संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते.
उतर भारतात,
हिमाचल प्रदेश - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
पंजाब - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात व शेकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात. शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवसांपैकी एक असतो. या दिवशी लोहारीच्या देवीची पूजा करतात.
पूर्व भारतात,
बिहार - संक्रान्ति
आसाम - भोगाली बिहु, (Bhogali Bihu)
पश्चिम बंगाल - मकर संक्रान्ति
ओरिसा - मकर संक्रान्ति
पश्चिम भारतात,
गुजरात व राजस्थान - उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण)
गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात.
गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतराण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात.
दक्षिण भारतात,
कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)
तमिळनाडू - पोंगल, (Pongal)
दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात. सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गूळ, दूध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात. मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.
शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.
भारताबाहेरील देशात-
नेपाळमध्ये,
थारू (Tharu) लोक - माघी
अन्य भागातमाघ संक्रान्ति (Maghe Sankranti), माघ सक्राति (Maghe Sakrati)
थायलंड - सोंग्क्रान (สงกรานต์ Songkran)
लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)
म्यानमार - थिंगयान (Thingyan)