नि पुढे पुढे चीन देशातील प्रवाशांच्या प्रवासवर्णनांच्या लेखांतून भारतातील

त्या त्या पुढील घटनांचे ऐतिहासिक कसोटीस बव्हंशी उतरणारे असे अनेक उल्लेख सापडतात.


सोनेरी पान कोणते ?


ह्या आपल्या ऐतिहासिक कालातील ज्या सोनेरी पानांविषयी मी चर्चा करणार

आहे तीच पाने काय ती सोनेरी म्हणून निवडण्यासाठी मी कोणती कसोटी वापरीत आहे ? तसे

पाहता आपल्या ह्या ऐतिहासिक कालात काव्य, संगती, प्राबल्य, ऐश्वर्य, अध्यात्म प्रभृती

अवांतर कसोटींना उतरणारी शतावधी गौरवार्ह पाने सापडतात. परंतु कोणत्याही राष्ट्राबर

पारतंत्र्यासारखे प्राणसंकट जेव्हा गुदरते, आक्रमक परशचूंच्या प्रबळ टाचेखाली ते स्वराष्ट्र जेव्हा

पिचून गेलेले असते किंवा जाऊ लागते तेव्हा तेव्हा त्या प्रबळ शबूचा पाडाव करून नि

पराक्रमाची पराकाष्ठा करून स्वराष्ट्रास त्या पारतंत्र्यातून मुक्त करणारी, त्या पारतंत्र्यातून

सोडविणारी आणि आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचे आणि स्वराज्याचे पुनरुज्जीवन करणारी जी

चुंजार पिढी, तिच्या नि तिला कुंजविणारे जे धुरंधरवीर नि विजयी पुरुष त्यांच्या त्या

स्वातंत्र्ययुध्दाच्या वृत्तान्ताचे जे पान त्या पानास मी येथे सोनेरी पान म्हणून संबोधीत आहे

कोणत्याही राष्ट्रात त्याच्या अशा परंजयी स्वातंत्र्ययुध्दाची ऐतिहासिक पाने अशीच गौरविली

जातातअगदी अमेरिकेचेच उदाहरण पहा. रणांगणात इंग्लंडला चीत करून ज्या समयी

अमेरिकेने आपले स्वातंत्र्य छिनावून घेतले त्या विजयी दिवसालाच अमेरिकेच्या इतिहासातील

सोनेरी दिवस म्हणून सणासारखे गौरविले जाते आणि त्या युध्दाच्या इतिहासाचे पान हे

अमेरिकेच्या इतिहासातील सोनेरी पान गणले जाते.


प्रत्येक मोठ्या नि प्राचीन राष्ट्रावर पारतंत्र्याचे : संकट केव्हातरी कोसळलेलेच असते

त्यातही अमेरिकेच्या राष्ट्राचा जन्मच मुळी कालचा ! म्हणून त्याच्या टीचभर

इतिहासात त्यांच्यावर एकच काय ते प्राणसंकट गुदरावे आणि ते निवारणारे एकच काय ते

सोनेरी पान असावे ह्यात काही विशेष नाही. परंतु चीन, बाबिलोनियन, पर्शियन, इजिप्शियन,

प्राचीन पेरु, प्राचीन मेक्सिको, ग्रीसरोमन प्रभृती जी पुरातन राष्ट्र सहस्रावधी वर्षे नांदत

राहिली त्यांच्या त्या विस्तृत राष्ट्रीय जीवनात प्रबलतर परकीयांच्या आक्रमणाखाली चेचने

जाण्याचे अनेक प्रसंग त्यांच्यावर साहजिकपणेच येऊन गेलेतशा प्राणसंकटातून त्यातील

काही राष्ट्रांनी आपल्या पराक्रमाने पुन्हा पुन्हा सुटकाही करून घेतली आणि त्यांच्या त्या त्या

परशचूंना दाती तृण धरावयास लावले. सहस्रावधी वर्षे आपले राष्ट्रीय अस्तित्व नि प्राबल्य

टिकवून धरणाच्या अशा राष्ट्रांचा इतिहासात वेळोवेळी पुन:पुन्हा स्वातंत्र्यसंपादनार्थ केलेल्या

रणांगणांची नि त्यात मिळविलेल्या विजयाची एकाहून अधिक अशी सोनेरी पाने सन्मानिली


गेलेली आहेत. भारताचा इतिहास तर त्या प्राचीनतम कालापासून आजपर्यंत अखंडपणे चालत

त्याच्या प्राचीन काळात भरभराट असलेली वरील बहुतेक राष्ट्रे नि राज्ये आज

नामशेषसुध्दा होऊन गेलेली आहेत. एक चीनचे महान राष्ट्र तेवढे भारताच्या महनीयतेचे पुरातन

सावी म्हणून आज उरलेले आहे चीन आणि भारत ही दोन्हीही राष्ट्रे अतिविस्तृत असल्यामुळे आणि अतिप्राचीन कालापासून

सततपणे आजपर्यंत आपले स्वातंत्र्य आणि सामर्थे टिकवून नांदत आलेली

असल्यामुळे त्यांच्याबर अनेक वेळा इतर अल्पजीवी राष्ट्रांपेक्षा अधिक प्रसंगी परदास्याची

प्राणसंकटे कोसळलेली आढळतात यात काही आश्चर्य नाही. चक्रनेमिक्रमाचा अटळ नियम

त्यांनाही होताच. हिंदुस्थानावर ज्याप्रमाणे शक, हूण, मोगलादिकांच्या अनेक चढाया झाल्या

त्याचप्रमाणे चीनवरही त्या आणि इतर परराष्ट्रांच्या अनेक चढाया झालेल्या आहेत. हूणांच्या

प्रलयापासून बचाव करण्यासाठी तर चीनने त्यांच्या राष्ट्राभोवती ती जगप्रसिध्द तटबंदी, ती

Chinese Wall बांधली होती. पण तिलाही वळसे घालून किंवा उल्लंघून चीनच्या शठंनी

त्याला पादाक्रान्त करावयास सोडले नाही. बहुधा अंशत: परंतु काही वेळा तर संपूर्णत: चीनही ।

परकीय राजसत्तेच्या जोखड़ाखाली संत्रस्त होऊन पडलेला होता. तथापि त्या त्या वेळी ते महान्


राष्ट्र पुन:पुन्हा नवतेजाने नि चैतन्याने अनुप्राणित होऊन त्या परकीय सत्तेला उलथून पाडू

शकले, आपले जीवित, सत्व नि स्वातंत्र्य राखू शकले आणि आजही पुन्हा एक स्वतंत्र नि

सामथ्र्यंशाली राष्ट्र म्हणून नांदत राहिले आहे. हेच खरे ऐतिहासिक आधर्य होय ! भारताच्या

इतिहासाचे मूल्यमापन करताना या प्रकरणी तोच मानदंड वापरला पाहिजे. परंतु विशेषतः

इंग्रजांच्या परकीय सतेखाली जेव्हा हिंदुस्थान दबला होता तेव्हा अनेक इंग्रजांनी भारताचा

इतिहास अशा विकृत पध्दतीने लिहिला आणि त्यांनी काढलेल्या शाळामहाशाळांतून तरुणांच्या

दोनतीन पिढयांकडून त्या विकृत इतिहासाची इतकी पारायणे करून घेतली की, जगाचाच नव्हे,

तर आपल्या स्वत:च्या लोकांचाही त्या प्रकरणी बुध्दिमंशच व्हावा. हिंदुस्थानचे राष्ट्र हे सतत

ह्या वा । त्या परसत्तेखालीच दडपलेले होते; हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे हिंदंच्या पराभवामागून

पराभवांचीच काय ती एक जंत्री आहेअशी धडधडीत असत्य, उपमर्दकारक आणि दुष्ट हेतूंनी


केलेली विधाने चलनी नाण्यासारखी परकीयांकडूनच नव्हे, तर काही स्वकीयांकडूनही बेखटक

व्यवहारिली जात आहेत. त्यांचा प्रतिकार करणे हे स्वराष्ट्राभिमानाच्या दृष्टीनेच नव्हे, तर

ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीनेही अत्यंत आवश्यक आहेह्या कार्या जे काही प्रयत्न अन्य

इतिहासज्ञांकडून होत आले आहेत, त्यात ह्या प्रसंगानिमित्ते प्रचाराची शक्यतो अधिक भर

घालणे हे एक कर्तव्यच आहे. यासाठी ज्या ज्या परकीय आक्रमकांनी हिंदुस्थानवर स्वाच्या

केल्या किंवा राज्यसता गाजविली त्या त्या परकीयांचा अंती धुव्वा उडवून देऊन आपल्या

हिंदुराष्ट्रास ज्यांनी ज्यांनी विमुक्त केले त्या त्या हिंदुराष्ट्रविमोचक पिढयांचे आणि त्यांचे प्रतीक

म्हणून त्या त्या संग्रामातील काही युगप्रवर्तक वीरबरांचे ऐतिहासिक शब्दचित्रण करण्याचे मी

येथे योजिले आहे


अलेक्झांडरची स्वारी


१०. पूर्वी उल्लेखिलेल्या भारताच्या ऐतिहासिक कालातील भारतावर झालेली


परराष्ट्राची पहिली प्रसिध्द स्वारी ही अलेक्झांडरची होय. इसवी सनपूर्व ३२७ मध्ये ही स्वारी


झाली. त्या प्राचीन काली युरोपमधली सध्याची इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी प्रभुती राष्ट्र जन्मनी


सुध्दा नव्हती. रोमन साम्राज्याची पायाभरणीही झालेली नव्हती. युरोपात एक ग्रीक लोक तेवढे


गाजत होते. ग्रीकांची लहान लहान नगरराज्ये (City States) स्वतंत्रपणे नांदत असत. त्यात


स्पार्टी, अथेन्स ही नगरराज्ये पुढारलेली. परंतु ह्या फुटकळ नगरराज्यांवर जेव्हा संघटित,


विस्तृत, एककेंद्रित नि बलाढय अशा त्या वेळच्या पारसिक सामाज्याच्या अधिपतीने स्वारी


केली तेव्हा त्या स्पार्टी, अथेन्स प्रभुती फुटकळ नगरराज्यांचा काहीच टिकाव लागला नाही.




Republics नी) लढण्याची पराकाष्ठा केली; पण पारसिक


सामाज्याच्या सेनासागरापुढे त्यांचे काहीच चालेनासे झाले. ह्यामुळे पारसिकांप्रमाणेच आपल्या


साच्या फुटकळ नगरराज्यांचे मिळून एक प्रबळ ग्रीक राज्य स्थापावे नि शबृशी एकमुखी


सामना द्यावा अशी ग्रीक लोकांत तीव्र इच्छा उत्पन्न झाली. त्यांच्यातील मॅसिडोनियाचा राजा


फिलिप याने त्या महत्त्वाकांक्षेने लहानसहान ग्रीक प्राजके जिंकली. परंतु त्याचे एकमुखी राज्य


बाढत चालले असताच तो मृत्यू पावला. तथापि त्याच्यामागे राज्याबर बसलेला त्याचा पुत्र हा


त्याच्यापेक्षा शतपटीने महत्त्वाकांक्षी, विजयिष्णु आणि शूर निघाला. त्याचेच नाव अलेक्झांडर.

साच्या ग्रीक राष्ट्रात त्याने एकराष्ट्रीयत्वाचे नवचैतन्य संचारविले. बलाढ्य सैन्य उभारले, आणि

ग्रीकांच्या राष्ट्राचा शत्रु जो पारसिक सम्राट दरायस त्याच्यावरच अलेक्झांडर चालून गेला.

ग्रीकांच्या त्या संघटित सैन्यापुढे दरायसच्या बहुसंख्य पण असंघटित साम्राज्यसेनेचा धुव्वा

उडाला. अलबेला येथील लढाईत तर पारसिक राजसत्ताच उखडून पडल्यासारखी झाली.

अलेक्झांडर आपल्या विजयोद्दीप्त सैन्यासह पारसिक सम्राटाच्या थेट राजधानीवर चालून गेला

आणि ती जिंकून त्याने स्वत:चीच पारसिकांचा समाट म्हणून घोषणा केली. ह्या अपूर्व

विजयाने अलेक्झांडरची राज्यतृष्णा अधिकच वाढली. ग्रीसच्या नि पारसिकांच्या सुविशाल

सामाज्याचे सम्राटपद हाती येताच अलेक्झांडरला स्वर्ण दोन बोटे उरल्यासारखा वाटू लागला.

आपण मनात आणू तर आपण साच्या जगास जिंकू शकू आणि इतिहासात आपले नाव

जगज्जेता म्हणून गाजवू शकू अशा प्रबळ आत्मविधासाचा सन्माद त्याला चढला. पारसिकांचे

नि त्यांच्याही पूर्वीचे ते बाबिलोनियाचे महाराज्य जसे एका धडाक्यासरशी तो पादाक्रान्त करू

शकला तसेच त्याला लागूनच असलेले आणि ज्याची कीर्ती ग्रीक लोक पिढ्यान्पिढ्या ऐकत

आलेले होते ते भरतखंडही मी सहज पादाक्रान्त करू शकेन अशा दुर्दम्य महत्वाकांक्षेने

अलेक्झांडरने भरतखंडावरही स्वारी करण्याचे ठरविले. त्या धाडसी योजनेप्रमाणे त्याने लवकरच

ग्रीकांचे अगदी निवडक, ताज्या दमाचे नि कोच्याकरकरीत शस्त्रांनिशी सज्ज असे नवीन सैन्य

उभारले. त्यात एक लक्ष वीस सहस्र पायदळ नि पंधरा सहस्र घोडेस्वार होते. आजपर्यंत

विजयामागून विजय मिळवीत आलेल्या आपल्या महासेनानी नि सम्राट अलेक्झांडरवर,

त्याच्या पराक्रमी नि विजयिष्णु सैन्यसंभाराची इतकी श्रध्दा बसलेली होती की ते ग्रीक सैनिक

त्याला एक अलौकिक असा दैवी पुरुषच समजत. अलेक्झांडर स्वत:सही 'यू' (युः) देवतेचा

पुत्र म्हणून म्हणवी.


भारत राष्ट्राची तत्कालीन व्याप्ती


११. त्या दोन अडीच सहस्र वर्षांपूर्वीच्या काली सिंधू नदीच्या पलीकडे अगदी

इराणच्या सीमेला भिडलेल्या प्रदेशापर्यंत भारतीयांची वस्ती नि राज्ये पसरलेली होती. आज

हिंदुकुश पर्वत म्हणतात त्याला ग्रीक लोक 'परोपनिसस' (Paropnisus) असे म्हणत.

आज ज्याला अफगाणिस्थान म्हणतात त्याला त्या काळी गांधार म्हणत. 'अहिराणस्थान' हे

अफगाणिस्थानचे आपले प्राचीन नाव आहे. काबुल नदीचे आपले त्या वेळचे प्राचीन नाव

'कुभा' असे होते. त्या हिंदुकुश पर्वतापर्यंतच्या ह्या सर्व प्रांतांत भारतीयांची लहानमोठी राज्ये

होती. ह्या भागातील राज्यांपासून तो सिंधुनदी समुद्राला जेथे मिळाली आहे तेथपावेतो तिच्या

दोन्ही काठांना लागून वैदिक धर्मानुयायी असलेल्या भारतीयांच्या लहान मोठ्या स्वतंत्र

राज्यांची मालिकाच मालिका पसरलेली होती. ह्या राज्यांतील बहुतेक राज्ये ही प्राजके होती.


डॉ. जयस्बाल ह्यांचा Hindu Polity ग्रंथ


१२ . 'अभिनव भारत' ह्या क्रांतिकारक संस्थेचे लंडनमध्ये सन १९०७ ते १९१० च्या

कालात एक प्रमुख सदस्य असलेले आणि पुढे प्राच्यविद्याविशारदांत जागतिक कीर्ती पावलेले

डॉ. जयस्वाल ह्यांनी लिहिलेल्या ‘Hindu Polity' ह्या सुप्रसिध्द ग्रंथात सिंधू नदीच्या उभय

तटांवर तिच्या समुद्रसंगमापर्यंत पसरलेल्या ह्या भारतीय 'गणराज्याच्या निरनिराळ्या

लोकसत्ताक राज्यघटनांचे संशोधनपूर्वक विस्तृत वर्णन केलेले आहे

ग्रीक लोकांच्या पुराणांप्रमाणेच त्याचे पूर्वज फार प्राचीन काळी भारताच्या

सिंपलीकडील गांधारप्रभृती प्रांतांतूनच मूळच्या आर्यवंशाच्या जानपदाची एक तुटक शाखा

होऊन ग्रीसकडे गेले होते अशी त्यांची पुरातन भावना असेअलेक्झांडरचे सैन्य प्राचीन

भारताच्या त्या भागात प्रवेशले तेव्हा तेथे त्यांना अकस्मात एक लहानसा समूह, स्वत:ला

मूळचा ग्रीक समजणारा, असा आढळला. तो जरी भारतीयांत मिसळून गेलेला होता तरी त्याने

ते ग्रीक सैन्य पाहताच आपणही त्यांचेच पुरातन कालाचे भाऊबंद आहोत असे सांगितले.

अलेक्झांडरलाही आपल्या प्राचीन पूर्वजांचे हेच मूळ ठिकाण असले पाहिजे असे वाटले. त्याला

नि त्याच्या ग्रीक सैन्याला त्यांच्या ह्या प्राचीन पितृभूमीचे दर्शन झाल्यावर इतका अत्यानंद

झाला की, त्या साच्या सैन्याने काही दिवस युध्द बंद ठेवून एक महोत्सव साजरा केला. ग्रीक

लोकांनी ग्रीक देवतांच्या संतोषास्तव यज्ञ करून हवने अर्पिली.


१३. ग्रीक लोकांच्या देवतांचे वैदिक लोकांच्या देवतांशी अत्यंत सादृश्य होते.

त्यांच्या देवतांच्या नावांचे उच्चार तेवढे अपभृशानुसार पालटलेले होते. ग्रीक लोकही यज्ञ

करीत, हवने देत. ग्रीकांना आयोनियन्स असेही म्हणत.

आयोनियन्स नावावरून 'यवन' शब्द पडला


१४. क्वचित् ययातीचा पुत्र अनु ह्याचेच हे ग्रीक लोक वंशज असतील काय ?

अन्वायन - अयोनियन अशी अपभ्रष्ट रूपे होत गेली असतील काय ? पण तो विषय

संशोधकांकडे सोपविला पाहिजे. इतके मात्र खरें की, ग्रीक लोकांना अगदी आरंभापासून आपले

भारतीय लोक 'यवन' या नावानेच ओळखत आलेले आहेत. ही गोष्ट संस्कृत साहित्यावरून

उघड आहे. ग्रीकांच्या 'आयोनिअन्स' ह्या नांवावरून त्यांना भारतात 'यवन' किंवा 'योन' हे नाव

पडलेले असावे.


त्या काळी गांधार पंचनद ते सिंधूपर्यंत बुध्दाचा पता सुध्दा नव्हता

१५ आणखी एक गोष्ट येथेच सांगून टाकण्यासारखी आहे की, पूर्वी उल्लेखिलेल्या

गांधारपासून तो पंचनद (पंजाब) प्रांतापर्यंत आणि तेथून सिंधू नदीच्या उभय तटांवरील

प्रदेशांपासून तो ती नदी समुद्रास मिळते तेथपर्यंत भारताच्या ज्या ज्या भागात अलेक्झांडरने

संचार केला त्या त्या । भागातील लोकस्थितीचे विविधांगी वर्णन त्या वेळच्या ग्रीक लेखकांनी

दिलेले आहे. परंतु त्या सर्व वर्णनात वैदिक धर्मानुयायी भारतीयांचे अनेक उल्लेख असताही


बुध्दाचा किंवा बुध्दपंथाचा चुकूनसुध्दा एखादा उल्लेख आढळत नाही. ह्यावरून आणि अर्थातच

इतर सर्व तत्कालीन पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की त्या कालापर्यंत भारताच्या, शतद्र

पलीकड़ील, भागात तरी बुध्दपंथाच्या अस्तित्वाचा पतासुध्दा नव्हता. म्हणजे बुध्दाच्या

मृत्यूनंतर अडीचशे-तीनशे वर्षे उलटून जाईतोपर्यंत केवळ मगध प्रांतातच बुध्दपंथाचा यत्रतत्र

जो प्रसार झाला त्यापलीकडे काही त्याचे पाऊल पडलेले नव्हते. पुढील इतिहासाच्या

अनुरोधासाठी ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे.

ग्रीक म्हणजे 'यवन', मुसलमानांना यवन म्हणणे हे चूक !

१६. परराष्ट्रीय, आक्रमक आणि अंशत: परधर्मीय अशा ग्रीकांना आपले तत्कालीन

भारतीय लोक 'यवन' म्हणून ओळखत. परंतु त्यामुळे सर्वच परराष्ट्रीय आक्रमकांना यवन असे

म्हणणे ही अर्थातच चुकीची गोष्ट होती. विशेषत: मुसलमानांना आपले लोक जे यवन म्हणूनच

म्हणू लागले ती तर घोडचूक होती. कारण ग्रीक लोक आक्रमक नि परराष्ट्रीय जरी असले तरी

सापेक्षत: ते त्या वेळच्या विद्याव्यासंगी नि सभ्य जगतातच मोडत होते. परंतु भारतावर ज्या

मुसलमानांच्या टोळधाड़ी शतावधी वर्षांनंतर पुढे चालून आल्या त्या धर्माध, रानटी नि

विध्वंसक अशा राक्षसी वृत्तीच्या होत्या. तशा राक्षसी वृत्तीच्या मुसलमानांना 'मुसलमानम्हणून

ओळखणेच अवश्य होते. त्यांनाही 'यवन' म्हणण्यात त्यांचा नसता गौरव करण्याची आणि

यवन शब्दाची नसती पायमल्ली करण्याची अशी दुहेरी चूक आपल्या हातून घडत आली.

मुसलमानांना 'म्लेच्छ' म्हणता येईल, यवन नव्हे. वेडगळ मुसलमान समजतात तसा शिकंदर हा काही कुणी मुसलमान नव्हता


१७. बहुसंख्य मुसलमानांतील एक वेडगळ समजूतही येथे सांगण्यासारखी आहे.

अलेक्झांडर ह्या नावाचे पर्शियन भाषेत शिकंदर असे रूपांतर झाले होते. ग्रीकांचे साम्राज्य

पर्शियाबर होते तोपर्यंत अनेक पर्शियन लोक अलेक्झांडरच्या अलौकिक पराक्रमामुळे मोहित

होऊन आपल्या मुलांनाही शिकंदर हेच नाव ठेवू लागले. पुढे पर्शियातील लोक मुसलमान

झाल्यानंतरही त्यांच्यात मुलांना शिकंदर हे नाव ठेवण्याची प्रथा चालूच राहिली. भारतातील

बाटण्या मुसलमानांनीही तीच प्रथा उचलली. त्या शिकंदर ह्या शब्दाची ही मूळ कथा ठाकच

नसल्यामुळे हिंदुस्थानातील सहस्रावधी मुसलमानांची अशी दृढ समजूत झालेली असते की, ज्या

अर्थी महंमद अल्ली, कासिक इत्यादी त्यांच्या नावांप्रमाणे शिकंदर' हेही त्यांच्या मुसलमानी

नावातच मोडते. त्याअर्थी हा पराक्रमी शिकंदरही मुसलमानांतीलच कोणीतरी महापुरुष असला

पाहिजे ! किंबहुना तो मुसलमान होता म्हणूनच तो एवढा पराक्रमी नि दिग्विजयी निप

शकला असल्या कित्येक धर्मवेड्या, अडाणी नि आत्मप्रशंसक मुसलमानांना जर कोणी

सांगितले की शिकंदर' हा मुसलमान नव्हता. तो मुसलमान होऊ तरी कसा शकेल ?

शिकंदराच्या मृत्यूनंतर उण्यापुच्या एक सहस्र वर्षांनी महंमद पैगंबराचा जन्म, तर तसले

गावंढळ मुसलमान त्या सांगणाच्यालाच वेड्यात काढतील !


१८ . अलेक्झांडरच्या साम्राज्याची त्या वेळची सरसीमा हिंदुकुश पर्वत ही होती. अलेक्झांडर त्यांच्यापुढे आपल्या तुंबळ ग्रीक सेनेसह भारतावर जो चालून आला तो तक्षशिलेला  येऊन पोचला. तक्षशिलेचा राजा अंबुज (अंभी) याने युध्द न करताच अलेक्झांडरचे मांडलिकत्व मान्य केले. काही ग्रीक लेखक म्हणतात की, ह्या तक्षशिलेच्याच राजाने आपला प्रतिस्पर्धा जो पौरसराजा त्याचा मोड करण्यासाठी अलेक्झांडरला आपण होऊन बोलाविले होतेतसे असेल तर ह्या स्वजनद्रोहाचे प्रायश्चित अंभी राजाला ग्रीकांशी दोन हात न करताच त्यांना शरण जाऊन हौसेने भोगावे लागले हे क्रमप्राप्तच झाले


तक्षशिलेतील विद्यापीठ आणि एक विलक्षण योगायोग


१९. तक्षशिलेला तत्कालीन जगतात सुप्रसिध्द असलेले एक भारतीय विद्यापीठ होते

त्या विद्यापीठात देशोदेशीचे विद्यार्थी येऊन अनेक शास्त्रांचे नि कलांचे अध्ययन करीत. इतकेच

नव्हे, तर देशोदेशीच्या राज्यातील राजपुत्रही तेथे येऊन तेथील अनुशासन पाळून, राज्यशास्त्र

नि युध्दशास्त्र यांचे शिक्षण घेत असत.


२०. कोण्या विलक्षण योगायोगाने, तिकडे अलेक्झांडर तक्षशिलेच्या राज्याचा पाडाव

करून भारतात ससैन्य चाल करून जात असता, इकडे त्याच तक्षशिला विद्यापीठात तेजस्वी,

तरतरीत आणि भारताच्या इतिहासात एक दैदीप्यमान असे सोनेरी पान ज्याच्या हातून

भवितव्यता लिहविणार होती असा एक तरुणही राज्यशास्त्राचे नि युध्दशास्त्राचे शिक्षण घेत

होता किंवा ते शिक्षण घेऊन अलीकडेच बाहेर पडला होता. त्याचे नाव चंद्रगुप्त आणि ह्या

तक्षशिला विद्यापीठाच्या परिसरातच विविधशास्त्रपारावारपारंगत नि राजकारणधुरंधर असे एक

प्रौढ पंडित त्या तरुणाला राष्ट्रीय क्रांतिकार्याचे नि राज्यशास्त्राचे धडे देत होते, त्यांचे नाव

२१परंतु शिकंदरच्या स्वारीने उडालेल्या हलकल्लोळात ह्या दोन सामान्य व्यक्ती

कोणाच्याही डोळ्यात असामान्यपणे भरलेल्या नव्हत्या. त्या दोन व्यक्ती शिकंदरच्या त्या

साच्या प्रचंड परचक्रीय हालचालींकडे डोळ्यात तेल घालून बघत होत्या. भारतातील साच्या

रावरावळ, राजा-महाराजांचे ते फुटकळ फुटकळ मुकुट एकत्र वितळवून शिकंदर स्वतःच्या

शिरावर धारण करण्यासाठी जो भारतीय सम्राटपदाचा महामुकुट रणांगणात घडवीत होता तो

आयताचे आयता त्या परशचूंच्या हातून हिसकून घेऊन आपल्या त्या तरुण शिष्याच्या

मस्तकावरच ज्यायोगे बसविता येईल अशा एका महान क्रांतिकारक कार्याची योजना ते प्रौढ

आचार्य मनोमन आखीत होते.

पौरवराजाशी युध्द


२२. तक्षशिलेचा राजा अंबुज हा ग्रीकांच्या म्लेच्छ सैन्याशी युध्द न करताच त्याचे

आधिपत्य मानता झाला. ह्या त्याच्या कृत्याची जो तो ी थू करू लागला. अंबुज राजाच्या ह्या

क्षात्रधर्माला कलंक लावणाच्या क्लैब्याचा वचपा काढण्यासाठी आपण आपापल्यापरी ग्रीकांशी

प्रखर सामना द्यावयाचा । निर्धार आजूबाजूच्या राजसताक असलेल्या भारतीय राज्यांनी नि

गणराज्यांनी केला. दुर्दैवाची गोष्ट इतकीच की त्या सर्व फुटकळपणे स्वतंत्र असलेल्या भारतीय

राज्यांना त्या ग्रीक युध्दापुरते का होईना, पण एकत्र येऊन एकाच सैनिक नेतृत्वाखाली

युध्द लढण्याची बुध्दी झाली नाही म्हणा किंवा समय सापडला नाही म्हणा. अलेक्झांडरने वेळ

न दवडता तक्षशिलेला येताच आजूबाजूच्या सर्व भारतीय राज्यांना शरण येण्याची आज्ञा सोडली

आणि तक्षशिला राज्याला लागूनच असलेल्या पौरव (पौरस) राजाने ती आज्ञा धिक्कारून



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel