सोनेरी पान पहिले
१. चंद्रगुप्त-चाणक्य
आपल्या भारताच्या राष्ट्रीय जीवनाच्या उष:कालाचा आरंभ न्यूनत: पाच सहस्र
वर्षांपासून दहा सहस्र वर्षांपर्यंत तरी आजच्या संशोधनानुसार प्राचीन आहेचीनबाबिलोन,
ग्रीस प्रभूती कोणत्याही प्राचीन राष्ट्राच्या जीवनवृत्तान्ताप्रमाणे हा आपला प्राचीन राष्ट्रीय
वृत्तान्तही पुराणकालात मोडतो. म्हणजे त्यात असलेल्या इतिहासाबर दंतकथेची, दैवीकरणाची
आणि त्लाक्षणिक वर्णनाची पुटेच पुढे चढलेली आहेत. तरीही ही आपली जुनी 'पुराणे' आपल्या
प्राचीन इतिहासाचे आधारस्तंभच आहेत हे विसरता कामा नये. हे प्रचंड 'पुराणवाअय' आपल्या
साहित्याचेजानाचेकर्तृत्वाचे नि ऐश्वर्याचेही जसे एक भव्य भांडार आहे तसेच ते आपल्या
प्राचीन जीवनवृत्तान्तांचेही असंगत, अस्ताव्यस्त नि संदिग्ध असले तरी एक अमायेद संग्रहालय
परंतु आपली 'पुराणे' म्हणजे निर्मीळ 'इतिहास' नव्हे.
यास्तव मी त्या पुराणकालाचा विचार या प्रसंगापुरता बाजूस ठेवणार आहे
कारण मी ज्या सोनेरी पानांचा निर्देश करणार आहे ती सोनेरी पाने भारताच्या 'पुराणातील
नसून 'इतिहासातीलआहेत.
भारतीय इतिहासाचा आरंभ
इतिहासाचे मुख्य लक्षण म्हणजे त्यातील वर्णनांतील नि घटनांतील स्थल नि
काल ही जवळजवळ निधितीने तरी सांगता आली पाहिजेत आणि त्यातील घटनांना परकीय
वा स्वकीय अवांतर पुराव्यांचे शक्यतो पाठबळ मिळत असले पाहिजे.
अशा कसोटीस बहुतांशी उतरणारा आपला प्राचीन काळचा वृत्तान्त हा बुध्द
कालापासून मोजता येतो. यास्तव अनेक भारतीय नि पाश्चात्य प्राच्यविद्यावेते आपल्या
भारताच्या इतिहासा'चा आरंभ ह्या बुध्दकालापासून सध्या समजत आहेत. ह्या
प्राच्यविद्यावेत्यांच्या सतत चालणाच्या परिश्रमामुळे आज आपण ज्याला पौराणिक काल म्हणतो
त्यातलाही काही भाग नवीन संशोधन झाल्यास ह्या इतिहासकालात समावेशता येईल. पण
तोपर्यंत तरी बुध्दकाल हाच आपल्या 'इतिहासा'चा आरंभ म्हणून समजणे भाग आहे.
त्यातही कोणत्याही प्राचीन राष्ट्राचा निझीळ इतिहास निश्चितपणे ठरविण्याच्या
कामी तत्कालीन जगातील तदितर राष्ट्रांच्या साहित्यादिक लिखाणांत सापडलेल्या अपोद्वलक
उल्लेखांचा फार उपयोग होतो. आज उपलब्ध असलेल्या आणि निधितार्थ ठरलेल्या जगातील
ऐतिहासिक साधनांमध्ये भारताच्या ज्या प्राचीन कालखंडाला असा भारतेतर राष्ट्रांच्या सुनिश्चित
साधनांचा पाठिंबा मिळतो तो आपल्या इतिहासांचा कालखंड समाट चंद्रगुप्ताच्या काळाच्या
आोमागेच चालू होतो. कारण अलेक्झांडरची स्वारी भारतावर जेव्हा झाली तेव्हापासूनच्या ग्रीक