भरली परिषद देवांची की कोण कोण करील प्रतीनिधीत्त्व पृथ्वीवरील जीवांची.!!
तयार झालेत सर्व वाटला त्यांना स्वत:वर गर्व.!!
वरिष्ठ देव म्हणाले की कोण काय बनेल हे आहे गुप्त,तुम्ही सांगा तुमच्यात असलेले गुण सुप्त.!!
काही म्हणाले आम्ही आहोत बलाढ्य शक्तीचे वाली,देव म्हणाले सुक्ष्मजीव बनुन राहा तुम्ही जमीनीच्या खाली.!!
काही म्हणाले असतो आम्ही आमच्या कामात दक्षी,देव म्हणाले बना तुम्ही उडणारे पक्षी.!!
काही म्हणाले आमची निवड नाही आवड आहे वाईटाच भक्ष्य,देव म्हणाले घ्या तुम्ही सर्व मुक्या जनावराच पक्ष.!!
आता राहले घनिष्ठ मित्र दोन ,देव म्हणाले बनता तुम्ही कोण??
पहिला म्हणाला देवा हा श्वास तर मी निश्वास पटला देवालाही त्यांच्यातला विश्वास.!!
दुसरा म्हणाला देवा हा प्राण तर मी आत्मा,आता विचारात पडला परमात्मा.!!
देव म्हणाले बना तुम्ही या जीवसृष्टीची निंव,आणि घ्या बाकी जीवांची किंव.!!
एक बनला या जीवसृष्टीतील स्वावलंबी (वृक्ष),आणि बाकी जीवांचा विकास दुसऱ्यावर (मानव) अवलंबी .!!
सर्व म्हणाले देवा तुम्ही तर आहात सर्वश्रेष्ठ महान,मग काय बनणार जीव सान??
वरिष्ठ देव म्हनाले मी करेल अमर अशी कृती,बनेल वातावरण प्रकृती.!!
एकाने बनवल सृष्टीला वन,दुसऱ्याला बनवायचं होत नंदनवन.!!
पन गर्विष्ठ आणि स्वार्थी निघाला मानव, ज्यात दडला होता विकास-लालसेचा दानव.!!
जो झाला विकास साधण्यात धुंद,ज्यानी केल बाकी जीवांच अस्तित्त्व अरूंद.!!
भलेही आहे मानवाकडे युक्ती पन काय तो विसरला वातावरण प्रकृतीची (वरिष्ठ देव) शक्ती ?