.......ति त्या तिघांपासुन काही अंतरावर उभी होती. अंगावर काळा झगा, विस्फारलेले केस, लालजर्द डोळे आणि ओठांवर दुष्ट हास्य. तो अवतार पाहुन तिघांचाही थरकाप उडाला होता.


"ती आता उठणार नाही." ढगांचा गडगडाट व्हावा तसे तिच्या तोंडून शब्द निघाले, "मी तिला निष्प्राण केलेल आहे आणि आता मी तिचा बळी देणार." अस म्हणून ती भयानक हसली.


अचानक अमेय भानावर आला आणि भीतीची जागा संतापाने घेतली. तो म्हणाला," नाही मी जोवर जिवंत आहे तोपर्यंत तु किमयाला हातही लावू शकत नाहीस. तुझाच अंत करायला आलोय मी इथे. हे शस्त्र बघ. हे स्वामींनी दिलय. तुला मारण्यासाठी."


ती पुन्हा हसली आणि म्हणाली, "तु करणार माझा अंत? बर ये मार मला. बघु कसा मारतोस तु."


अमेय काही विचार न करता सरळ तिच्यावर चालुन गेला आणि त्या तिच्यावर त्या दिव्य शस्त्राचा वार केला. पण ती तिथून गायब झाली आणि त्याच्या मागे प्रकट झाली. अमेय मागे वळला आणि पुन्हा ते शस्त्र उगारल. पण ती पुन्हा गायब झाली. काही वेळ असाच प्रकार घडत राहीला. शेवटी अमेय थांबला आणि तिला आव्हान देत म्हणाला, "अशी भित्र्यासारखी का पळतेस? हिम्मत असेल तर समोरासमोर लढाई कर."


ते ऐकुन ती अमेयपासुन काही अंतरावर प्रकट झाली आणि "जशी तुझी ईच्छा" अस म्हणून आपला हात अमेयच्या दिशेने केला.  अमेय आपोआप हवेत उचलला गेला. तिने हाताला एक झटका दिला. त्याबरोबर अमेय मागच्या बाजुला फेकला जाऊन एका भिंतीवर आपटला आणि खाली पडताक्षणीच बेशुध्द झाला.


रामुकाका आणि जयंत भयचकीत नजरेने हे सगळ पाहत होते. ती आता हळूहळू किमयाच्या दिशेने येत होती. अचानक रामुकाकांना काहीतरी आठवल. ते बेधडक जाऊन साराह विंचेस्टरच्या समोर उभे राहीले आणि म्हणाले, "कुठे चाललीस? आधी माझा सामना कर."


साराह विंचेस्टरः म्हातार्या, तु माझा सामना करणार? अरे त्याच्याकडे दिव्य शस्त्र असुन तो माझ काही बिघडवू शकला नाही. तु तर निशस्त्र. तु काय करशील?


 "मी निशस्त्र नाही." अस म्हणून रामुकाकांनी आपल्या गळ्यातुन एक माळ काढली. आणि तिला काही कळायच्या आत ती माळ तिच्या दिशेने भिरकावली. ती माळ गळ्यात पडताक्षणीच तिला भयंकर वेदना झाल्या. ती येड्यासारखी किंचाळत सुटली. तिच जीवाच्या आकांताने ओरडण ऐकुन जयंतने रामुकाकांकडे प्रश्नार्थक नजर टाकली. रामुकाका म्हणाले, "ती माळ माझ आराध्यदैवत मारूतीच्या नावाने सिध्द आहे. जोपर्यंत ही माळ तिच्या गळ्यात आहे. ती काही करू शकत नाही. पण आता आपण वेळ दवडता कामा नये. तुम्ही छोट्या बाईसाहेबांना घेऊन इथून बाहेर निघा. मी साहेबांना घेऊन येतो."


जयंतने किमयाला उचलल आणी जायला निघाला. साराह विंचेस्टरने पाहील की आपल सावज हातातून निसटून चाललय. तिने वेदनेची पर्वा न करता गळ्यातली माळ दोन्ही हातांनी पूर्ण ताकदीनिशी काढून फेकली. ती कशीबशी उभी राहीली. त्या माळेने तिची शक्ती फार क्षीण झाली होती. तिने रामुकाकांकडे पाहील. "म्हातार्या" अस म्हणून तिने डोळे बंद करून काहीतरी पुटपुटल आणि आपला हात रामुकाकांच्या दिशेने केला. हातातून एक काळा गोळा निघाला आणि तो रामुकाकांच्या छातीवर लागला. रामुकाका निष्प्राण होऊन जमिनीवर पडले. तिने आपला मोर्चा जयंतकडे वळवला. जयंतने रामुकाकांना पडतांना पाहील होत. ती आता जयंतच्या दिशेने येत होती. अचानक त्याच लक्ष त्या दिव्य शस्त्राकडे गेल. ते त्याच्या पायाजवळ पडल होत. त्याने किमयाला तिथेच खाली हळूच ठेवल आणि ते शस्त्र उचलल. पण तोपर्यंत साराह विंचेस्टरने जयंतच्या जवळ पोहोचुन त्याचा गळा धरला आणि जोरात आवळला. जयंतने आपल्या हातातील दिव्य शस्त्राचा वार तिच्या गळा पकडलेल्या हातावर केला. तिचा हात मनगटापासुन तुटून खाली पडला.ती संतापाने आणि वेदनेने बेभान झाली होती. तिने डोळे बंद करून तोच मंत्र पुटपुटला आणि तिच्या हातातून काळा गोळा निघुन जयंतच्या छातीवर लागला. तो निष्प्राण होऊन जमिनीवर पडला.


                  ******************


           अचानक अमेयच्या शरीरात हालचाल झाली. त्याने डोळे उघडले. त्याच डोक जोरात आपटलेल असल्याने अजुन ठणकत होत. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली आणि त्याला थरकाप उडवणार दृश्य दिसल. रामुकाका आणि जयंतचे निष्प्राण शरीर जमिनीवर पडलेले होते आणि काही फुट अंतरावर एका कोपर्यात यज्ञकुंड धगधगत होत. त्या यज्ञकुंडाजवळ किमया बेशुध्दावस्थेत पडलेली होती. साराह विंचेस्टरची अघोरी साधना सुरू झाली होती. अमेयने उठण्याचा प्रयत्न केला, पण तो हलू शकत नव्हता. जणूकाही त्याला अदृश्य बंधनांनी बांधून टाकल होत. 


"हे काय केलस तु माझ्यासोबत. मुक्त कर मला." अमेय ओरडला.


साराह विंचेस्टरने त्याच्याकडे एक दृष्टी टाकली. तिच्या लाल डोळ्यांत क्रुर चमक होती. ती म्हणाली, "इतक्या लवकर नाही सोडणार मी तुला. पहीले ह्या पोरीचा बळी देऊन मी माझ्या शक्ती प्राप्त करेल आणि मग तुला मुक्त करेल. कायमच. ह्या जगातून." 


एवढ म्हणून ती भयानक हसली आणि पुन्हा आपली अघोरी साधना चालु केली. अमेयला कहीही सुचत नव्हत. त्याने त्या अदृश्य बंधनातून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ते दिव्य शस्त्रही त्याच्यापासुन कितीतरी फुट दुरवर पडल होत. शेवटी हताश होऊन त्याने आयुष्यात पहील्यांदा मनोमन देवाला प्रार्थना केली.


                तेवढ्यात अचानक एक अद्भुत गोष्ट घडली. अमेयच्या काही फुट अंतरावर एक पांढरा प्रकाश पसरला. त्या प्रकाशाने अमेयचे डोळे दिपले. त्या प्रकाशातून कोणीतरी येत होत. क्षणभर त्याला तिथे स्वामी आल्याचा भास झाला. पण ते जवळ आल्यावर कळल की ते स्वामी नाही, तर ते काही लहान मुले होती आणि एक दोन नाही तर तब्बल ४०-५० मुले होती. अमेय त्या लहान मुलांकडे आश्चर्याने पहात होता. ती मुले अमेयच्या चारी बाजुंनी जाऊन उभी राहीली. अमेय त्या मुलांकडे डोळे विस्फारून पाहत होता. हि तीच मुले होती, ज्यांचे साराह विंचेस्टरने बळी दिले होते. त्या मुलांनी आपले हात अमेयच्या दिशेने केले. त्यांच्या हातातून पांढरा प्रकाश निघाला. तो प्रकाश अमेयच्या शरीरावर पसरला. त्याला गुदगुल्या झाल्यासारख वाटल आणि अचानक त्याच शरीर स्वतंत्र झाल. ते अदृश्य बंधन नष्ट झाल होत. तो हलु शकत होता. तो उठून बसला. तो अजुनही त्या मुलांकडे बघत होता. पण यावेळेस त्याच्या चेहर्यावर आनंद आणि आश्चर्य यांचे मिश्र भाव होते. त्यांतील एका मुलाने पुढे होऊन ते दिव्य शस्त्र अमेयच्या पुढे धरल. अमेयने ते शस्त्र घेतल. त्या मुलाने तिकडे बोट दाखवला जिकडे ती अघोरी साधना चालली होती. साराह विंचेस्टरची साधना आता संपली होती. ती उभी राहीली होती. तीच्या हातात एक चमचमती तलवार होती. ती बळीची तयारी करत होती. अमेयने पुन्हा त्या मुलांकडे पाहील. पण तिथे आता कोणीच नव्हत. तो पांढरा प्रकाश लुप्त झाला होता. अमेय उठून उभा राहीला आणि क्षणाचाही उशीर न करता साराह विंचेस्टरच्या दिशेने पळाला. ती आता किमया जवळ आली होती. तिने बळी देण्यासाठी तलवार उगारली की अचानक तिच  लक्ष पळत येणार्या अमेयकडे गेल. तिला काही समजायच्या आतच अमेयने ते दिव्य शस्त्र साराह विंचेस्टरच्या छातीच्या आरपार केल होत. एका क्षणाची शांतता आणि तिने एक जीवघेणी किंकाळी फोडली. बघता बघता तिच्या शरीराची राख झाली होती. साराह विंचेस्टरसोबत ते दिव्य शस्त्र सुध्दा नष्ट झाल होत.


                   *****************


             संध्याकाळची वेळ झाली होती. तळघराच्या दरवाज्यातून अमेय किमयाला घेऊन वरती आला. त्याच्यामागोमाग रामुकाका आणि जयंत सुध्दा आले. साराह विंचेस्टरबरोबर  तिच्या काळा जादूचा प्रभावही संपला होता. रामुकाका, जयंत आणि किमया शुध्दीवर आले होते. ते चारही जण तळघराच्या बाहेर आले तेव्हा नुकतीच संध्याकाळ व्हायला लागली होती. त्या चौघांनी शेवटच एकदा मागे वळून पाहील. तो तळघराचा दरवाजा गायब झाला होता. चौघेही जण बंगल्याच्या पुढच्या दारी आले. अचानक अमेय एकदम थांबला. समोर शारदा उभी होती. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत उभे राहीले आणि एकदम शारदाने पळत अमेय आणि किमयाला मिठी मारली. थोड्या वेळाने ते एकमेकांपासुन दूर झाले. अचानक अमेयने शारदाला विचारल, "  स्वामी इथे दिसत नाहीत. घरात आहेत का?"


शारदाः नाही. मला तर नाही दिसले. जेव्हापासुन मी शुध्दीत आलेय तेव्हापासुन इथेच उभी आहे.


अमेयः मग ते गेले कुठे.


अचानक रामुकाकांच लक्ष खाली जाणार्या पायांच्या ठशांकडे गेल. एक मंद स्मित करून ते म्हणाले, "साहेब,  स्वामींची चिंता तुम्ही करू नका. ते जे काम करायला आले होते ते झाल. ते गेले."


अमेय काही बोलणार एवढ्यात जयंत मध्ये कुदला, "ओय अम्या, अरे यार पहील्यांदा तुझ्या नव्या घरी आलोय. काही स्वागत वगैरे करायची पध्दत आहे की नाही."


अमेयः अरे अस कस. तुझ स्वागत तर करावच लागेल. त्याशिवाय तु मला सोडणार आहेस का?


जयंतः आणि हो. जेवणात मला पंचपक्वान्न हवेत बर का? नुसत भाजी भाकरी वर निभावून चालणार नाही.


अमेयः हो रे बाबा, आधी आत तर चल. भुक्कड कुठला.


अस म्हणून हसत हसत सगळ्यांनी नवीन घरात नवीन प्रवेश केला.                   *******समाप्त*******

         
            

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel