(खूप सुंदर पोस्ट, प्रेषक अज्ञात)
-----------------
मागच्या वर्षीचीच गोष्ट ! वर्ग इ.८ वीचा! शाळा नुकतीच सुरु झाली होती. नव्यानेच संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हि भाषा किती साधी सरळ आणि सोप्पी आहे हे सांगायच्या होतो. इतक्यात मागच्या बाकावरील विशेष जिज्ञासुवृत्ती जागी झाली- "सर,संस्कृत शिकून काय उपयोग?" मला ना शिक्षक व्हायचंय, ना कुठे पूजा सांगायचीय! मग मी संस्कृत का शिकावं बरं?
त्या चिमुकल्या डोळ्यात एक वेगळीच उत्सुकता होती. प्रश्न रास्त होता.

एकेकाळी ज्ञानभाषा असणारी हि भाषा आज शैक्षणिक अभ्यासक्रमात मात्र वैकल्पिक (OPTIONAL) झाली आहे. त्याच्या यक्षप्रश्नाचं उत्तर देणं अधिक महत्वाच होतं. कारण समस्त नवशिक्या विद्यार्थ्यांचा तो जणू प्रतिनिधीत्व करत होता. माझं उत्तर ऐकायला सगळा वर्गच कान टवकारून बसला होता.

विज्ञाननिष्ठ (?) आणि हजारो वर्षांच्या प्रगत भारतीय परंपरा व इतिहासाबद्दल "अनभिज्ञ" (अनभिज्ञ म्हणायचं कारण वर्गात एकदा कर्णाची गोष्ट सांगितली तर वर्गातील बऱ्याच विद्यार्थ्यांना कर्णाची ओळख म्हणजे गणितातला पाया व उंची यांना सोबत करणारा इतकीच होती.) असलेल्यांना पुराणातील उदाहरणे देणं मुळीच शहाणपणाचं नव्हतं.

म्हणून ठरवलं की ह्यांना जे लोक माहित आहेत त्यांच्या पासून सुरुवात करावी. पाश्चात्य वैज्ञानिकांच्या कथा, त्यांचे नियम, त्यांची तत्वेव त्यांची हुशारी अभ्यासक्रमाने त्यांच्या रक्तात भिनवली होतीच म्हणून मला हे काम काही फार अवघड गेलं नाही. मी संपूर्ण वर्गाला प्रश्न केला-"तुमचा आवडता शास्त्रज्ञ कोण?"

"आईनस्टाईन,न्यूटन,ग्राहम बेल, थॉमस एडिसन अशी एक ना अनेक नावे समोर आली. यादी वाचन थांबवून पुढचा प्रश्न केला-"तुम्हाला माहितेय का की ह्या सगळ्यांना संस्कृत बोलता येत होतं?" यावर उत्तर तेच होतं जे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात तत्काळ आलं असेल- "सर्,थापा नका मारू!" पण दुर्दैवाने हि गोष्ट खरी आहे.

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी एकदा भारतीय शास्त्रज्ञ डॉ.जी.एन.गुप्ता यांच्याशी संस्कृतमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा डॉ.गुप्ता यांनी त्यांची क्षमा मागून त्या संदर्भातील आपली असमर्थता प्रकट केली तेव्हां स्वतः आईनस्टाईन आश्चर्यचकित झाले व म्हणाले- "You hail from India which is the home of Hindu philosophy,yet you have not able to learn your mother language. Come along, see my library which treasures classics from sanskritam"

अर्थातच एका अभारतीय पाश्चात्य वैज्ञानिकाचं ग्रंथालय संस्कृत ग्रंथांनी समृद्ध आणि भारतीय वैज्ञानिकाच्या तोंडी म्हणून सुद्धा हि भाषा नसावी हे केवढं मोठ्ठं दुर्दैव म्हणावं लागेल? सद्य परिस्थिती ही केवळ संस्कृत शिक्षकालाच नव्हे तर प्रत्येक भारतीयालाच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे.

भाषिक वाद, वर्णद्वेष, धार्मिकतेचे आणि आरक्षणाचे मुद्दे थोडेसे बाजूला ठेऊन जाती-भेदांची कुंपणे ओलांडून संस्कृतकडे एक ज्ञानभाषा म्हणून कधी पाहणार आहोत? आणि ह्या दृष्टीने पाहिलं तरंच तिचं खरं सामर्थ्य कळेल.

अमेरिकेने वेदांना "World Heritage" म्हणून घोषित करावं, पहिलीपासून संस्कृत जर्मन आणि रशियाने शिकवावं, "पंचतंत्राचा" अभ्यास हा अमेरिकेतील "M.B.A." साठी सक्तीचा असावा अन् आपण मात्र हा विषय "वैकल्पिक विषय" म्हणून शिकावा? हीच का आपली शिक्षणपद्धती?

पाश्चात्य वैज्ञानिकांना संस्कृत साहित्याने आणि तत्त्वज्ञानाने फार पूर्वी पासून भुरळ पडली आहे. दि.१६ जुलै१९४५, वेळ पहाटे५:३० मि. अमेरिकेने अलामागार्डो भूदलाच्या बिकिनी बेटावरील हवाई तळावर उंच लोखंडी मनोऱ्यावर पहिला अणुस्फोट केला व ह्याचे किमयागार होते डॉ. रॉबर्ट ओपेनहायमर! ह्या स्फोटाचे वर्णन करताना उत्स्फूर्तपणे भगवद्गीतेतील श्लोक स्फुरला-

दिवि सूर्यसहस्त्रस्य भवेद्युगपदुत्थिता|
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः||

भगवद्गीता अध्याय ११, श्लोक क्र१२
अर्थ-जरी आकाशात एकाचंवेळी हजारो सूर्यांचा उदय झाला तरी ही त्या सर्वांचा प्रकाश एकत्र येऊन सुद्धा त्या भगवंताच्या विरारुपाच्या प्रकाशाची बरोबरी करू शकणार नाही. (सदर प्रसंगाची चित्रफीत Youtube वर उपलब्ध आहे, इच्छुकांनी जरूर पहावी.)

असं का व्हावं? ह्या प्रसंगी हेच शब्द का स्फुरावेत? यापुढची घटना अधिक विचार करायला लावणारी आहे. ह्या स्फोटानंतर विज्ञान परिषदेच्या निमित्ताने हे शास्त्रज्ञ पुण्यात आले होते. भगवद्गीतेने प्रेरित झालेल्याने त्यांनी येथील धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.

आळंदी जवळ असल्याने त्यांना तेथे नेण्यात आले. देवस्थानाजवळ जाताच डॉ.ओपेनहायमर लहान मुलासारखे धावत सुटले आणि थेट जाऊन ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीस घट्ट मिठी मारली व ढसाढसा रडू लागले.त्यांच्या रडण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले- "या ठिकाणी इतकी उर्जा आहे की माझा "अणुबॉम्ब" ह्या समोर काजव्यासारखा आहे."

(ह्या ठिकाणच्या शक्तीचे दर्शन "याचि देहि याचि डोळा" घेण्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी मंदिराचा कळस आपोआप हालताना पाहून घेतात.) दोन्हीही प्रसंगांचा विचार करता धार्मिक ग्रंथांवर टीका करणाऱ्यांनी कधी तरी आपलं वय, त्यामानाने आपलं (अ)ज्ञान!,आपले अध्यात्मिक परंपरेबद्दल असणारे बिनबुडाचे, पोकळ आणि केवळ स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी तयार केलेले विचार, समोर उभी असणारी अखंड अव्याहतपणे प्रवाही असणारी अध्यात्मिक परंपरा यांची गोळाबेरीज करून पहावी व स्वतःची अक्कल अजून किती दिवस दिवाळखोरीत काढत राहणार?

हा प्रश्न स्वतःलाच विचारावा. "ब्रह्मसत्य जगन्मिथ्या" हे सांगताना आपले आचार्य कोणत्या स्तरापर्यंत पोहोचले असतील? रोज कुणीतरी उठावं आणि अमक्या ग्रंथात असं सांगितलंय तमक्या ग्रंथात हे चुकीचं सांगितलंय! आपली सर्वात मोठ्ठी अंधश्रद्धा असते ती ही की पोथ्या, पुराणे, रामायण- महाभारत, भगवद्गीता ह्या सर्व म्हातारपणी वाचण्याच्या गोष्टी आहेत.

आणि हीच अंधश्रध्दा समस्त भारतीय संस्कृतीला आणि सभ्यतेला काडी लावतेय! कुणी तरी काही तरी अर्धवट सांगत आणि आपण तेच खरं मानतो...

आपल्याला आपल्या गोष्टीची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ती दुसरा कुणीतरी घेतो. तो पर्यंत आपल्या अडगळीत किती आणि काय किमतीचे साहित्य पडले आहे ह्याची शुद्ध आम्हाला नसते. योगाचे तेच झालं.. हळदीची तीच कथा.. डॉ.माशेलकर लढले नसते तर घरात हळद वापरायची लाज वाटली असती. बासमती तांदळाची तीच शोकांतिका.. मग कडूलिंब का मागे राहावा.?? हेच आपल्या भाषेचं आणि धर्माचं होण्याची आपण वाट पाहत आहोत का?

आज कित्येक परकीय लोकांचा भारताकडे ओढा वाढलाय तो भारतीय भाषा आणि भारतीय तत्वज्ञान शिकण्यासाठी..! म्हातारपणी हे सगळ वाचणं म्हणजे.. वस्तू वापरून झाल्यावर युझर मेनुअल वाचण्यासारख आहे. गीतेने जगाला वेड लावलं..

Quantum theory सारख्या शाखांचा शोध हा गीतेतून लागला असं एडविन श्रोडिंगर सांगतो. हे लोक तर परधर्मीय होते..त्यांनी जर धार्मिकता मानली असती तर इतके संशोधन करू शकले असते का? ("धर्म न मानणे " ह्याला म्हणतात.)

वास्तव फार भयानक आहे.. अजूनही वेळ गेली नाही.. काही भिकार जातीयवादी, धार्मिक असंतोष वाढवणाऱ्या आणि राष्ट्र-पुरुषांची क्रांतीकारकांची आणि संतांची विटंबना करण्याऱ्या व्यक्तींच्या पेजेला लाईक करून किंवा त्यांनी टाकलेल्या पोस्टवर आपली कमेंट करून काहीच साध्य होत नाही. जे साध्य होईल तेकेवळ वाचनाने! आपण.

दैनंदिन कामकाजात एक अर्ज लिहिताना १७ वेळा कागद फाडणारे आपण हजारो श्लोकांची, ओव्यांची आणि अभंगांची रचना करणाऱ्या संतांच्या ऋषींच्या साहित्याला समजून घेण्याच्या तरी लायकीचे आहोत का ह्याचा विचार अंतर्मुख होऊन एकदा जरूर करावा.

डॉ.अब्दुल कलाम, डॉ.रघुनाथ माशेलकर यांसारखी माणसे कधीही या वादात भाग घेताना दिसत नाहीत ते त्यांना आपल्या पेक्षा कमी कळतं म्हणून का? स्वतः अब्दुल कलाम वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता यांचे वाचन केल्याचे सांगतात.

या चर्चेचा निष्कर्ष असाच काढता येऊ शकेल की- एखादा नियम, तत्व अथवा ग्रंथ समजावणाऱ्याने नीट समजावले नाही किंवा समजून घेणाऱ्याने ते अर्थपूर्ण समजून घेतले नाही तर पुढे होणाऱ्या चुकीच्या कृतीला तुम्ही धर्मग्रंथातील तत्वांना आणि ते लिहिणाऱ्या ऋषीमुनींना जबाबदार धरू शकत नाही.

सद्यस्थितीत मानवी विचारांच्या मर्यादा व संकुचितपणामुळेह्या गोष्टी घडतात. म्हणून अल्बर्ट आईन्स्टाईनच्या काही ओळी मुद्दाम नमूद कराव्या वाटतात.-"SCIENTIST CAN ONLY DISCOVER THE THINGS WHICH HAS BEEN ALREDY CREATED BY THE MASTER SCIENTIST "GOD". THE MORE I STUDY SCIENCE THE MORE I BELIVE IN GOD."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel