१) अखंड तें मन ठेवलें चरणीं । आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥
गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें । सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥
वायां तोंडपिटी करा कशासाठी । तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥
कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं । मागणे तें देई हेंचि एक ॥४॥
२) आजिवरी धरली आस । परी मनीं झाली निरास ॥१॥
आतां शरण जाऊं कवणा । तुजविण नारायणा ॥२॥
दु:खसागरी लोटलें । कोण काढील वहिलें ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा । देवा येऊं द्या कळवळा ॥४॥
३) आणिक वासना नाहीं दुजी मना । संतचरणीं जाणा मस्तक हें ॥१॥
घालीन लोटांगण वंदीन पायधुळी । पूर्व कर्मा होळी होय तेणें ॥२॥
नामाची आवडी सर्वकाळ वाचे । दुजें साधनचि नेणें कांही ॥३॥
कर्ममेळा म्हणे ही माझी वासना । पुरवा नारायणा सर्वभावें ॥४॥
४) आतां येथवरी । मज नका बोलूं हरी ॥१॥
तुमचें आहे तुम्हा ठावें । माझें म्यांच करावें ॥२॥
आमुच्या संचिता । तुम्हां बोल काय आतां ॥३॥
माझें मन मज ग्वाही । वायां बोलिनियां काई ॥४॥
कर्ममेळा म्हणे जाणा । तुमचें माझें नारायणा ॥५॥
५) आपण वाढवावें आपण बुडवावें । ऐसी रिती बरवें तुमचे घरीं ॥१॥
पाळिल्या पोसिल्या विसर पाडावा । समर्थाच्या नांवा लाज येते ॥२॥
रंक मी भिकारी उच्छिष्ठाचा अधिकारी । काय भीड हरि माझी तुम्हां ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरीनिवासा । उगवा हा फांसा लवकरी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.