काळोख गर्द पसरलेला त्या अंधारमय सडकेवरून वाहनाची रेलचेल जरा जास्तच होती .
मुसळधार पाऊस रस्त्यांच्या कडेला असलेली गंटारे नाल्या तुडूंब भरलेल्या .
श्री ला समोरचं काचेतून काहीच नव्हतं दिसतं काचावरही सततची न थांबता पडणारी पाऊसाची धार तो
वैतागून गेला .
आज पहाटे पासून पाऊसाची रिपरिप सुरू होती तो असा अचानक वेग धारन करून
तांडव करेल ह्याची पुर्वकल्पना ऋतुजाला पण नव्हती म्हणून ती अॉफीस मधून आपली सर्व
काम आटोपून जरा उशिराच घरी जायला निघाली ..
दहा आटोला तिने समोर हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थच !
एकही आटो थांबायला तयार नव्हता ... आता काय करावं घरी पोहचणं होणारं की नाही
माझं ....ह्याच
विचाराने ऋतुजाचा जीव त्या पाऊसात खालीवर होत होता ... वारा वेग धारण करून आडवा तिडवा
सरीचा शिरकावं करतं होता तसं ऋतुजाच्या मनात प्रश्नाची कालवाकालव होतं होती ...
घरी फोन तरी तेवढ्या पाऊसात कसा करणारं आधीच चिप्पप .... भिजलेली होती ती कुठे एखाद्या
रेस्टोरेंट मध्येही जाऊन विसावा नव्हती घेऊ शकतं ... सैरावैरा नजरेने ती इकडेतिकडे
शोधाशोध घेतं उभं रहायला जागा धुडाळतं होती तर तिला आडोशाला उभ्या असलेल्या पुरूषांचीच
गर्दी दिसतं होती .... तिच्या मनाला वाटलं तिथं थांबून आटोही मिळणार नाही .
असुदेत आता ! रहावं इथेच उभं म्हणून ती येणार्या आटोला हात देऊन थांबवीत होती . पण ,
कोणताच आटो ती रहाते त्या एरिया मध्ये जायला तयार होत नव्हता कारण तिथून तिचा एरिया अर्धा
पाऊन तासाच्या दुरीवर होता .
ऋतुजाला दुरवरून एक कार येतांना दिसली तिला वाटलं आटो थांबायला तयार नाहीच आहेत
काय करावं ?? ह्या कारला हात देऊन बघते आपल्या एरियाकडे जाणारी असेल तर बरचं होईल .
मनात धास्तावलेलीच होती ऋतुजा पण काय करणार अर्धा तास जास्त झाला होता ती उभी होती काही
option नव्हतं तिला घरी जायला ..
रात्रीचे आठ वाजले होते ... श्री वेगात कारने घराकडे जात होता त्याला समोर गेल्यावर भास
झाल्यासारखं वाटलं ... कोणी तरी लेडिज आपल्याला लिफ्ट मागते आहे ... त्यांने कारची स्पीड स्लो
करतं मागे वळून बघितलं ... तिथे त्याला अंधारात उभी असलेली तरूणी दिसली ....
त्याने आपली कार मागे घेतली ..... ऋतुजा समोर येऊन कार थांबवत त्याने काच खाली केला ...
ऋतुजा काचाजवळ जातच त्याला म्हणाली ,
" आपण बेजनवाडीला चाललात का ? "
बेजनवाडी नाव ऐकताच क्षणभर सुटकारा घेतं श्री मनातच म्हणाला ... इथून किती दुर आहे ह्या
मुलीला पण तिथचं जायचं होतं का ?? पण , त्याने ती रात्रीची वेळ आणि परिस्थिति बघून
जास्त विचार न करता कारचा दरवाजा उघडला ..
त्या पाऊसाने चिंब भिजलेली ऋतुजा त्री ला म्हणाली ,
" मी चिंब भिजलेली आहे बसू शकते ना शिट वर ....."
श्रीने होकारार्थी मान हलवली तशी ती त्याच्या बाजूच्या शिटवर बसली ...
श्री तसा संस्कारी सुसंस्कृत घराण्यातला मुलगा ... लहानपणापासून त्यांच्यावर घरून चांगलेच संस्कार
पडले नेहमी अडचणीत मदत करणारा परस्त्रीचा सन्मान करणारा स्त्री सन्मानाला ठेच न पोहचू देणारा
हा श्री ...
ऋतुजा त्यांचा बाजूला आपलं अंगचोरून बसली श्रीने अद्यापही तिच्याकडे मानवळवून
बघितलेलं नव्हतं . त्याने कमी आवाजात गाणे सुरू केले ... एवढ्या पाऊसातही श्रीने गाडीतला एसी
मात्र बंद केला नव्हता .. आणि ऋतुजा ती बिचारी थंडीने गारठून गेली तिला वाटलं कार मधून उतरून
तरी जावं ह्या महाशयाला कोण सांगेल एसी बंद करायला ...
उगाच बसू दिलं म्हणेल ... तिची हुरहुर वाढली अंगाला काटे आले होते . चुकून श्रीची नजर
तिच्यावर पडली आणि तो मनातच म्हणाला ," कुठे तरी बघितल्यासारखं वाटते पण कुठे ?? "
तो विचाराचा तद्रीत पडला तसं त्याला जाणवलं ऋतुजा थंडीने अकडून राहिली ... त्याने एसी बंद
करतच तिला म्हटलं ,
I Am sorry for that ..... माझं लक्ष नव्हतं तुमच्याकडे Relax ....हं
असं म्हणतं श्रीने आपल्या अंगातला कोट काढत तिच्या समोर ठेवतं म्हणाला ,"
हे घाला ऊब मिळेल तर जरा बरं वाटेल ...."
नाही म्हणावं पण , तिला वाटलं त्याचा अपमान होईल म्हणून तिने थँक्यु म्हणतं कोट कसातरी स्वतः
भोवती लपेटून घेतला ...
श्री आपल्या भुतकाळात हरवून गेला त्याला त्याचा भुतपुर्व आठवणी त्याचा जीवनातल्या कशा
मिटणार होत्या .... तो पाचवी पासून दहावी पर्यत वर्गात एकाच मुलीवर प्रेम करायचा तिला चोरून
बघायचा तिच्या नकळतच प्रेम केले त्याने तिच्यावर आपल्या प्रेमाची चाहूल तिला न लागू देता ...
ती होती ही त्याच्यासाठी स्वप्नातली परी लक्ष वेधून घेणारी साधी रहाणी तिची त्याला खुप
आवडायची ..... गोरवर्ण चंद्रासारखा तिचा तो लोभस मुखवटा त्याचा नजरेत आजही कैद केलेला
होता !
तीचं नावही ऋतुजा त्याच्या ओठातच रेंगाळत होतं ती हिच असावी का ही शंका त्याच्या मनात
येऊन गेली ... कारण व्यक्ति कितीही मोठा झाला तरी चेहरा तोच असतो .
तिला ही जरा वाटायचं ह्याला कुठेतरी बघितलं पण तिने चक्क त्याला आठवायलाच स्वतः ला नकार
दिला ....
आपल्या मनातील संदेह दुर करण्यासाठी म्हणून त्याने चाचरतच तिला विचारलं ,"
" तुमचं नाव काय ? "
....... तिने हसतच उत्तर दिलं
" माझं नाव .... ऋतुजा !"
ऋतुजा नाव ऐकताच त्याच्या बॉडीला शॉक बसावा आणि झिनझिण्या लागाव्या असं
शहारलं त्याने गाडीला ब्रेक मारला .... जाणून नाहीच ! काय होतयं आपल्या सोबत हे आणि का ??
ह्या कोड्यात तोच फसला होता ....
गाडीला असं अचानक ब्रेक का दिला ?? म्हणतचं ती त्याच्याकडे बघू लागली
खिशातून रूमाल काढत ऐवढ्या पावसात तो घामाच्या धारा पुसत होता ..
" तुम्ही ठिक आहात न ...." जरा काळजीच्या स्वरात तिने श्री ला विचारले ...
हो .... म्हणतं त्याने आपली गाडी सुरू केली गळ्याला बांधलेला टाय एका हाताने सैल
करत तो म्हणाला ,
" माझं घर आलय .... तुमचं इथून पंधरा मिनिट दुर आहे ! "
तिला वाटलं आता ह्याचं घर आलं तर मला हे सोडून कसे देतील ... नाराजीने ती म्हणाली ,
" ठिक आहे मी आटो बघून घेईल नाहीतर जाते पायी चालत तुम्ही थांबवून द्या इथेच . "
श्री ज्या मुलीवर प्रेम करायचा ही तिचं त्याची ऋतुजा होती ... त्याला ह्याची आता पुर्णपणे खात्री
बसली आपलं प्रेम म्हणून आणि माणुसकी ह्या नात्याने तो एका स्त्रीला एवढ्या रात्री भर पाऊसात
एकटीला वँन मधून उतरून जायला कसा सांगेल .. त्याचं घर आलं म्हणून हे नक्कीच त्याच्या
स्वभावगुणात नव्हतं ... तो ऋतुजाला म्हणाला ,"
मी देतो तुम्हाला सोडून ... घरपर्यत एवढ्या पाऊसात काय मिळणार तुम्हाला रात्रभर माझ्या
घरासमोर उभं रहावं लागेल आणि ते मला कसं पटणारं हवं तर तुम्ही आज रात्र माझ्या घरी थांबू
शकता उद्या पाऊस कमी झाला की देतो सोडून घरी आई आहेच माझी ..."
त्याचं नॉनस्टॉप बोलणं ऐकून ऋतूजा त्याला हसतचं म्हणाली , " नको नको द्या मला घरीच सोडून ..."
तिचं बोलणं झाल्यावरही ती गालातल्या गालात हसतंच होती .. तिला असं पहिल्यादा
हसतांना बघून श्री ही तिच्या हसण्यात सहभागी झाला ....
तिने आपल्या बँग मधून फोन काढला ती फोन बघते तर तिचा भाऊ आशुतोषचे पंधरा मिसकॉल
दहा मँसेज बघून ती हैरान झाली ... आणि डोक्यावर हात ठेवतच म्हणाली ,
" दादापण ना किती काळजी करतो ह्या पाऊसाच्या पुरात त्याची बहिण वहात नसती गेली , आता
घरी जाऊन खुप रागवणार हा ....."
तिचं बोलणं ऐकतचं श्री म्हणाला ," तुला मोठा भाऊ आहे का ? नावं काय त्याचं ?? "
" हो आशुतोष इनामदार ...... दोन वर्षांनी मोठा आहे माझ्यावर त्याचीच घरात दादागिरी चालत
असते ..."
तिने हसतच त्याला सांगायला सुरूवात केली .... श्री च्या चेहर्यावर नाराजीचे सावट पसरले होते
ते नाव ऐकून कारण ऋतुजाचा भाऊ श्री चा कधीकाळचा रूममेट बेस्ट फ्रेन्ड आणि नंतर शत्रु झाला
होता
काही गैरसमजूतीमुळे ....
क्रमशः