१९९३ ची ही घटना आहे. जागतिकरण झाल्यामुळे विदेशी कंपन्या हिंदुस्तानात आल्या. तेव्हा सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांनी आपली strategy बनवताना ठरवलं की लिंबू पाणी, नारळाचं पाणी, लस्सी, ताक इत्यादी हिंदुस्थानी ड्रिंक्सचं महत्त्व कमी करायचं. त्यात ते यशस्वी ठरले आणि देशी पेये नेस्तनाबूत झाली.
विदेशी सॉफ्ट ड्रिंकने फक्त इतकंच नुकसान केलं नाही तर पंजाबमधील शेतकऱ्यांशी करार करून गव्हाच्या जागी आम्ही सांगू ते पीक लावायचं अशी अट घातली. ह्या कंपन्यांच्या प्रॉडक्ट्ला हवे तेच पीक पंजाबी घेऊ लागले. गव्हाचं कोठार अशी पंजाबची ओळख पुसली गेली. पाठोपाठ त्यांची लस्सी आणि जिलेबीही गेली. उरले फक्त विदेशी सॉफ्ट ड्रिंक्स.
हे विदेशी पदार्थ आपल्याला काय देतात?
एक पिझ्झा खालला तर एक सफरचंद खा असे डॉक्टर सांगतात. कारण पिझ्झ्यामुळे बिघडलेली पचन यंत्रणा (digestive system ) सफरचंदाने नियंत्रणात आणता येते.
मग प्रश्न येतो की पिझ्झा खावाच का? हाच प्रश्न पुढेही न्या. बर्गर, सॉफ्ट ड्रिंक, चिप्स, नुडल्स, चॉकलेट्स....ही यादी वाढत जाईल. मग लक्षात येईल की माझी तब्येत वारंवार का बिघडते. कधीतरी ऐकलं असेल की ऐंशी वर्षांचे कोणी आजोबा डॉक्टरकडे कधीही गेले नव्हते. मग मीच का वारंवार जातो.
पश्चिमी खाद्य खाऊन मला काय मिळतं?
आधी एक उदाहरण पाहू, लवकर समजेल.
" परब और पश्चिम" सिनेमात भारत सोडून विदेशात राहणाऱ्या मुलाला विचारतात, " जीवनभर पश्चिम पश्चिम करत राहिलास. काय दिलं तुला पश्चिमेने?"
त्यांना ठार मारू पाहणारा त्या मुलाचा मुलगा तिथे येतो आणि बंदूक पुढे करून म्हणतो,
" हे दिलं पश्चिमेने !!"
पश्चिमी देशांनी हत्यारे पुरवली इथपर्यंत मामला थांबला नाही. त्यांनी असे खाद्यपदार्थ पुरवले की माणूस जिवंतपणे मरेल. त्या यातना सहन होणार नाहीत तेव्हा औषध घ्यायला येईल. आणि औषध पुरवणाऱ्या कंपन्या पश्चिमीच असतील. म्हणजे तेल त्यांचं, तूपही त्यांचंच...आमच्या हाती फक्त धुपाटणं !!
कोरोनाने मात्र वेगळा डाव टाकलाय. आपल्याला आत्मनिर्भर बनायची संधी दिली आहे. जर फक्त हिंदुस्थानी पदार्थ, हिंदुस्थानी products वर अवलंबून राहिलो तर " पश्चिमेने काय दिलं ?" ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायची वेळ येणार नाही. हा प्रश्नच निकालात लागेल.
नाचणी-ज्वारी-बाजरीची भाकरी, नारळाच पाणी, उसाचा रस, लिंबू पाणी, फळांचा रस, कांदा, काकडी, झुणका भाकर असे भारतीय शेतकर्यांनी पिकवलेले पदार्थ खाल्ले तर आपण फक्त फिट होणार नाही तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. कदाचित, आत्महत्या थांबतील.
असे पदार्थ खाणे हा दुहेरी लाभाचा उपाय आहे. कारण या पदार्थांचे उत्पादक भारतीय शेतकरी आहेत. आपण हे पदार्थ विकत घेतले तर त्याचे अंतिम लाभार्थी सामान्य शेतकरी असतात. शिवाय हे पदार्थ पचवण्यासाठी सोपे असतात. ह्या पदार्थांमध्ये पुरेश्या प्रमाणात फायबर असतं. आपलं आतडं पोटात आलेला पदार्थ शोषण्याचा काम करतं. mixer सारखं दळण्याचा काम करत नाही. शेतात पिकलेले पदार्थ पाण्यासह पोटात येतात तेव्हा ते शोषून घेणं आतड्यांना सोपं पडतं. लाठ्ठपणा, डायबेटीस, हृदय विकार होण्याची भीती नसते. म्हणजे अस्सल भारतीय पदार्थ सेवन केल्यामुळे दुहेरी लाभ होतो. शेतकऱ्यांच्या मालाला मागणी येते आणि ते पदार्थ खाणार्यांना आरोग्य जपता येतं.
पण पिझ्झा, बर्गर, नुडल्स व कोल्ड-ड्रिंक्स दुहेरी नुकसान करतात. पहिल नुकसान म्हणजे त्यांचा लाभ विदेशी कंपन्यांना होतो. जरी त्यांनी भारतीय शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेतला तरी त्यापोटी ते शेतकऱ्याला खूप कमी पैसे देतात. शेतकऱ्यांच आर्थिक शोषण करून त्यांना जास्त नफा कमावता येतो. शिवाय विदेशी पदार्थ पचवण्यासाठी कठीण असतात. त्यांच पोषण मुल्य जवळ जवळ शुन्य असतं. आणि ते अनेक आजारांना आमंत्रण देतात. म्हणजे भारतीय शेतकऱ्याच नुकसान आणि आपलही नुकसान. फायदा मात्र विदेशी कंपनीचा! त्या फायद्यातील खूप मोठा वाटा भारतात गुंतवला जात नाही. म्हणजे भारतीय ग्राहकांच आणि शेतकऱ्यांच नुकसान करणारी विदेशी कंपनी देशाच नुकसान करते.. आज नावश्रीमन्तांकडे आलेला पैसा विदेशी खाद्य पदार्थांवर खर्च होतो. म्हणून भारतात खूप संपत्ती असूनही शेतकरी आत्महत्या करतात. संपत्तीचा मोठा वाटा विदेशी कंपन्यांकडे जातो. भारतीय शेतकर्यांना लाभ होत नाही. पिकाच्या लागवडी इतकी किंमत मिळत नाही. त्याचवेळेस पिझ्झा, बर्गर, नुडल्स आणि कोल्ड-ड्रिंक्स विकणाऱ्या विदेशी कंपन्या प्रचंड लाभ कमावतात.
नारळाचं पाणी कोणत्याही कोल्ड-ड्रिंक्स पेक्षा जास्त आरोग्यदायक आहे. पण नारळाचं पाणी फक्त आजारपणात पितात. गम्मत अशी कि चांगली आर्थिक स्तिथी असलेले नवं-श्रीमंत कोल्ड-ड्रिंक्स पिवून आजारी पडतात आणि आजारपणात नारळच पाणी पितात! विचार करा, आपण नारळाचं पाणी प्यायला लागलो तर सागरी किनारी राहणाऱ्या शेतकऱ्यांना किती रोजगार मिळेल?
कोल्ड-ड्रिंक्स पचवणं आतड्यांना कठीण असतं. त्यात भरलेली रसायन शोषण्याची क्षमता आतड्यांमध्ये नाही. उलट अशी रसायने आतड्यांचा नुकसान करतात. म्हणजे कोल्ड-ड्रिंक्स पिणारी व्यक्ती स्वताला आजारी करून घेते आणि भारतीय शेतकार्यांनी निर्माण केलेला शेतमाल न घेवून त्याला तोट्यात ढकलते. त्याचा तोटा इतका होतो कि शेत पिकवण्यासाठी, झाड जगवण्यासाठी केलेला खर्च विक्रीच्या किमतीपेक्षा जास्त होतो.
ह्या सगळ्याचा असा अर्थ अजिबात नाही की देशी कंपन्या, त्यांचे products सर्वोत्तम आहेत. अत्यंत महत्वाचं, देशी कंपन्या proffesional नाहीत. पण मागील २५ पेक्षा जास्त वर्षे विदेशी कंपन्या कशा काम करत होत्या हे आपण पाहिले, अनुभवले. त्यातून शिकून आपण आपल्यात बदल करू शकतो. ते इकडे येऊन फायदा कमवतात. आता आपण तिकडे जाऊन फायदा कमाऊ असा उलटा विचार करायची हीच वेळ आहे.
हिंदुस्थानी उद्योजक आणि विदेशी उद्योजक ह्यांच्यातील फरक पहा. टाटा, नारायण मूर्ती आणि इतर देशी उद्योजक मिळालेल्या नफ्यातून देशाला खूप काही देत आहेत.
आपण ह्या समाजाचं देणं लागतो हा भाव विदेशी कंपन्यांकडे कसा येईल? हा समाज त्यांचा नाही.
चला, साक्षर तर झालो. आता खरेदी साक्षर होऊ!!
- निरेन आपटे
ऑनलाइन पुस्तक: अमृताशी पैजा
https://www.facebook.com/niren.apte