेच बाकी राहिलं होतं आयुष्यात बघायचं तेवढं. रात्री अपरात्री एका म्हातारीच्या हातून असा मार खावा लागण्यासारखं मोठं दु:खं काय असावं बरं. तरी बरं, कोणी बघितलं नव्हतं हानताना. नाहीतर लाज गेली असती चार चौघांत.. म्हातारीने सनकवलेला गाल तसाच चोळत विशालच्या वाटेवर नजर लावून बघत असताना म्हातारी पटकन पचकली,
- म्या तुझ्याकडं मदत मागाया आलीया.. माझं घर ईथून लय लांब त्या तिथं वडेगावास्नी.. मला माझ्या घरी जायचंया..पर पदराशी एक दमडी पण नाय रं पोरा.. मला पैकं दे, लय ऊपकार व्हतील पोरा..
म्हातारी फारंच अगतीक होवून बोलली राव. मला काय रहावलं नाही. तसा लहानपणापासूनंच मी खुप हळवा. त्यामुळे हिला मदत करावी असं मनापासून वाटलं. खिश्यात चार-पाचशे रूपये होते ते सर्व तिला देण्यासाठी हात खिशात टाकला. म्हातारीला पैसे द्यायला मी हात पुढे केला खरा पण, तेवढ्यात विशालची हाक ऐकू आली. त्यासरशी मी दचकून हात तसाच आवरता घेतला. विशाल पाच-सहा पावलं दूर अंतरावरून बोंबलला,
- अरे ये येड्या.. एकटा काय बडबडतोयस.? आणि पैशे कोणाला देतोयस.?? सिगरेट चढली की काय तुला.?
विशाल असा काय बोलतोय हे मला समजत नव्हतं. साक्षात माझ्या पुढ्यात उभी असलेली म्हातारी ह्याला दिसली नाही काय..?? येडा कुठचा.. ऐवढे भदाडे टपोरे डोळे देवाने देवूनंही साला ह्याची बत्ती गुलंच. अरेरेरेरे.. काय दुदैवं म्हणावं ह्याला. बघा आजीबाई कसा येडछाप मित्रं आहे माझा. बघा जरा..बघा. असं बोलून मी म्हातारीच्या दिशेने वळलो. पण, कसलं काय.. बघायला म्हातारी तिथे होतीच कुठे.! ती तर केव्हाच मिस्टर इंडियावाणी गायब झाली होती माझ्या पैश्यांसकट. मग, रिकामा हात डोळ्यासमोर धरत मी पार रडकुंडीला येवून बोललो,
- विशाल भावाऽऽ, त्या म्हातारीने तर मला पार लुटला यार.. बघ, कसं ठणठण गोपाळ करून टाकलं मला.
- अबे, कोणत्या म्हातारीबद्दल बोलतोयस.? विशाल चेह-यावर आट्या पाडत बोलला.
- अरे तीच म्हातारी जिच्याशी मी आता बोलत होतो.
- ये बाबा, येडाबिडा झालास काय. केव्हापासून तुला एकट्यानेच बडबडताना बघतोय. कसली म्हातारी नी कसलं काय.! चल निघूया आता.
विशाल डोक्याला टपली मारत बडबडला. थोड्या वेळासाठी मी सुन्नं. सुचतंच नव्हतं काय. ती म्हातारी भूत बित तर नव्हती ना.? डोक्यात खुप सारे प्रश्न आणि मनात टरकवणारी भिती. खुपंच डेडली काँबिनेशन.! तेव्हा खांद्यावर विशालची थाप पडली. मागे रस्त्याच्या दिशेने बोट दाखवत,
- सत्या, तुला दिसलेली म्हातारी, तीच का.?
मी पटकन मान रस्त्यावर वळवली. तर बघतोय काय, तर हि तीच म्हातारी..!! च्याआयला, पण ही ईथे आलीच कशी..?? आणि रस्त्याच्या मधोमध उभी राहून नक्की करतेय तरी काय..?? मी मनातल्या मनात माझ्यापरीने अंदाज बांधायला लागलो. पण, तेवढ्यात विशाल जोरात बोंबलला. ओऽऽ आजीऽऽ.. व्हा की साईडला. जीव जास्तं झालाय काय तुम्हाला..?? जायचा ना एखादा गाडीवाला वर घेवून.. काय आश्चर्य बघा.. विशालची काळी जबानची जादू चालली आणि त्याचं बोंबलनं संपायच्या आतंच आमच्या डोळ्यांदेखत एक भरधाव ट्रक म्हातारीला चिरडत निघून गेला.! जाता जाता त्या ट्रकने काका-काकूंच्या टपरीलासुद्धा जोरदार धडक दिली. त्या धडकेचा आवाज मला धडकी भरण्यासाठी पुरेसा होता. मग स्वतःला कसंबसं सावरत विशाल आधी म्हातारीजवळ धावला..आणि मी भितीने घश्यात अडकलेला आवाज बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तसाच उभा राहिलो. विशाल म्हातारीजवळ पोहोचला खरा. पण, म्हातारीने परत एकदा चकमा दिला ना राव. ना तिथे म्हातारी होती ना तिच्या रक्ताच्या खुणा..!! आता टरकायची वेळ विशालची होती. ऐवढा जनावरासारखा दिसणा-या माझ्या सालस मित्राची बोबडीच वळली की भितीने. मग तसाच किंचाळत तो धावत माझ्याजवळ आला. त्याच्या किंचाळण्याच्या आवाजाने केव्हाचा घश्यात अडकलेला माझा आवाजही बाहेर पडला. मग आमचा मोर्चा तडक काका-काकूंकडे वळला. वायुवेगाने आम्ही अपघातग्रस्त टपरीजवळ धावलो. पण.... आता तर हद्दच झाली होती. ईथे ट्रकने फूटबाॅलसारखी उडवलेली टपरीसुद्धा जागेवर नव्हती. काका-काकूही दिसत नव्हते कुठेच. हे नक्की काय चाललंय काहीच कळत नव्हतं. त्या ट्रकने टपरीचा चुराडा करताना आम्ही दोघांनीही नीट पाहिलं होतं. मग टपरी गुडुप कशी काय झाली..?? देऽऽऽवा..तुच वाचव आम्हाला आता. ही भूताटकीच आहे विशाल. चल पटकन कलटी मारू ईथून. मी वाढलेल्या हृदयाच्या ठोक्याला आवर घालत बोललो. तसे आम्ही दोघेही बाईकच्या दिशेने पळालो. धापा टाकतंच आम्ही बाईकजवळ पोहोचलो. चावी काढण्यासाठी खिशात हात खुपसला. पण, चावी खिशात नव्हतीच. कदाचित पळण्याच्या गडबडीमध्ये चावी टपरीजवळंच कुठेतरी पडली असणार. त्यामुळे मी ती घेण्यासाठी परत माघारी फिरलो. विशालंही माझ्यासोबत आला. हो पण मला मदत करायला नाही तर टरकल्यामुळे त्याला एकट्याला उभं रहावत नव्हतं म्हणून.! तसं तो सोबत आला ते बरंच होतं म्हणा. कारण मला एकट्याला तरी चावी आणायची कुठे हिंम्मत झाली असती.! मी मोबाईलचा टाॅर्च ऑन करून चावी शोधायला लागलो. खुप अंधार असल्यामुळे चावी भेटेल की नाही हा मोठा प्रश्नच होता आमच्या पुढ्यात. तेव्हा " हि घे तुझी चावी पोरा.." -काहिसा घोगरा वाटणारा ओळखीचा आवाज मागच्या बाजूनी अचानक कानावर येवून धडकला. मी मागे वळलो. पहातोय तर काय. हातात चावी घेवून तीच म्हातारी उभी होती.! हो तिच म्हातारी.! जिला थोड्यावेळापूर्वीच ट्रकने चिरडलं होतं. माझ्या तर डोक्याचा पार भुगा झाला होता. नको तसले विचार डोक्यात थैमान घातल्यानंतरच्या दुस-याच मिनिटाला मी बेशुद्धं पडलो. सकाळी जाग आली ती तोंडावर पडलेल्या गरमागरम पाण्याच्या धारेने. तोंडावरून ओघळणारं पाणी पुसण्यासाठी तळहात तोंडाजवळ धरले. पण, घपकन एक उग्र वास नाकाची भगदाडे पार करत पार आतपर्यंत घुसला. हे नक्की कोणाचं काम हे बघण्यासाठी नजर वळवली. तेव्हा बाजूलाच एक हडकुळं कुत्रं जेमतेम शाबूत असलेली शेपूट मोरावाणी डोलवत उभा होता.! जे काय समजायचं होतं ते समजून घेत मी मग तिथेच पडलेला एक दगड उचलला आणि त्याच्या दिशेने दानकन भिरकावून दिला. साला पण माझ्या नेमचा काही नेमंच नाही ना राव. बघा ना, कुत्र्याला मारलेला दगड त्याला नं लागता तिथेच पुढे आडवा पडलेल्या विशालच्या पेकाट्यावर जावून लागला.! त्यामुळे कुत्र्याच्या क्याॅवऽऽ क्याॅवच्या ऐवजी विशालच्या शिव्या ऐकू येवू लागल्या. चला, म्हणजे अख्खी रात्रं खराब गेली पण सकाळची सुरूवात मात्रं कुत्र्याच्या मुताने आणि विशालच्या शिव्याने चांगली झाली होती.!
कपड्यांना चिकटलेली माती झाडत मी आणि विशाल ढांग टाकून सरळ बाईकवर जावून बसलो. ज्या स्पीडने आम्ही काल रात्री इथे आलो होतो त्याच स्पीडने आज इथून निघूनंही गेलो. आधी विशालला त्याच्या घरी सोडलं आणि मग मी माझ्या घरी आलो. तोपर्यंत डोकं पार भनभनून गेलं होतं. रात्रं रस्त्यावरंच काढल्यामुळे अंगसुद्धा जड झालं होतं. त्यामुळे आल्याबरोबर स्वतःला बेडवर झोकून दिलं. डोळे गच्चं मिटले. पण, तरीही झोप काही लागत नव्हती. मग अचानक टिमटती लाईट भक्कन पेटावी तसं माझ्या डोक्यात काहीतरी झालं त्यावेळेस. काही तरी अंधूक असं मला आठवलं. मी तडक बेडवरून उठलो आणि टेबलावर ठेवलेल्या पेपरच्या गठ्ठयामधून एक आठवड्यापूर्वीचा पेपर काढला. पेपर नीट चाळल्यावर आतल्या पानावर तीन जणांची फोटोनीशी एक बातमी दिसली. तिघांचाही फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होता. स्पष्ट काही दिसत नव्हतं. पण, नीट लक्ष देवून बघितल्यावर मला खात्री पटली की, हे फोटो तर ती म्हातारी आणि त्या काका-काकूंचेच होते.! त्या बातमीचा मथळा असा होता- "काल रात्री घडलेल्या भिषण अपघातामध्ये वुद्ध महिलेव्यितिरिक्त एका दांपत्याचा करूण अंत.." हा मथळा वाचताना भितीने अंगावर काटा येत होता. ओठ थरथरत होते. पण, तरीही पूर्ण बातमी वाचण्याचा मोह मला आवरला नाही. ओठांतल्या ओठांत पुटपुटत मी बातमी वाचायला लागलो. "एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकने तीन जणांना चिरडलं. त्यात त्या तिघांचाही जागेवरंच मृत्यु झाला. अपघातामध्ये एक वृद्ध महिला सौ. लक्ष्मीबाई जरांडे (६७) रा. वडेगाव, श्री. प्रमोद भिसे (४२) आणि सौ. कांता भिसे (३७) रा. कोनगाव, ह्यांचा दुदैवी मृत्यु झाला. अपघातामधील दोषी वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्यातरी वाहनचालक फरार असून स्थानिक पोलिस दल त्याचा कसून शोध घेत आहेत." बातमी वाचली आणि हातातला पेपर हातातून कधी गळून पडला हे हातालाही समजलं नाही...!!!
(समाप्त)
लेखक- सतीश रमेश कांबळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.