गणपती आरती संग्रह 5

आरती सप्रेम जयजय स्वामी ग...

Author: भगवान दादा

आरती सप्रेम जयजय स्वामी गजवदना ।
तुझिया स्मरणें जाति पातकें पार्वतीनंदना ।
मोरया पार्वतीनंदना ॥ धृ ॥
मस्तकी मुकुट जडिताचा शोभतो जाण ।
कानी कुंड्लांची दिपकें झळकती परिपूर्ण ॥
पायीं घुंगुर वाळे घालुनी शोभती चरण ।
तुझिया दोंदावरी कंठी पदक घालुन ॥ १ ॥
मूषक वाहनावरी स्वारी करोनियां फिरसी ।
चंद्रम तुजला हांसे म्हणोनि शाप दिधलासी ॥
तेहतीस कोटी देव मिळोनि प्रार्थियलें तुजसी ।
दया करा महाराज उ:शाप देउनियां त्यासी ॥ २ ॥
भाद्रपद चतुर्थीचा दिवस सुदिन ।
त्या दिवशीं या चंद्रमाचे पाहूं नये वदन ।
हाच शाप दिधला त्यासी ऎका हो जन ।
जे जन पाहतील मुख त्यांसी दु:खपीडा जाण ॥ ३ ॥
वत्सें रक्षित असतां कृष्णें सोम पाहिला ।
स्यमंतक मणि जाबुवंते गृहासमिप नेला ।
आळ आला श्रीकृष्णावरी क्रोधातें चढला ।
शोधालागीं जातां तेव्हां जांबुवंत मिळाला ॥ ४ ॥
रामचंद्रे जांबुवंते होतें बोलणें ।
यास्तव आतां जाणे झाले युद्धाकारणें ।
युद्ध प्रसंग टळला तेव्हां कन्या देऊन ।
मणि आधन दिधला तेव्हा आले परतुन ॥ ५ ॥
सत्राजिता श्रीकृष्णाने मणि तो दिधला ।
असत्य भाषण करितां त्यांसी क्रोध बहु आला ।
सत्यभामा बोलावुनि दिधली कृष्णाला ।
मणि आंदण देऊनि त्यासी समाधान केला ॥ ६ ॥
गोपिकांचे गृही श्रीहरी भक्ती नवनीर ।
गोपी जाऊनि यशोदेपाशी सांगती वृत्तांत ।
कृष्ण तुझा चांडाळ येऊनि धरी अमुचा हस्त ।
काय सांगू यशोदे त्याची करणी अघटीत ॥ ७ ॥
ऎसी वार्ता कानी पडतां माता घाबरली ।
जाईनि एकदंतापाशी नवस बोलली ।
संकष्टीची व्रतें तुझी करीन मी आगळी ॥ ८ ॥
यशोदेचे नवस पूर्ण झाले  म्हणोनिया ।
व्रतें तुझी नरनारी करतील मोरया ।
पतित मी आळशी माझी मतिमंद काया ।
दास म्हणे माझें मस्तक नित्य तुझे पायी ॥ ९ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.

Books related to गणपती आरती संग्रह 5


श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्यामधील एक मानाचा गणपती आहे.

गणेश चतुर्थी व्रत

गणेश चतुर्थी व्रत

गणेश पूजा विधी 1

मंगलकार्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना अशी करावी.

गणेशोत्सव

गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.

शंकराच्या आरत्या

समर्थ रामदास स्वामी लिखित

सूर्याच्या आरत्या

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.

वारांचा आरती संग्रह

वारांच्या आरत्या.

रेणुका देवी

रेणुका ही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तिला "संपूर्ण जगाची आई" किंवा "जगदंबा" मानतात.

गणपती डेकोरेशन

गणपती डेकोरेशन 2018

कांकड आरती

कांकड आरती

विदर्भातील अष्टविनायक

संसारी माणसाला भय असते ते संकटांचे. संकट निवारण करणाराच आपलासा झाला म्हणजे संकटांची भितीच नाहीशी होते. त्यामुळेच विघ्नहर्त्या गणपतीची आराधना लोकप्रिय झाली आहे.