सुवर्णा सोनवणे
चाळीसगाव
७७४४८८००८७
जून महिन्याचा पहिला आठवडा . दुपारचे चार वाजले होते . उन्हाची तीव्रता खूप जाणवत होती . घराबाहेर पडणे गरजेचे होते . आज सुनिताला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता . घरातील आवरासावर करुन . तिच्यासाठी थोडा खायला शिरा करुन घेतला . घाईघाईत डबा पिशवीत ठेवला .दाराला कुलूप लावून पटकन स्कूटर स्टार्ट केली . डोक्यावर ऊन तीव्रतेने जाणवत होते . तशीच स्कूटर हॉस्पिटलच्या दिशेने वळवली . घटना घडून दहा दिवस उलटून गेले होते . पण अगदी कालच घडलेल्या सारखे आठवणी मनात अगदी ताज्या होत्या . स्कूटर दवाखान्याच्या आवारात लावून पायर्या चढू लागले . त्या दिवसाच्या आठवणी एकामागोमाग एक येऊ लागल्या . दहा दिवसांपूर्वी सकाळी नऊ वाजता मला माझ्या मिस्टरांचा फोन आला . सुनिताला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे . तू लगेच निघ घरुन . सुनिता माझी चुलत जाउ .
मी फोन ठेवला आणि लगेच निघाली . दवाखान्यात समोरच आक्का उभ्या होत्या . मला पाहून हसल्या . आवरून आली का घरचं सर्व इथं वेळ पण लागू शकतो . मी मानेनं च होकार दिला . मी विचार ले सुनिता कुठे आहे . "आत्ताच आत नेलं तिला ,तुझी वाट पाहत होती ती ."आक्का म्हणाल्या . मी लगेच दार उघडून आत डोकावून पाहिले तर डॉक्टर अजून काही आले नव्हते ऑपरेशन थिएटरमध्ये मी आत जाऊन तीच्या जवळ गेली . असह्य वेदनेने विव्हळत होती . ती मला पाहून म्हणाली ,"ताई मला वाचवा , खूप त्रास होतो आहे मला ".
मी तीच्या डोक्यावरुन हात फिरवला . तिला धीर दिला . बाहेर आली . आक्कांना विचारले काय म्हणाले डॉक्टर . सिझर करायला लागले म्हणाले बाळाचे ठोके कमी झाले आहेत . मग किती वेळ आहे सिझर करायला ? डॉक्टरांना भेटून विचारले असता ते म्हणाले की , भूल देण्यासाठी भूलतज्ज्ञांना बोलावले आहे ते आले की लगेच करु . काही क्षणातच भूलतज्ज्ञ आले . लगेच ऑपरेशन ची तयारी सुरू झाली .
एकेक क्षण एकेक वर्षा प्रमाणे जाऊ लागला . अखेर नर्स बाहेर आली सांगायला , सुनिताला मुलगी झाली आहे . पण मुलीची प्रकृती गंभीर आहे मुलीला ताबडतोब बालरोग तज्ञांना दाखवा ठोके खुप मंद आहेत . मी आणि माझे दिर दोघे बाळाला बालरोग तज्ञांकडे घेऊन गेलो . त्यांनी बाळाला ताबडतोब एडमिट करुन घेतले . इतक्यात डॉक्टरांचा फोन आला अमोल ताबडतोब निघून ये सुनिता ची प्रकृती गंभीर आहे . अमोला सुचेना काय करावे . मी सांगितलं जा तुम्ही मी आहे बाळा जवळ अमोल दवाखान्यात पोहचले तर आक्का रडत होत्या . ते तसेच ऑपरेशन थिएटर मध्ये गेले . डॉक्टरांनी सांगितले की सुनिता ची गर्भपिशवी काढावी लागेल तीचा अतिरिक्त रक्तस्त्राव खुप वाढत आहे तीच्या जीवाला धोका आहे . अमोल नी लगेच सांगितले मला आता मुलं नको माझी बायको मला हवी आहे . इकडे बाळाची प्रकृती जास्तच खालावत चालली होती . आणि काही क्षणातच बाळाने श्र्वास घेणं पूर्णपणे बंद केले . काय करावं सुचत नव्हते . तिकडे सुनिता चा जीवाला धोका होता आणि इकडे तिच्या मुलीची प्राणज्योत मावळली . मी अमोलला फोन करून विचारले कशी आहे सुनिता ? ठीक आहे वहिनी आता ,पण ४८तास काळजी घ्यावी लागेल तीची अजून धोका पूर्णपणे टळलेला नाही . मी लगेच इथली बातमी दिली तुमची लेक नाही राहिली आहे . तिला घरी घेऊन जावे लागेल .
बोलताना हात थरथर करु लागले . माझा धीर पूर्णपणे सुटला होता . पण कसे तरी स्वत:ला सावरले . बाळाला कपड्यात गुंडाळून हातात घेतलं इतक्यात माझे मिस्टर तिथं आले .त्यांनी बाळाच्या डिस्चार्ज ची प्रक्रिया पूर्ण केली . बाळाला घेऊन सुनिता एडमिट होती त्या दवाखान्यात आलो . आक्कांना अश्रू अनावर झाले . नातीला पोटाशी लावून धसाधसा रडू लागल्या . मी त्यांना सावरत म्हटलं ," नात तर गमावली आपण ,पण आता सुनिताचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे . तीला समजू द्यावे लागणार नाही कमीत कमी ४८तास . तुम्ही बाळाला घरी(गावी) घेऊन जा . अंत्यविधी उरकून या दवाखान्यात . तोपर्यंत मी सुनिता जवळ थांबते . त्यांना गाडीत बसवून मी सुनिता जवळ येऊन बसले . दोन तासात सुनिता शुध्दीवर आली . डोळे उघडताच मला म्हणाली,"माझी सानुली कुठे आहे ताई ?" मी चेहर्यावर उसणे हसू आणून तिला म्हटले ,"तुला कसं कळलं ,तुला सानुलीच झाली ते ?" ती मला म्हणाली,"मला थोडं थोडं ऐकू येत होते. डॉक्टरांचे बोलणे मूलगी झाली . पण नंतर काही ऐकू नाही आले. नंतर गाढ झोप लागली मला ".
तीनं विचारले कुठे माझी सानुली? आक्रमकता आणि बाकीचे कुठे आहेत सर्व ? डोळ्यातील पाणी पापणीआडं लपवत मी तिला म्हटले ,"अगं सानुलीचं वजन कमी आहे म्हणून तीला दुसऱ्या दवाखान्यात एडमिट केलं दोन दिवस ." बाकी सर्वजण सानुलीपाशीच आहेत ,तु आराम कर काळजी करू नको ." मी तिच्या डोक्यावरुन हात फिरवला . तर तिच्या डोक्याचे चटके लागत होते . मी ताबडतोब नर्सला आवाज दिला . तिचा ताप तपासला तर तिला १०८डिग्री सें. इतका ताप होता . अशात कोणताही मानसिक झटका तिच्या जिवावर बेतू शकत होता . त्या दोन दिवसांत आम्ही सारे जागेच होतो डॉक्टर सुध्दा दोन दिवस झोपले नाही सतत वरिष्ठ तज्ज्ञांच्या संपर्कात होते आणि तीला ट्रीटमेंट देत होते .
दिवस उजाडला आक्का आणि अमोल अंत्यविधी आटपून दवाखान्यात आले . सुनिता झोपली होती . पण आमच्या बोलण्याच्या आवाजाने पटकन जाग आली आणि तिने विचारले आक्का तुम्ही इथं माझं बाळ कुठे आहे .आक्कांना अश्रू अनावर झाले . त्या तिच्यासमोर रडू लागल्या . ती आता सर्व सत्य परिस्थिती समजू लागली . जीवाचा आकांत करून ती रडू लागली . अंगात ताप वाढतच होता .आणि बी.पी. ही वाढतच होता . अशात डॉक्टरांची तारांबळ उडाली . तिला शांत करणे या क्षणाला महत्त्वाचे होते . तीला शांत करण्यासाठी झोपेचे इंजेक्शन दिले . तिला झोप लागली . आणि आम्ही तिच्या जवळ बसुन होतो .
आता ४८तास उलटून गेले होते . सुनिता च्या जिवाचा धोका टळला होता .आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला . आता आम्हाला थोडा धीर आला .
सुनिता आता हळूहळू सावरत होती . तीच्या पहिल्या मुलात मन रमवत होती . मुलगी गेल्याचं दुःख होतं ,पण चेहर्यावर दाखवित नव्हती . तीनं आता आपल्या मुला साठी बरं होण्याचं ठरवले . आता ती दुःखातून हळूहळू बाहेर येऊ लागली .
आज तिला डिस्चार्ज मिळणार होता बारा दिवसांनी ती घरी जाणार होती . मी रुमचा दरवाजा उघडला . मला दारात पाहून सुनिता हसली . "ताई काय आणलं मला खायला ? भूक लागली आहे ". "शिरा आणला बघ घे गरमगरम खाऊन ". इतक्यात दिर आले . मला सांगू लागले," डॉक्टर भेटायला बोलावत आहे चला वहिनी ". "तु शिरा संपव आम्ही येतो डॉक्टरांना भेटून ."
तिला सांगून डॉक्टरांच्या केबिनमध्ये आलो . तिथे आक्का बसलेल्या होत्या . बिलाबद्दल बोलणे चालू होते . आक्का डॉक्टरांना सांगत होत्या ", साहेब आम्ही गरीब शेतकरी माणसं , यंदा हंगाम समाधानकारक झाला नाही .त्या अशी परिस्थिती ओढवली आमच्या वर आमची नात आम्हाला गवसली नाही . पैसे वाया गेले अपयश आले आमच्या नशिबात. डॉक्टर आक्कांना धीर देत म्हणाले ," सुनिता चा जीव वाचला हे महत्त्वाचे. तिला एक मुलगा आहे त्याला जपा आणि तीला धिर द्या". मला तुम्हाला जितके पैसे देणं शक्य असेल तीतकेच द्या मी न मोजता खिशात ठेवून घेईल . अमोल नी त्यांना दहा हजार रुपये दिले . डॉक्टरांनी न मोजता खिशात ठेवून घेतले . बिलाची रक्कम पन्नास हजार इतकी होती .
चेकप साठी सुनिता खाली आली . डॉक्टरांनी तिला तपासले . काही गोळ्या लिहून दिल्या आणि तिला सांगितले ,"मी रक्षाबंधनाच्या दिवशी जेवायला येणार बरं सुनिता तुझ्या घरी ." सुनिता ने हसून ,नक्की या सांगितले.
अमोल भाड्याची गाडी घेऊन आले . घरी जायची वेळ आली . सुनिता माझ्या गळ्यात पडून रडू लागली . मी तीला समजावून गाडीत बसविले . आक्काही बसल्या गाडी गावाच्या दिशेने जाऊ लागली . मी ही डोळे पुसले आणि घराच्या दिशेने गाडी वळवली.