एकीने जाऊन तिच्या आई - बाबांना बोलावून सगळी हकीकत सांगितली . ते ऐकताच दोघे लगबगीने घरी आले . संगीता ला (शितलची आई ) खूप वाईट वाटले आणि राग ही आला . " मला एकच मुलगी आहे . तिच्यासाठी आम्ही दोघे बाहेर रात्रंदिवस कष्ट करतोय . आणि तुम्ही हिला इथे असे छळतात . माझ्या मुलीनं तुमचं काय बिघडव लय ? माझा राग आहे ना तुम्हाला की तुम्हाला मुलगा देऊ शकले नाही म्हणून . पण देवाने आम्हाला एकच मुलगी दिली त्याला मी काय करू ? आमच्या साठी मुलगा आणि मुलगी दोन्हीही हिच आहे . असा त्रास तुम्ही देतात ही गोष्ट हिने मला एक दिवस सुद्धा सांगितली नाही . एवढयशा मुलीनं का म्हणून सहन करावं ? " असे म्हणून संगीता शितलला मिठी मारून रडू लागली . तिला धीर देत वसंत ( शितल चे वडील ) म्हणाला , " रडू नकोस . संगीता शांत हो . आपण आता इथे राहायचे नाही . आम्ही शितलला आमच्या साहेबांकडे ठेवू . चल शितल . " आऊ आणि अण्णा दोघेही गयावया करू लागले . शितलला आऊचा खूपच राग आला होता . तिने जाताना आऊला जरा सुद्धा पाठिमागे वळून पाहिले नाही . तिला खूपच आनंद झाला की , " आपण आऊच्या आणि अण्णाच्या तावडीतून सुटलो म्हणून .
ती उड्या मारत मारत , नाचत साहेबांच्या घरी आली . त्याच वेळी तो रखवाला साहेबांकडे कोणत्या तरी कामासाठी आला होता . रखवाल्याने शितलला बघीतले नि " साहाब , यही है वो छोकरी . जो उस दिन आम चुराकर भाग गयी थी . " साहेबांनी तिच्याकडे वळून बघीतले . " छे । शक्यच नाही . तू काय तरी बक्वास करतोस . देख रे छोकरी की उमर देख । वो कितनी छोटी है । वो क्या आम चुराचेगी ? छोटे बच्चे तो भगवान की देन होती है । फारूक , अल्ला के घर का दिया होते है । तू चल जा ये ले तेरे पैसे । कल सुबह ग्याराह बजे आना । " साहेब फारूकला ( रखवाला ) म्हणाले . रखवाला जाता जाता तिला रागाने बघू लागला . शितलने सुद्धा रागानेच बघीतल्या वर दचकून निघून गेला . तो गेल्यावर साहेबांनी तिला जवळ बोलावून विचारले , " बेटी तुझं नाव काय ? "
" शितल . "
" शाळेला जातेस का ? "
" होय "
" कितवी ला आहेस ? "
" दुसरीला "
" शशीकला ऽऽ ए ऽऽ शशीकला " साहेबांनी बायकोला बोलावून . " हे बघ . हिला आत घेऊन जा आणि जेवायला वाढ . " म्हणाले .
वसंत आणि संगीताने आपली सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाले .
" साहेब आमची एकच मुलगी आहे . तिला जरा सांभाळा . थोडेच दिवस . मग आम्ही तिला घेऊन जातो . "
" ठिक आहे वसंत . तू काही काळजी करू नकोस . तुझ्या मुलीला मी सांभाळेन . तू आता जा कामावर . उद्या ये . "